२१ मार्च दिनविशेष

२१ मार्च दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २१ मार्च चे दिनविशेष.
२१ मार्च दिनविशेष | 21 March in History
२१ मार्च दिनविशेष
बिस्मिल्ला ख़ॉं - (२१ मार्च १९१६ - २१ ऑगस्ट २००६) बिस्मिल्ला खान / कमरुद्दीन खान हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते. बिस्मिल्ला ख़ॉं यांच्या जीवनावर एक लघुपट आहे. डॉ. के. प्रभाकर यांनी तो दिग्दर्शित केला आहे.

जागतिक दिवस

२१ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • जागतिक वनदिन.
 • विश्व वंशभेद निर्मूलन दिवस.
 • पृथ्वी दिन.
 • सलोखा दिन: ऑस्ट्रेलिया.
 • मातृ दिन: इजिप्त, लेबेनॉन, जॉर्डन.
 • स्वातंत्र्य दिन: नामिबिया.
 • मानवी हक्क दिन: दक्षिण आफ्रिका.
 • वंशभेद निर्मूलन दिन: संयुक्त राष्ट्रे.

ठळक घटना (घडामोडी)

२१ मार्च रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १४२१: बीग युद्धात इंग्रजांचा फ्रेंचांकडून पराभव.
 • १४९२: अलोंझो पेट्रो हा खलाशी कोलंबससोबत सागरसफरीला निघाला.
 • १६१०: राजा जेम्स प्रथम याचे इंग्लंडच्या लोकसभेला उद्देशून भाषण.
 • १६९७: झार पीटर महान यांच्या पश्चिम युरोप दौऱ्याची सुरुवात.
 • १७८८: गुस्टास व्हेसा यांची चार्लोट राणीकडे आफ्रिकन गुलामांना मुक्त करण्याची याचिका.
 • १७९०: थॉमस जेफरसन यांनी राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे न्युयॉर्क येथे राज्याचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
 • १८०४: नेपोलियनचा फ्रेंच नागरी कायदा स्वीकृत.
 • १८५१: कॅलिफोर्नियामध्ये योसेमिटी दरीचा शोध लागला.
 • १८५७: जपानची राजधानी टोक्योत भूकंप. १,०७,००० ठार.
 • १८५९: एडिनबर्ग येथे स्कॉटिश नॅशनल गॅलरीची स्थापना.
 • १८५९: झूऑलॉजिकल सोसायटी ऑफ फिलाडेल्फिया ही अमेरिकेतील पहिली प्राणिशास्त्रीय संघटनेची स्थापना.
 • १८६०: अमेरिकेचा स्वीडन सोबत हस्तांतरण करार.
 • १८६४: लुईझियाना मधील हेंडरसन पर्वतावर युद्ध.
 • १८६६: राष्ट्रीय सैनिक निवासांना अमेरिकन काँग्रेसची मान्यता.
 • १८६८: सोरोसिस या अमेरिकेतील पहिल्या व्यावसायिक महिला क्लबची न्यूयॉर्क येथे स्थापना.
 • १८८५: फेरीच्या दुसऱ्या फ्रेंच सरकारचा राजीनामा.
 • १८८८: लंडन येथे आर्थर पिनेरो यांच्या स्वीट लव्हेंडर चा पहिला खेळ.
 • १८९०: ऑस्ट्रियन ज्यू समाजाला कायदेशीर मान्यता.
 • १९०९: अमेरिकेचे मोरान व मॅकफरलॅण्ड युरोपच्या पहिल्या सहा दिवसीय सायकल स्पर्धेचे विजेते.
 • १९१८: पहिले महायुद्ध - सॉमची दुसरी लढाई सुरू.
 • १९२५: एडिनबर्गमधील मरेफिल्ड क्रीडांगणाचे उद्घाटन.
 • १९२५: इराणने खोर्शिदी सौर हिज्राह दिनदर्शिका स्वीकारली.
 • १९३३: ॲडॉल्फ हिटलर, गोरिंग, ब्रुनिंग व जर्मन सैन्याच्या इतर उच्च अधिकाऱ्यांची बर्लिन येथे बैठक.
 • १९४०: पॉल रेनॉ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९५८: सोवियेत संघाची वातावरणीय अण्वस्त्र चाचणी.
 • १९६२: स्वनातीत गतीने प्रवास करणारा अस्वल हा पहिला प्राणी.
 • १९६८: इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेवरील हल्ल्यासाठी जॉर्डन नदी ओलांडली.
 • १९६९: अमेरिकेची नेव्हाडा केंद्रावर अण्वस्त्र चाचणी.
 • १९७१: क्रिकेट खेळात जॉर्जटाऊन येथे भारताच्या सुनील गावस्करचे त्याच्या विक्रमी ३४ कसोटी शतकांपैकी पहिलेवहिले शतक, ११६ धावा.
 • १९८०: अमेरिकेने सोवियेत संघाच्या मॉस्को शहरात होऊ घातलेल्या बाविसाव्या ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
 • १९९०: नामिबिया दक्षिण आफ्रिकेपासून स्वतंत्र झाले; सॅम नुजाना राष्ट्राध्यक्ष.
 • १९९१: अमेरिकन नौदलाच्या दोन पाणबुडीविरोधी विमानांच्या टकरीत २७ जण समुद्रात बेपत्ता.
 • १९९३: डन्स स्कोट्सला पोप जॉन पॉल द्वितीयने संतपद बहाल केले.
 • २००५: मिनेसोटाच्या रेड लेक गावातील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने १० व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारले.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२१ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १८५४: ऍलिक बॅनरमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९१६: बिस्मिल्ला ख़ॉं, भारतीय सनईवादक.
 • १९४६: टिमोथी डाल्टन, इंग्लिश अभिनेता.
 • १९७८: राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२१ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १६१७: पोकाहोन्टास, मूळ अमेरिकन स्त्री, पोव्हाटनची मुलगी.
 • १८४३: ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

गॅलरी (२१ मार्च दिनविशेष)

२१ मार्च दिनविशेष २१ मार्च दिनविशेष २१ मार्च दिनविशेष
२१ मार्च दिनविशेष
२१ मार्च दिनविशेष २१ मार्च दिनविशेष २१ मार्च दिनविशेष २१ मार्च दिनविशेष
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

मार्च महिन्यातील दिनविशेष

तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


संबंधित दुवे: सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / जानेवारी दिनविशेष

विभाग: जानेवारी दिनविशेष, फेब्रुवारी दिनविशेष, मार्च दिनविशेष, एप्रिल दिनविशेष, मे दिनविशेष, जून दिनविशेष, जुलै दिनविशेष, ऑगस्ट दिनविशेष, सप्टेंबर दिनविशेष, ऑक्टोबर दिनविशेष, नोव्हेंबर दिनविशेष, डिसेंबर दिनविशेष
विषय: मार्च

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.