Loading ...
/* Dont copy */

२० मार्चचा इतिहास

२० मार्चचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २० मार्चचा इतिहास.

२० मार्च दिनविशेष | 20 March in History
२० मार्च दिनविशेष
सर आयझॅक न्यूटन - (२५ डिसेंबर १६४२ - २० मार्च १७२७) हे एक थोर इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते.वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकना वाटले, आपण वार्‍याचा वेग मोजावा. त्यांच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्‍याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्‍याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्यांचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रिजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी विचारले, "हे तू काय करतोस?" आयझॅक म्हणाले, "मी वार्‍याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब व एक इंच रुंद असलेली दुर्बीण तयार केली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे.

जागतिक दिवस

२० मार्च दिनविशेष रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • जागतिक चिमणी दिवस.

ठळक घटना (घडामोडी)

२० मार्च दिनविशेष रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
  • १६०२: डच ईस्ट ईंडिया कंपनीची स्थापना.
  • १७३९: नादीरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली.
  • १९१६: अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२० मार्च दिनविशेष रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ४३: पब्लियस ओव्हिडियस नासो तथा ओव्हिड, रोमन कवी.
  • १७२५: अब्दुल हमीद पहिला, ऑट्टोमन सम्राट.
  • १७३७: बुद्ध योद्फा चुलालोक, थायलंडचा राजा.
  • १८११: फ्रान्सचा राजा दुसरा नेपोलियन.
  • १९१५: रुडॉल्फ कर्चश्लागर, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३९: ब्रायन मुलरोनी, कॅनडाचा पंतप्रधान.
  • १९८२: टेरेंस डफिन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२० मार्च दिनविशेष रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १४१३: हेन्री चौथा, इंग्लंडचा राजा.
  • १६१९: मॅथियास, पवित्र रोमन सम्राट.
  • १७२६: सर आयझॅक न्यूटन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९३१: हर्मन म्युलर, जर्मनीचा चान्सेलर.
  • १९३४: एम्मा, नेदरलँड्सची राणी.
  • १९०९: बाळ सीताराम मर्ढेकर / बा. सी. मर्ढेकर (मराठी नवकाव्याचे प्रणेते, मराठी कवी व लेखक, जन्म: १ डिसेंबर १९०९).
  • २००४: जुलियाना, नेदरलँड्सची राणी.

२० मार्चचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



मार्च महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे मार्च महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / मार्च महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची