हे सांज नभाचे देणे, नितळ निळाई डोळी, त्या जास्वंदी ओठांवर, भाळते संध्या भोळी
हे सांज नभाचे देणेनितळ निळाई डोळी
त्या जास्वंदी ओठांवर
भाळते संध्या भोळी
ते निळे तुझेच डोळे
अन् जलाशयाची कांती
का थेंबांवरती उतरे
त्या श्रावणातील राती
ते पाण्यावरती संथ
येई चिंब तरंग
ती खळी तुझ्या गालावर
लेऊन सांजचे रंग
तू सांज बावरी अवघी
अन् चिंब चिंब भिजलेली
तू जाता अंधारेल
हि सांज इथे थिजलेली
डोळ्यात येई घनगर्द
दाटून तुझा हा अबोला
तू जाऊ नको ना सखये
मी उरतो निळसर ओला