१३ मार्च दिनविशेष

१३ मार्च दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १३ मार्च चे दिनविशेष.
१३ मार्च दिनविशेष | 13 March in History
१३ मार्च दिनविशेष, नाना फडणवीस (चित्र: संस्कृति मंत्रालय, भारत सरकार)
नाना फडणवीस - (१२ फेब्रुवारी १७४२ - १३ मार्च १८००) पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.

जागतिक दिवस

१३ मार्च दिनविशेष रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • -

ठळक घटना (घडामोडी)

१३ मार्च दिनविशेष रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
  • १६३९: आपल्या मृत्युपश्चात ४०० ग्रंथ आणि अर्धी मालमत्ता दान केलेल्या जॉन हार्वर्डचे नाव हार्वर्ड कॉलेजला देण्यात आले.
  • १९९७: कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१३ मार्च दिनविशेष रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१३ मार्च दिनविशेष रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८००: नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री
  • १९६९: मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रेय, भारतीय गणितशास्त्रज्ञ.

गॅलरी (१३ मार्च दिनविशेष)

१३ मार्च दिनविशेष १३ मार्च दिनविशेष १३ मार्च दिनविशेष
१३ मार्च दिनविशेष
१३ मार्च दिनविशेष १३ मार्च दिनविशेष १३ मार्च दिनविशेष १३ मार्च दिनविशेष
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

मार्च महिन्यातील दिनविशेष

तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


संबंधित दुवे: सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / जानेवारी दिनविशेष

विभाग: जानेवारी दिनविशेष, फेब्रुवारी दिनविशेष, मार्च दिनविशेष, एप्रिल दिनविशेष, मे दिनविशेष, जून दिनविशेष, जुलै दिनविशेष, ऑगस्ट दिनविशेष, सप्टेंबर दिनविशेष, ऑक्टोबर दिनविशेष, नोव्हेंबर दिनविशेष, डिसेंबर दिनविशेष
विषय: मार्च

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.