१३ एप्रिल दिनविशेष

१३ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १३ एप्रिल चे दिनविशेष.
१३ एप्रिल दिनविशेष | 13 April in History
१३ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
जलियांवाला बाग हत्याकांड - (१३ एप्रिल १९१९) या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या.

जागतिक दिवस

१३ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • YEAR: TEXT

ठळक घटना (घडामोडी)

१३ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १०५५: व्हिक्टर दुसरा पोपपदी.
 • ११११: हेन्री पाचवा, पवित्र रोमन सम्राटपदी.
 • १२०४: चौथ्या क्रुसेडने कॉन्स्टेन्टिनोपल लुटले.
 • १२५०: सातव्या क्रुसेडचा ईजिप्तमध्ये पराभव.
 • १२५०: फ्रांसचा राजा लुई नववा युद्धबंदी.
 • १८२९: ब्रिटीश संसदेने रोमन कॅथोलिक व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य दिले.
 • १८४९: हंगेरी प्रजासत्ताक झाले.
 • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट सम्टरचा पाडाव केला.
 • १९१९: जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
 • १९३९: भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.
 • १९४१: जपान व सोवियेत संघाने तटस्थतेचा तह केला.
 • १९४५: जर्मनीच्या गार्डेलजेन शहरात १,०००हून अधिक राजबंदी व युद्धबंद्यांची हत्या.
 • १९७०: अपोलो १३मधील ऑक्सिजन टँकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
 • १९७४: व्यापारी तत्त्वावर चालणारा पहिला भूस्थिर उपग्रह वेस्टार १ प्रक्षेपित.
 • २००२: व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१३ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १७१३: लॉर्ड फ्रेडरिक नॉर्थ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १७४३: थॉमस जेफरसन, अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
 • १८६६: बुच कॅसिडी, अमेरिकन लुटारू.
 • १८९४: आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.
 • १९१३: दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत.
 • १९२२: ज्युलियस न्यरेरे, टांझानियाचा पंतप्रधान.
 • १९६३: गॅरी कास्पारोव्ह, रशियाचा बुद्धिबळपटू.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१३ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १६०५: बोरिस गोडुनोव्ह, रशियाचा झार.
 • १८६८: ट्युवोड्रोस, इथियोपियाचा सम्राट.
 • १९६६: अब्दुल सलाम आरिफ, इराकचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९७५: फ्रांस्वा टोम्बालबाये, चाडचा राष्ट्राध्यक्ष.
 • २००८: दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.