दिनांक ५ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
नानासाहेब चाफेकर - (५ ऑगस्ट १८६९ - ५ मार्च १९६८) मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय होता. १९३४ साली बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
जागतिक दिवस
- -
- १०४६: पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे.
- १५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.
- १६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.
- १८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
- १९३१: महात्मा गांधी व ब्रिटीशांचे भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात गांधी-आयर्विन करार करार झाला.
- १९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
- १९९७: भारत आणि तेरा इतर देशांनी मिळून इंडियन ओशन रिम एसोसियेशन संघाची घोषणा केली
- १९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
- १९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.
- १९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
- २०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
- २००८: महाराष्ट्राचे राज्यपाल एस.एम. कृष्णा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- २००८: भारताने समुद्रावरुन जमिनीवर हल्ला करणारे 'ब्रह्मोस' मिसाइलचे सफल परीक्षण केले.
- २०१७: भारताची सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाच्या महिला कर्मचार्यांनी अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. एअर इंडियाच्या संपूर्ण महिला चालक दल असलेल्या विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा विक्रम नोंदवला.
- १९१०: श्रीपाद वामन काळे, संपादक.
- १९१३: गंगूबाई हनगळ, किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका.
- १९१६: बिजू पटनायक, ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी.
- १९२५: वसंत साठे, पाचवी, सहावी, सातवी आठवी व नववी लोकसभेचे सदस्य.
- १९३४: सोम ठाकुर, मुक्तक, ब्रजभाषेचे छंद आणि बेमिसाल लोक गीतांचे वरिष्ठ आणि लोकप्रिय रचनाकार.
- १९५९: शिवराज सिंह चौहान, 'भारतीय जनता पार्टी'चे वरिष्ठ नेता तसेच 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे' समर्पित कार्यकर्ता.
- १९७४: हितेन तेजवानी, अभिनेता.
- १५३९: नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.
- १८२७: अलेस्सांद्रो व्होल्टा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१४: शांताराम अनंत देसाई, नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक.
- १९६६: शंकरराव मोरे, साम्यवादी विचारांचे व्यासंगी नेते.
- १९६८: मार्टिन लूथर किंग.
- १९६८: नारायण गोविंद चाफेकर, समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार.
- १९८५: पु. ग. सहस्रबुद्धे, महाराष्ट्र संस्कृतीकार.
- १९८५: देविदास दत्तात्रय वाडेकर, कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक.
- १९८९: बाबा पृथ्वीसिंग आझाद, गदर पार्टीचे एक संस्थापक.
- १९९५: जलाल आगा, हिंदी चित्रपट अभिनेते.
- २०१०: जी.पी. बिर्ला, भारताचे प्रसिद्ध उद्योगपती.
- २०१७: पी. शिवशंकर, न्यायाधीश.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / मार्च | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |