Loading ...

२८ मार्चचा इतिहास

२८ मार्चचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २८ मार्चचा इतिहास.

२८ मार्च दिनविशेष | 28 March in History
२८ मार्च दिनविशेष (दिनविशेष).
TEXT - TEXT.

जागतिक दिवस

२८ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • शिक्षक दिन: चेक प्रजासत्ताक, स्लोव्हेकिया.

ठळक घटना (घडामोडी)

२८ मार्च रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
  • ८४५: व्हायकिंग सरदार राग्नार लोडब्रोकने पॅरिस शहर लुटले.
  • १७७६: हुआन बॉतिस्ता दि आन्झाने सान फ्रांसिस्कोचा किल्ला बांधायला सुरूवात केली.
  • १८५४: क्रिमियन युद्ध - फ्रान्सने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १८६२: अमेरिकन यादवी युद्ध-ग्लोरियेटा पासची लढाई - उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेचे न्यू मेक्सिकोवरील आक्रमण रोखले.
  • १९३०: तुर्कस्तानमधील कॉंस्टेन्टिनोपल व अंगोरा शहरांनी आपली नावे बदलून अनुक्रमे इस्तंबूल व अंकारा अशी ठेवली.
  • १९३९: स्पॅनिश गृहयुद्ध - जनरलास्सिमो फ्रांसिस्को फ्रॅंकोनो माद्रिद शहर जिंकले.
  • १९४१: दुसरे महायुद्ध - केप माटापानची लढाई - ॲन्ड्ऱ्यू ब्राऊन कनिंगहॅमच्या नेतृत्वाखाली रॉयल नेव्हीने तीन इटालियन युद्धनौका व दोन विनाशिकांचा धुव्वा उडवला.
  • १९७९: अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील थ्री माइल आयलंड अणुशक्ती केंद्रातील शीतक बंद पडला व त्यामुळे किरणोत्सर्गी पाणी वाफरुपे हवेतून पसरले.
  • १९७९: युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान जेम्स कॅलाहानविरुद्ध अविश्वासाचा ठराव एका मताने मान्य झाल्यावर सरकार कोसळले व संसद विसर्जित केली गेली.
  • १९९२: भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे.आर.डी. टाटा यांना भारतरत्‍न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  • १९९८: भारतीय कंपनी सी-डॅकने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
  • २००५: सुमात्रा बेटावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.७ तीव्रतेचा भूकंप.
  • २००६: फ्रान्समधील नवीन कामगार कायद्याविरुद्ध १०,००,००पेक्षा अधिक युनियन सदस्यांचे अनेक शहरात मोर्चे.
  • २००८: भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची नाबाद खेळी केली व सर डॉन ब्रॅडमन व ब्रायन लारानंतर दोन त्रिशतके फटकावणारा तिसरा फलंदाज झाला. चार वर्षांपूर्वी मार्च २९ला सेहवागने पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावांची खेळी केली होती.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२८ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८५१: बर्नार्दिनो माचादो (पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: २९ एप्रिल १९४४).
  • १८६८: मॅक्झिम गॉर्की (रशियन लेखक, मृत्यू: १८ जून १९३६).
  • १८९२: कार्नेली हेमन्स (फ्रेंच-बेल्जियन शरीरशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेता, मृत्यू: १८ जुलै १९६८).
  • १९१०: इंग्रीड (डेन्मार्कची राणी, मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००).
  • १९३०: जेरोम फ्रीडमन (भौतिकशास्त्रज्ञ, ह्यात).
  • १९४६: अलेहांद्रो टोलेडो (पेरूचा राष्ट्राध्यक्ष, ह्यात).
  • १९५३: मेल्चियोर न्डाडाये (बुरुंडीचा राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: २१ ऑक्टोबर १९९३).
  • १९६०: होजे मरिया नीव्ह्स (केप व्हर्देचा पंतप्रधान, ह्यात).
  • १९६८: नासीर हुसेन (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, ह्यात).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२८ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १९३: पर्टिनॅक्स, रोमन सम्राट.
  • १२३९: गो-तोबा, जपानी सम्राट.
  • १२८५: पोप मार्टिन चौथा.
  • १९४१: व्हर्जिनिया वूल्फ, इंग्लिश लेखिका.
  • १९४२: मिगेल हर्नान्देझ, स्पॅनिश कवी.
  • १९६९: ड्वाइट डी. आयझेनहॉवर, अमेरिकेचा ३४वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९२: आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.
  • २०००: शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ञ आणि लेखक.
  • २००६: पीटर उस्तिनोव, ब्रिटिश अभिनेता.

२८ मार्चचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



मार्च महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे मार्च महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / मार्च महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची