गर्भातली मी कळी, घ्या मला जवळी, नका अशी धिक्कारु मला, जरी असेल मी मुलगी
गर्भातली मी कळीघ्या मला जवळी
नका अशी धिक्कारु मला
जरी असेल मी मुलगी
माझीही आहे इच्छा
पोटी जन्म घ्यावा तुझ्या
पण, वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही
अस्तित्वास नाकारता माझ्या
मलाही वाटतेच ना
आईच्या कुशीत शांत निजावे
बाबांच्या मायेत छान फुलावे
आजीच्या गोष्टी ऐकाव्या
आजोबांसोबती खेळ खेळावा
पण, तुमच्या या हट्टापायी
सारी स्वप्ने माझी विस्कटली
तुमची ही सारी स्वप्ने
माझ्याच मरणास उत्कट झाली
मी मुलगी आहे
यात माझा काय गुन्हा?
की, या गर्भातल्या कळीला
न फुलताच मारता