उकडीचे मोदक - पाककृती

उकडीचे मोदक, पाककला - [Ukadiche Modak, Recipes] अस्सल कोकणी घरगुती पद्धतीच्या उकडीच्या मोदकाची पाककृती.
उकडीचे मोदक - पाककला | Ukadiche Modak - Recipes

उकडीचे मोदक बनवितांना सर्वात महत्वाचा विषय असतो मोदकाच्या सुबक पाकळ्या त्या कशा वळायच्या हे आपण येथे व्हिडीओ स्वरूपात पाहू शकता

‘उकडीचे मोदक’साठी लागणारा जिन्नस

  • २ भांडी बासमती तांदूळ पीठ
  • २ भांडी पाणी
  • चिमूटभर मीठ
  • १ चमचा लोणी किंवा साजूक तूप
  • अर्धा चमचा साखर

‘उकडीचे मोदक’साठी लागणाऱ्या सारणाचा जिन्नस

  • १ नारळ
  • पाव किलो गूळ
  • ५० ग्रॅम खवा (आवडीनुसार)

‘उकडीचे मोदक’ची पाककृती

पुरणासाठी असणारा नारळ थोडा भाजून घ्यावा (पाणी सुटू नये म्हणून) त्यात गूळ, खवा व १ चमचा तांदूळ पीठी घालावी. याप्रमाणे पुरण आधीच तयार करून ठेवावे. २ भांडी पाणी उकळत ठेवावे.पातेल्यातील पाण्याला अर्थवट उकळी आल्यावर त्यात लोणी, साखर घालावी. नंतर पाणी ढवळून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने एकाच बाजूने ढवळावे. झाकण ठेवून वाफ आणावी. पंचा ओला करून तयार झालेली उकड गरम असतानाच मळून घ्यावी. तयार झालेल्या उकडीची पारी करुन त्यात पुरण भरावे व मोदकाचा आकार द्यावा. असे मोदक तयार करून १५-२० मिनिटे वाफवावेत.

हळदीच्या पानात वाफवल्यास उकडीच्या मोदकांस स्वाद चांगला येतो.

उकडीच्या मोदकाच्या सुबक पाकळ्या कशा वळायच्या हे खालील व्हिडिओ मध्ये पाहता येईल


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.