२ मार्च दिनविशेष - [2 March in History] दिनांक २ मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक २ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
डॉ. काशिनाथ घाणेकर - (१९४० - २ मार्च १९८६) डॉ. काशीनाथ घाणेकर यांचे मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदान होते. मराठीशिवाय त्यांनी ‘अभिलाशा’ सारख्या हिंदी चित्रपटांत देखील उत्तम अभिनय केला आहे. डॉ. काशीनाथ घाणेकर हे व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. नाटककार वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकातील संभाजी महाराजाच्या भूमिकेने ते एक लोकप्रिय अभिनेते झाले. येथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, तुझे आहे तुजपाशी, मधुमंजरी इत्यादी नाटकात त्यांनी अभिनय केले.
जागतिक दिवस
- स्वांतत्र्य दिन: मोरोक्को.
- स्वांतत्र्य दिन: टेक्सास.
- १७९१: पॅरिसमध्ये सेमाफोर यंत्राचे प्रथमतः प्रात्यक्षिक.
- १८४४: विरेश्वर छत्रे यांनी “मित्रोदय” पत्र सुरु केले
- १८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
- १९४९: कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
- १९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.
- १९८३: आसामचे ७ जिल्हे अशांत टापू म्हणून भारत सरकारने जाहीर केले
- १९९१: तामिळ वाघांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री ठार
- १९९८: गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की गुरूच्या उपग्रह युरोपवर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.
- २००६: नवी दिल्लीत भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक परमाणु करार संपन्न झाला
- १७४२: विश्वासराव पेशवे, नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव.
- १९२५: शांता जोग, चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री.
- १९३१: राम शेवाळकर, मराठी साहित्यिक
- १९३२: बसंत सिंह खालसा, राजनीतिज्ञ
- १९८६: जयंत तालुकदार, भारतीय तीरंदाज़ खेळाडू
- १५६८: मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई.
- १७००: राजाराम महाराज, मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती.
- १९३०: डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.
- १९४९: सरोजिनी नायडू, प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी.
- १९८६: डॉ. काशीनाथ घाणेकर, मराठी चित्रपट अभिनेते.
- १९९४: पं. श्रीपादशास्त्री जेरे, धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / मार्च | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |
अभिप्राय