आगमन श्रावणाचे - मराठी कविता

आगमन श्रावणाचे, मराठी कविता - [Aagaman Shravanache, Marathi Kavita] होता आगमन श्रावणाचे, ऊन पाऊस लपाछपी खेळू लागले.
आगमन श्रावणाचे - मराठी कविता | Aagaman Shravanache - Marathi Kavita
होता आगमन श्रावणाचे
ऊन पाऊस लपाछपी खेळू लागले
धरुनी हात जाई - जुई - गुलाब
मोगर्‍याचा, हिरवे शिवार बहरले

इंद्रधनुची पाहता सप्तरंगी कमान
रिमझिम - रिमझिम मेघ सारे बरसले
इंद्रधनुची पाहता सप्तरंगी कमान
रिमझीम - रिमझीम मेघ सारे बरसले
चिमण्यांच्या मधुर चिवचिवाटासह
मोर रोमहर्षाने नाचू लागले

झरझर - झरझर येता पावसाची सर
गोड गाण्याची मनी उमटली लहर
क्षण तो आठवला गोड - गुलाबी मिठीचा
जणु प्रेम आमचे नव्याने फुलले

पाहुनी नयनरम्य दृश्य हे
काळा कोकीळही जागा झाला
कुहूकुहू - कुहूकुहू गोड गाण्याने त्याच्या
पशु - पक्षी मग्न जाहले

२ टिप्पण्या

  1. छान आहे
    1. आपल्या अभिप्राया बद्दल आभारी आहोत.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.