आधार - मराठी कविता

आधार, मराठी कविता - [Aadhar, Marathi Kavita] आता राहिलेत कुठे खांदे, हातपण झालेत पोरके.
आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita
आता राहिलेत कुठे खांदे
हातपण झालेत पोरके
भरभरुन रडायचंय आता
पण डोळेच पडलेत कोरडे

पाठीवर पडणारी शाबासकी
आजकाल हरवून गेलीय
कुणाला बोलावं काय?
इथे माणुसकीच मरुन गेलीय

मरेपर्यंत जगायचं की
मरत मरत जगायचं
आता आपलं आपणच ठरवायचं
किती आणि कसं जगायचं

आता भरलंय सगळंच
वाईटाच्या माठात काठोकाठ
क्षणिक सुखाच्या मागून
यातनाही येतात पाठोपाठ

रडणारे डोळे पुसायला आता
रुमाल नकोत हात हवेत
कुणीतरी येऊन आता
आधाराचे खांदे द्यावेत

२ टिप्पण्या

  1. Sunder.... Manacha vedh ghenari kavita
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.