या उजेडाच्या दुनियेत, मन रमेनासे झाले, अन् अंधारमय रात्री, क्षण भयाण वाटू लागले
या उजेडाच्या दुनियेतमन रमेनासे झाले
अन् अंधारमय रात्री
क्षण भयाण वाटू लागले
स्वप्नांच्या दुनियेतही
जगणे कठीण होवू लागले
या उजेडाच्या दुनियेत
मन रमेनासे झाले
आकाशाकडे पाहिले तर
पायाखालील जमीन सरकण्याची भिती
जमिनीकडे पाहावे तर
आकाश निघून जाण्याची भिती
सरळ मार्गाने जावे तर
समाज डुबविण्याची भिती
अन् वाकड्यात जावे तर
जीव गमवण्याची भिती