छत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा

छत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा, मराठी टिव्ही - [Chatriwalichya Chatrila Mayecha Olava, Marathi TV] छत्रीवाली सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
छत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा
पावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार प्रवाहच्या छत्रीवाली या नव्या मालिकेतील मधुराची छत्रीही खूप खास आहे. या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा आहे. जीवापाड प्रेम करणारी आजी लहानपणी उन्हं डोक्यावर आली किंवा पावसाची अचानक सर आली, की तिचा पदर डोक्यावर ओढून घेत असे. या मोरपंखी दिवसांची आठवण करुन देणारी अशी ही छत्री आहे. आजीच्या पारंपरिक साड्यांच्या काठांनी ही छत्री सजवण्यात आलीय. आजीने केलेले संस्कार, तिची माया, तिचा धाक आणि तिने पुरवलेले हट्ट याचं प्रतिक म्हणजे छत्रीवालीची ही खास छत्री.

ट्रेंडी आणि काहीतरी हटके आवडणाऱ्यांना 'छत्रीवाली'ची ही छत्री नक्कीच पसंत पडेल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात छत्रीवालीच्या छत्र्यांचा ट्रेंड पहायला मिळेल यात शंका नाही. त्यासाठी नक्की पहा छत्रीवाली सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.