
मल्हारराव होळकर - (१६ मार्च १६९३ - २० मे १७६६) मल्हारराव होळकर हे मराठाशाही च्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी तसेच इंदूर संस्थानचे संस्थापक देखील होते. मल्हारराव होळकर यांना खानदेशच्या भूमीची चांगली जाण होती. बाजीराव पेशवे यांनी १७२५ मध्ये मल्हाररावांना पाचशे घोडेस्वारांचे प्रमुख नेमून त्यांच्याकडे उत्तर खानदेशाची कामगिरी दिली होती. आपला एकुलता एक मुलगा खंडेराव यांची पत्नी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून मल्हाररावांनी परावृत्त केले होते आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली होती. खंडेराव हे १७५४ मध्ये खांदेरीच्या वेढ्यात तोफेचा गोळा लागून मरण पावले होते..
जागतिक दिवस
१६ मार्च दिनविशेष रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- राष्ट्रीय लसीकरण दिन.
ठळक घटना (घडामोडी)
१६ मार्च दिनविशेष रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- ११९०: ख्रिश्चनधर्मीयांनी इंग्लंडच्या यॉर्क शहरात ज्यू व्यक्तींचे सक्तीने धर्मांतर सुरू केले. धर्मांतर न करून घेणाऱ्यांना मृत्यूदंड दिला गेला. अनेक ज्यूंनी ख्रिश्चन होण्यापेक्षा आत्महत्त्या करणे पसंत केले.
- १९२६: रॉबर्ट गॉडार्डने पहिले द्रव-इंधनचालित रॉकेट प्रक्षेपित केले.
- १९९५: अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याने अधिकृतरीत्या गुलामगिरीची प्रथा बेकायदा ठरवली.
- २००५: सम्राट कनिष्क या एर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली.
- २००७: २००७च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलँड्सच्या डान व्हान बुंगेच्या एका षटकात ६ षटकार मारले. हा विश्वचषक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील उच्चांक आहे.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१६ मार्च दिनविशेष रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १५९४: शहाजी राजे भोसले (संदर्भ: मराठी विश्वकोश,महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मृत्यू: २३ जानेवारी १६६४).
- १६९३: मल्हारराव होळकर (मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी व इंदूर संस्थानचे संस्थापक, मृत्यू: २० मे १७६६).
- १७८९: गेऑर्ग झिमॉन ओम (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ).
- १८७७: मोहम्मद रझा शाह पेहलवी (इराणचे शहा).
- १९५९: जेन्स स्टोल्टेनबर्ग (नॉर्वेचे पंतप्रधान, कार्यकाळ सन २००० ते २००१ आणि नंतर २००५ ते २०१३).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१६ मार्च दिनविशेष रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ४५५: व्हॅलेन्टिनियन तिसरा (रोमन सम्राट).
- १९४५: गणेश दामोदर सावरकर / बाबाराव सावरकर (अभिनव भारत सोसायटीचे संस्थापक, जन्म: १३ जून १८७९).
गॅलरी (१६ मार्च दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मार्च महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण