दिवाळी सण हा मोठा, नसे आनंदाला तोटा
दिवाळी सण हा मोठानसे आनंदाला तोटा
भल्या पहाटे अभ्यंग स्नान करूनी
सुरूवात होई या दिनाची
दाराबाहेर काढूनी रांगोळी
जणू लक्ष्मी येई घरी
दाराबाहेर लावूनी पणती
जणू देई मनाला संजीवनी
फटाके फोडूनी आनंदोत्सव
साजरा करिती अबालवृद्ध
दिवाळी सण हा मोठा
नसे आनंदाला तोटा
भल्या पहाटे अभ्यंग स्नान करूनी
सुरूवात होई या दिनाची
फराळ, चकल्या, लाडू, करंज्या
अश्या पदर्थांची असे घरोघरी मेजवानी
सण हा भाग्याचा
असे धनलक्ष्मीचा निवास हा घरोघरी
भाऊबीजेची महती काय वर्णावी
जिथे बंध असे भावा बहिणीच्या नात्याचे
ओवाळणी करिते बहिण
लाडक्या भाऊरायाला असे गंध मायेचा
दिवाळी सण हा मोठा
नसे आनंदाला तोटा
भल्या पहाटे अभ्यंग स्नान करूनी
सुरूवात होई या दिनाची