३ मार्च दिनविशेष

३ मार्च दिनविशेष - [3 March in History] दिनांक ३ मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
३ मार्च दिनविशेष | 3 March in History

दिनांक ३ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


रंजना देशमुख - (१९५५ - ३ मार्च २०००) या एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री होत्या. १९७० - १९८० च्या दशकात अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला होता. ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा १९८० सालचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली हाच पुरस्कार त्यांच्या ‘गुपचुप गुपचुप’ या चित्रपटासाठी मिळाला. ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, ‘चानी’ हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत. १९८७ साली त्यांना झालेल्या अपघातामुळे त्यांची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. ‘फक्त एकदाच’ या मराठी नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले होते. २००० साली, मुंबई येथे हृदय बंद पडून त्यांचा मृत्यू झाला होता.


जागतिक दिवस
  • शहीद दिन: मलावी.
  • मुक्ति दिन: बल्गेरिया.
  • राष्ट्रीय सुरक्षा दिन.
  • जागतिक वन्यजीव दिन.
ठळक घटना / घडामोडी
  • इ. स. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.
  • १५७५: मुघल बादशाह अकबराने तुकारोईच्या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले.
  • १८४५: फ्लोरिडा अमेरिकेचा २७वे राज्य झाले.
  • १८७७: फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.
  • १८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
  • १९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
  • १९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
  • १९३८: सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.
  • १९३९: गांधीजींनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले.
  • १९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
  • १९७१: भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली.
  • १९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट.
  • १९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
  • २००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या शरच्‍चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
  • २००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
  • २००९: स्टेट बैंक ऑफ इंडिया ने स्मार्ट यूनिट योजनेचा प्रारंभ केला
  • २०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / मार्च
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

1 टिप्पणी

  1. छ . शिवाजी महाराज पुण्यदिन तारीख ३ मार्च आहे काय ? आणि असल्यास येथ का दर्शवण्यात आलेली नाही .
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.