जिजाऊचे गुणगान - मराठी कविता

जिजाऊचे गुणगान, मराठी कविता - [Jijauche Gungaan, Marathi Kavita] चला चला गाऊ चला जिजाऊचे गुण, जिजाऊचे गुण गाऊ, जिजाऊचे गुण.

चला चला गाऊ चला जिजाऊचे गुण, जिजाऊचे गुण गाऊ, जिजाऊचे गुण

चला चला गाऊ चला जिजाऊचे गुण
जिजाऊचे गुण गाऊ, जिजाऊचे गुण

संस्काराचे बीज घेऊनी उडू बागडू कष्ट करुनी
स्वातंत्र्याचे ध्यास घेऊ, जागु या नव्यानं
जिजाऊचे गुण गाऊ, जिजाऊचे गुण

रयतेचे तत्व जाणूया, जिजाऊच्या कार्यातून प्रेरणा घेऊया
हिरवे हिरवे स्वप्न सारे, हिरवी हिरवी मनं
जिजाऊचे गुण गाऊ, जिजाऊचे गुण

कष्ट नवे, कार्य नवे जाऊ या धैर्याने
जिजाऊचे गुण गाऊ, जिजाऊचे गुण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.