१० एप्रिल दिनविशेष

१० एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १० एप्रिल चे दिनविशेष.
१० मार्च दिनविशेष | 10 March in History
१० एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
सामुएल हानेमान - (१० एप्रिल १७५५ - २ जुलै १८४३) हे एक जर्मन वैद्यक होते त्यांनी होमिओपॅथी या वैद्यकीयशास्त्राचा शोध लावला.

जागतिक दिवस

१० एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • भूमी अभिलेख दिन: महाराष्ट्र.

ठळक घटना (घडामोडी)

१० एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १९०६: द फोर मिलियन, ओ. हेन्रीचा दुसरा लघुकथांचा संग्रह प्रकाशित.
 • १९४४: हेन्री फोर्ड दुसरा याची फोर्ड मोटर कंपनीचा उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) म्हणून नेमणूक.
 • २०१०: रशियातील स्मोलेन्स्क शहरातील विमानतळावर उतरत असताना झालेल्या विमान दुर्घटनेत पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व इतर अनेक उच्चाधिकार्‍यांसह ९७ व्यक्ती ठार.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१० एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १३८९: कोसिमो दि मेदिची, फ्लोरेन्सचा राज्यकर्ता.
 • १६५१: एह्रेनफ्रीड वॉल्थर फॉन त्शिर्नहौस, जर्मन गणितज्ञ.
 • १७५५: सामुएल हानेमान , होमिओपॅथीचे जनक
 • १७९४: मॅथ्यू पेरी, अमेरिकन दर्यासारंग.
 • १८२९: विल्यम बूथ, साल्व्हेशन आर्मीचा संस्थापक.
 • १८८०: मोहम्मद नादिर शाह, अफगाणिस्तानचा राजा.
 • १८९४: घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.
 • १९०७: मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.
 • १९१७: रॉबर्ट बर्न्स वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
 • १९३१: किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.
 • १९३२: ओमर शरीफ, इजिप्तचा चित्रपटअभिनेता.
 • १९५१: स्टीवन सीगल, अमेरिकन चित्रपटअभिनेता.
 • १९८४: मँडी मूर, अमेरिकन चित्रपटअभिनेत्री.
 • १९८८: हेली ज्योएल ऑस्मेंट, अमेरिकन चित्रपटअभिनेता.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१० एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • २०१८: रॉबर्ट एडवर्डस्‌, ब्रिटिश शरीरक्रियाशास्त्रज्ञ.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.