अल्बर्ट आइन्स्टाइन - (१४ मार्च १८७९ - १८ एप्रिल १९५५) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि “त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी” इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक बनले. आइन्स्टाइन यांनी सबंध आयुष्यात एकूण ३०० वैज्ञानिक शोधनिबंध आणि १५० गैरवैज्ञानिक निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिऱ्या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आइन्स्टाइन हा शब्द वापरला जाऊ लागला.
जागतिक दिवस
१४ मार्च दिनविशेष रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- -
ठळक घटना (घडामोडी)
१४ मार्च दिनविशेष रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १८८९: फर्डिनांड फोन झेपेलिनने बलूनचा पेटंट घेतला.
- १९००: गोल्ड स्टँडर्ड ऍक्ट मंजूर झाल्यावर अमेरिकेचे चलन अमेरिकन डॉलरची किंमत सोन्याशी निगडीत झाली.
- १९१३: पहिला भारतीय बोलपट आलम आरा (हिंदी चित्रपट) मुंबईमध्ये प्रदर्शित.
- १९९४: लिनक्सची १.० आवृत्ती प्रकाशित.
- १९९८: इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१४ मार्च दिनविशेष रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८७९: अल्बर्ट आइनस्टाइन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६५: आमिर खान, बॉलिवूड अभिनेता.
- १९८६: एल्टन चिगुंबुरा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१४ मार्च दिनविशेष रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८८३: कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक.
- २०१८: स्टीफन हॉकिंग, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
गॅलरी (१४ मार्च दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मार्च महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण