४ मार्च दिनविशेष - [4 March in History] दिनांक ४ मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक ४ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
विक्रांत जहाज - आय.एन.एस विक्रांत (४ मार्च १९६१ - ३१ जानेवारी १९९७) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. हे जहाज सप्टेंबर २२, १९४५ रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले. जानेवारी १९५७ च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. मार्च ४ इ.स. १९६१ रोजी ते उत्तर आयर्लंडात बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंग्डमातील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय.एन.एस. विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले. या जहाजाने इ.स. १९६५ व १९७१ सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. जानेवारी ३१, १९९७ रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले. सध्या ते वस्तुसंग्रहालयात बदलवण्यात आले आहे.
शेवटचा बदल १० मे २०२१
जागतिक दिवस
- राष्ट्रीय सुरक्षा दिवस: भारत
ठळक घटना / घडामोडी
- १४६१: वॉर ऑफ द रोझेस, एडवर्ड चौथ्याने इंग्लंडचा राजा हेन्री सहाव्याला पदच्युत केले.
- १७८९: न्यूयॉर्क शहरात अमेरिकन काँग्रेसने अमेरिकेचे संविधान अमलात आल्याचे जाहीर केले.
- १८३७: शिकागो शहराची स्थापना.
- १८६१: अब्राहम लिंकन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १८९४: चीनच्या शांघाय शहरात लागलेल्या प्रचंड आगीत १,००० इमारती भस्मसात.
- १९०२: शिकागो शहरात अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन तथा ट्रिपल-ए ची स्थापना.
- १९२१: असहयोग आंदोलनात ननकाना येथील एका गुरुद्वारामध्ये जिथे शांतीपूर्ण सभेचे आयोजन केले जात होते परंतु सैनिकांच्या गोळीबारामुळे ७० लोकांचा मृत्यू झाला.
- १९३०: दांडीयात्रेच्या सफलतेने प्रभावित भारतातील ब्रिटीश व्हाइसरॉय एडवर्ड फ्रेडरिक लिंडली वूड व महात्मा गांधींच्यात बैठक. भारतात देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रेदरम्यान पकडललेल्या राजकैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन.
- १९५१: प्रथम आशियाई खेळांचे उद्घाटन. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
- १९६१: भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.
- १९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
- २००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
जन्म / वाढदिवस
- १९२२: दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.
- १९३५: प्रभा राव, काँग्रेसच्या नेत्या.
- १९७३: चंद्र शेखर येलेती, भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक.
- १९८०: रोहन बोपन्ना, भारतीय टेनिस खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
- १८९९: ठाकुर जगमोहन सिंह, मध्य प्रदेश स्थित विजयराघवगढचे राजकुमार आणि प्रसिद्ध साहित्यकार.
- १९२५: ज्योतींद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार.
- १९२८: सत्येंद्र प्रसन्न सिन्हा, प्रसिद्ध भारतीय अधिवक्ता आणि राजनेता.
- १९३९: लाला हरदयाल, भारताचे प्रसिद्ध क्रांतिकारी आणि 'गदर पार्टी'चे संस्थापक.
- १९४८: बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
- १९८१: टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता.
- १९८५: डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, साहित्यिक.
- १९९२: शांताबाई परुळेकर, सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका.
- १९९५: सय्यदना इफ्तेखार अहमद शरीफ उर्फ इफ्तेखार, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९९९: विठ्ठल गोविंद गाडगीळ, भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी.
- २०००: गीता मुखर्जी, स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य.
- २००७: सुनील कुमार महतो, भारतीय संसद सदस्य.
- २०११: अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी. केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल.
- २०१६: पी. ए. संगमा, भारताचे राजनीतिज्ञांपैकी एक.
४ मार्च दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
मार्च महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे मार्च महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / मार्च दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय