दिनांक २४ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
शेवटचा बदल २३ जून २०२१
जागतिक दिवस
२४ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
२४ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १३१४: बॅनॉकबर्नची लढाई - रॉबर्ट द ब्रुसने एडवर्ड दुसर्याला हरवून स्कॉटलॅंड पुन्हा स्वतंत्र केले.
- १३४०: शंभर वर्षांचे युद्ध - एडवर्ड तिसर्यालाने फ्रांसच्या आरमाराचा धुव्वा उडवला.
- १४४१: इटन कॉलेजची स्थापना.
- १४९७: जॉन कॅबट न्यू फाउंडलॅंडला पोचला.
- १५७१: मिगेल लोपेझ दि लेगाझ्पीने मनिला शहराची स्थापना केली.
- १६६४: न्यू जर्सी वसाहतीची स्थापना.
- १६९२: किंग्स्टन शहराची स्थापना.
- १७९३: फ्रांसने पहिले प्रजासत्ताक संविधान अंगिकारले.
- १८१२: नेपोलियन बोनापार्टने रशियावर आक्रमण केले.
- १९१३: ग्रीस व सर्बियाने बल्गेरियाबरोबरचा तह धुडकावला.
- १९१६: पहिले महायुद्ध - सॉमची लढाई.
- १९३९: सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
- १९४०: दुसरे महायुद्ध - फ्रांस व इटलीमध्ये संधी.
- १९४८: सोवियेत संघाने दोस्त राष्ट्रांचा बर्लिनशी जमिनीवरून संपर्क तोडला.
- १९७५: ईस्टर्न एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावर कोसळले. ११३ ठार.
- १९८२: कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.
- १९९४: अमेरिकन वायुसेनेचे बी-५२ प्रकारचे विमान फेरचाइल्ड एरफोर्स बेस येथे कोसळले. ४ ठार.
- १९९६: मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम केला
- १९९८: अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
- २००१: आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
- २००४: न्यू यॉर्क राज्यात मृत्युदंड असंवैधानिक ठरवण्यात आला.
- २०१०: जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
जन्म / वाढदिवस / जयंती
२४ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८६२: श्रीधर बाळकृष्ण रानडे (रविकिरण मंडळाचे संस्थापक, मृत्यू: २१ मार्च १९७४).
- १८९३: रॉय ओ. डिस्नी (द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक, मृत्यू: २० डिसेंबर १९७१).
- १८९७: पंडीत ओंकारनाथ ठाकूर (ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री, मृत्यू: २९ डिसेंबर १९६७).
- १८९९: नानासाहेब फाटक (मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट, मृत्यू: ८ एप्रिल १९७४).
- १९०८: गुरूगोपीनाथ (कथकली नर्तक, मृत्यू: ९ ऑक्टोबर १९८७).
- १९२७: कवियरासू कन्नदासन (तामिळ लेखक, मृत्यू: १७ ऑक्टोबर १९८१).
- १९२८: मृणाल केशव गोरे (महाराष्ट्रातील लोकनेत्या, मृत्यू: १७ जुलै २०१२).
- १९३७: अनिता मुजूमदार देसाई (ज्येष्ठ लेखिका).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२४ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९०८: ग्रोव्हर क्लीव्हलँड (अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष, जन्म: १८ मार्च १८३७).
- १९१४: वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती (दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक, जन्म: १३ ऑगस्ट १८५४).
- १९९७: संयुक्ता पाणिग्रही (ओडिसी नर्तिका, जन्म: २४ ऑगस्ट १९४४).
- २०१३: एमिलियो कोलंबो (इटलीचे ४०वे पंतप्रधान, जन्म: ११ एप्रिल १९२०).
जून महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |