माझी जिजाऊ माऊली, वटवृक्षाची सावली, कष्ट पाहून मातेचे, सर्व जन झाले धन्य
माझी जिजाऊ माऊलीवटवृक्षाची सावली
कष्ट पाहून मातेचे
सर्व जन झाले धन्य
बालशिवबासाठी उभे आयुष्य वेचली
जिजाऊ माऊली धैर्य, त्यागाने माखली
आई जिजाऊ होती गुणांचा सागर
शिवरायास तिने केले तयार
नाते संबंध तोडून एकनिष्ठ राहिली
माझी जिजाऊ माऊली
वटवृक्षाची सावली
कष्ट पाहून मातेचे
सर्व जन झाले धन्य
दादांच्या साथीने केला पुण्याचा विकास
कष्ट, जिद्दीने भरविला स्वराज्याचा घास
शिवबाच्या साथीने सांभाळला कारभार
अशी जिजाऊ माऊली होती कर्तुत्वाची धार
अख्ख्या देशाने मानली
माझी जिजाऊ माऊली
वटवृक्षाची सावली
कष्ट पाहून मातेचे
सर्व जन झाले धन्य