२३ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २३ जून चे दिनविशेष.

जब्बार पटेल - (२३ जून १९४२) जब्बार पटेल हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आहेत.
जागतिक दिवस
२३ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- विजय दिन: एस्टोनिया.
- पितृ दिन: पोलंड.
- संत जोनास दिन: लिथुएनिया.
- राष्ट्र दिन: लक्झेम्बर्ग.
ठळक घटना (घडामोडी)
२३ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १५३२: हेन्री आठवा व फ्रांस्वा पहिल्याने चार्ल्स पाचव्याविरुद्ध गुप्त कट रचला.
- १६८३: पेनसिल्व्हेनियात विल्यम पेनने स्थानिक लेनी लेनापे जमातीशी मैत्री करार केला.
- १७५७: प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला.
- १८६५: अमेरिकन यादवी युद्ध - ओक्लाहोमातील फोर्ट टौसन येथे दक्षिणेच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली.
- १८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.
- १८९४: आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना.
- १९१९: एस्टोनियन मुक्ती युद्ध - जर्मन सैन्याची हार. एस्टोनियात हा दिवस विजय दिन म्हणून पाळला जातो.
- १९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.
- १९४०: दुसरे महायुद्ध - एडॉल्फ हिटलरने पराभूत पॅरिसला भेट दिली.
- १९५९: नॉर्वेतील स्टालहाइम शहरात हॉटेलला आग. ३४ ठार.
- १९६८: आर्जेन्टिनाची राजधानी बोयनोस एर्समध्ये फुटबॉल सामन्या दरम्यान चेंगराचेंगरी. ७४ ठार.
- १९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.
- १९७९: दुसर्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने इंग्लंडला ९२ धावांनी हरवले.
- १९८५: दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क या बोईंग ७४७ प्रकारच्या विमानात स्फोट. ३२९ ठार.
- १९९०: मोल्दाव्हियाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
- १९९६: शेखहसीना वाजेद यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदी नेमले.
- १९९८: दुसर्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
- २०१६: युनायटेड किंग्डम ने ५२% ते ४८% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२३ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८७७: नॉर्मन प्रिचर्ड (भारतीय-इंग्लिश अभिनेते, मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९२९).
- १९०१: राजेन्द्र नाथ लाहिरी (क्रांतिकारक, मृत्यू: १७ डिसेंबर १९२७).
- १९०६: वीर विक्रम शाह त्रिभुवन (नेपाळचे राजे, मृत्यू: १३ मार्च १९५५).
- १९१२: अॅलन ट्युरिंग (इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ, मृत्यू: ७ जून १९५४).
- १९१६: सर लिओनार्ड तथा लेन हटन (इंग्लिश क्रिकेटपटू, मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०).
- १९३५: राम कोलारकर (मराठी लेखक, मृत्यू: ९ ऑगस्ट २०१९).
- १९३६: कॉस्टास सिमिटिस (ग्रीक पंतप्रधान).
- १९४२: जब्बार पटेल (दिग्दर्शक).
- १९४३: व्हिंट सर्फ (अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व इंटरनेटच्या जनकांपैकी एक).
- १९७२: झिनेदिन झिदान (फ्रेंच फुटबॉलपटू).
- १९८०: रामनरेश सरवण (वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२३ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १७६१: बाळाजी बाजीराव तथानानासाहेब पेशवे (जन्म: ८ डिसेंबर १७२१).
- १८३६: जेम्स मिल (स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ, जन्म: ६ एप्रिल १७७३).
- १८९१: विल्यम एडवर्ड वेबर (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: २४ ऑक्टोबर १८०४).
- १९३९: गिजुभाई बधेका (आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, जन्म: १५ नोव्हेंबर १८८५).
- १९५३: श्यामप्रसाद मुखर्जी (भारतीय जनसंघाचे संस्थापक, जन्म: ६ जुलै १९०१).
- १९७५: प्राणनाथ थापर (भारतीय भूसेना प्रमुख जनरल, जन्म: २३ मे १९०६).
- १९८०: व्ही. व्ही. गिरी (जन्म: १० ऑगस्ट १८९४).
- १९८०: संजय गांधी (इंदिरा गांधी यांचे सुपुत्र, जन्म: १४ डिसेंबर १९४६).
- १९८२: हरिभाऊ देशपांडे (बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार).
- १९९०: हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय (चरित्र अभिनेते, जन्म: २ एप्रिल १८९८).
- १९९४: वसंत शांताराम देसाई (नाटककार, साहित्यिक).
- १९९५: डॉ. जोनस सॉक(पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ).
- २००५: डॉ. हे. वि. इनामदार (साहित्यिक).
- २०१५: निर्मला जोशी (भारतीय नन, वकील, आणि समाजसेवक, जन्म: २३ जुलै १९३४).
- २०२०: निलंबर देव शर्मा (पद्मश्री पुरस्कार विजेते डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक, जन्म: ६ ऑक्टोबर १९३१).
२३ जून दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जून महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जून महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय