८ जून दिनविशेष

८ जून दिनविशेष - [8 June in History] दिनांक ८ जून च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
८ जून दिनविशेष | 8 June in History

दिनांक ८ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - TEXT.

शेवटचा बदल ९ जून २०२१

जागतिक दिवस
८ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • जागतिक समुद्र दिन.

ठळक घटना / घडामोडी
८ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ६८: रोमन सेनेटने ‘गॅल्बा’ यांची रोमन सम्राटपदी निवड केली.
 • ५३६:संत सिल्व्हेरियस’ पोपपदी.
 • ७९३: इंग्लंडवरील व्हाइकिंग टोळ्यांच्या हल्ल्यांची पहिली नोंद.
 • १६२४: पेरूमध्ये भूकंप (संदर्भ उपलब्ध नाही).
 • १६७०: पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी’ परत जिंकून घेतला.
 • १७०७: औरंगजेबांच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्यांच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जम यांनी आझमशाह यांना ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
 • १७१३: मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला ‘रायगड किल्ला’ पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
 • १७८३: आइसलॅंडमधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक. ९,००० ठार, पुढील ७ वर्षे दुष्काळ.
 • १७८९: अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ‘जेम्स मॅडिसन’ यांनी नागरिकांच्या हक्कनाम्याचा मसुदा अमेरिकन संसदेत माडला.
 • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - टेनेसी अमेरिकेपासून विभक्त झाले.
 • १८६६: कॅनडाच्या संसदेची ओटावामध्ये पहिली बैठक.
 • १८८७: हर्मन हॉलेरिथला पंच कार्ड कॅल्क्युलेटर साठी पेटंट प्रदान.
 • १९१२: कार्ल लेम्ले यांनी ‘यूनिव्हर्सल पिक्चर्स’ या कंपनीची स्थापना केली.
 • १९१५:लोकमान्य टिळकांनी’ मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे ‘गायकवाड वाड्यात’ प्रकाशन झाले.
 • १९१८:Nova Aquilae’ या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध.
 • १९४१: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी सिरीया व लॅबेनॉन वर आक्रमण केले.
 • १९४२: दुसरे महायुद्ध - जपानच्या पाणबुड्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी व न्यूकॅसल शहरांवर बॉम्बफेक केली.
 • १९४८:जॉर्ज ओरवेल’ यांची ‘नाइन्टीन एटी फोर (१९८४)’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
 • १९४८: एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.
 • १९५३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हॉटेलांतून श्यामवर्णीय गिर्‍हाईकांना सेवा नाकारणे बेकायदा ठरवले.
 • १९६८: मार्टिन ल्युथर किंगच्या खूनाबद्दल जेम्स अर्ल रेला अटक.
 • १९६९: लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.
 • १९९२: पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.
 • २००४: आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.
 • २००६: इराकमधील अल कायदाचा म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी विमान हल्ल्यात ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
८ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९०६: सैयद नझीर अली (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू: १८ फेब्रुवारी १९७५).
 • १९१०: दिनकर केशव बेडेकर (मराठी तत्वचिंतक, समीक्षक व लेखक, मृत्यू: २ मे १९७३).
 • १९१७: गजाननराव वाटवे (भावगीत गायक आणि संगीतकार, मृत्यू: २ एप्रिल २००९).
 • १९२१: सुहार्तो (इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: २७ जानेवारी २००८).
 • १९२५: बार्बरा बुश (अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुश यांची आई, मृत्यू: १७ एप्रिल २०१८).
 • १९३२: रे इलिंगवर्थ (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
 • १९३५: डेरेक अंडरवूड (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
 • १९३६: केनीथ गेडीज विल्सन (अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते, मृत्यू: १५ जून २०१३).
 • १९५५: टिम बर्नर्स ली (वर्ल्ड वाईड वेब चे जनक).
 • १९५७: डिंपल कपाडिया (भारतीय चित्रपट अभिनेत्री).
 • १९७५: शिल्पा शेट्टी (भारतीय चित्रपट अभिनेत्री).
 • १९७६: लिंडसे डॅव्हेनपोर्ट (अमेरिकेची टेनिस खेळाडू).
 • १९८३: किम क्लाइस्टर्स (बेल्जियमच्या टेनिस खेळाडू).
 • १९८३: नादिया पेट्रोव्हा (रशियाच्या टेनिस खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
८ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


दिनविशेष        जून महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जून महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.