वट सावित्री पूजा - [Vat Savitri Pooja] सर्वसाधारणतः वटसावित्री पूजन सकाळी करावे वा दुपारनंतर करावे असे प्रश्न शास्त्र तज्ञांना स्त्रियांकडून विचारले जात आहेत.
वट सावित्री पूजेचे जे शास्त्रकर्त्यांनी कालविधान केले आहे त्यात असे म्हटले आहे की हेपूजन ज्येष्ठ पौर्णिमा तसेच ज्येष्ठ आमावास्येला करावे. भारताच्या दक्षिणेकडे हे पूजन पौर्णिमेला करतात तर पश्चिमेकडे हे पूजन आमावास्येला होतांना आढळते. वटसावित्री हे व्रत तीन रात्रींचे सांगीतले आहे. ज्येष्ठ शुद्ध द्वादशीच्या प्रदोषकाली (सायंकाळी) हे व्रत आचरण करून पौर्णिमेस पारणा करावी. या कालावधीत उपवासादि आचरण शुद्धाचरण करावे. वटासावित्री पूजाविधी चतुर्दशीयुक्त पौर्णिमेस करावा. या प्रमाणेच ज्येष्ठ पूजाविधी चतुर्दशीयुक्त पौर्णिमेस करावा. याप्रमाणेच ज्येष्ठ कृष्ण द्वादशीच्या प्रदोषकाली व्रतारंभ करून ज्येष्ठ आमावास्येला पारणा करावी हे आमावास्येस वटसावित्री व्रत करणार्यांसाठी समजावे. ह्या व्रताविषयी पौर्णिमा किंवा आमावास्या ही पूर्वविद्धा (चतुर्दशीयुक्त) घ्यावी याचे कारण आमावास्या व पौर्णिमा चतुर्दशी विद्धा होऊ नये हा नियम सावित्री व्रताला लागू नाही असे ब्रम्हवैवर्तीत वचन असल्याचे निर्णयसिंधू ग्रंथात म्हटले आहे. स्कंदपुराणातही तशी पुष्टी असल्याचे म्हटले आहे. १९ जून रोजी दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी असून त्यानंतर पौर्णिमा व विष्टिकरण (भद्रा) सूरू होत आहे. भद्रा करणाचा कालावधी अशुभ मानला जात असल्याने या कालावधित पूजा - अर्चा सुवासिनींची दाने इत्यादि करू नयेत. म्हणून यावर्षी वटसावित्री पूजन व दाने या बाबी स्त्रीयांनी १९ जून रोजी सकाळी सूर्यदयाच्या कालावधीपासून मध्यान्ही पर्यंत कराव्यात. अशा संकटसमयी वटसावित्री पूजनासाठी पौर्णिमा तिथीची आवश्यकता नाही. दाते पंचांगातही पृष्ठ क्रमांक ९० वर तसा खुलासा केलेला आहे.
शक्य असल्यास द्वादशी पासूनच तीन रात्री व शक्य नसल्यास चतुर्शीच्या रात्री पासून पारणेपर्यंत उपवास करावा. शरीर, मन व आत्मा शुद्धीचे उपाय व उपचार करावेत. १९ जूनच्या सकाळी सूर्यादयापासून मध्यान्ही (सुमारे दुपरचे १ पर्यंत) वेगवेगळ्या बांबुच्या टोपल्यामध्ये किंवा झाडाच्या पानांवर किंवा दर्भांवर सात प्रकारच्या धान्यांच्या आसनावर गणपती, ब्रम्हा, सावित्री, यम यांच्या प्रतिमा नारळ किंवा सुपारीवर स्थापन कराव्यात. सत्यवान व सावित्री या जोडीची माती किंवा पीठाची प्रतिमा करून त्यांचीही स्थापना करावी. गणपतीची आधी पूजा - अर्चा करून नंतर ब्रम्हा, सावित्री, यम, सत्यवान सावित्री यांची पंचोपचारे अथवा शोष्ठोपचारे पूजा करावी. यासोबत वटवृक्षाची वटवृक्षाच्या मूळात पाणी घातल्यानंतर पूजा करावी. पूजेत पाण्यात गंगाजळाचा उपयोग केल्यास बरे. सर्व देवतांना धूप दिप नैवेद्य प्रदान केल्यानंतर कच्च्या अखंड सुभाने वटवृक्षाला ३/५/७ या प्रमाणे प्रदक्षिणा करताना पुढील मंत्र जपावा...
वट सिंचामि त मूलं सलिलेस्मृतोपमै:।
सूत्रेण वेष्ट्ये भक्त्या गंधपुष्पाक्षतै: शुभे:॥
या नंतर सौभाग्यवतींसह इतरांना तीर्थप्रसाद व दान देवून नमस्कार करून आशिर्वाद घ्यावेत. ब्रम्हसावित्री, सावित्री, गणपतीच्या ठिकाणी रिद्धी व सिद्धी यांना तसेच सर्व सौभाग्यवती स्त्रियांना सौभाग्यवायने समर्पित करावित. त्यानंतर पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.
हे आवाहित, पूजित सर्व देवतांनो आपली आम्ही/मी यथाशक्ती, यथाज्ञाने, यथासाध्य उपचारे केलेली तुमची पूजा - अर्चा ग्रहण करा. चुकी, अपराध अज्ञानासाठी क्षमा करा. अखंड सौभाग्य सिद्धीसाठी, पती, पुत्र, पौत्र यांच्या दिर्घ आयुष्यासाठी, सुखद प्रपंचासाठी, काल सापेक्ष परमेश्वर प्राप्तिसाठी तसेच आपले सदैव सानिध्य राहण्यासाठी केलेले हे व्रत निर्विघ्नपणे सिद्धिस जावून त्याची फलप्राप्ती अखंडीत व्हावी म्हणुन आपणास प्रार्थित आहे. प्रार्थना स्विकार करून फलद्रुप करावी ही प्रार्थना.
यानंतर उपवास सोडून पारणे करावे, सविस्तर पूजाविधी व माहितीसाठी वेदवाणी प्रकारच्या ‘तुमचे पोरोहित्य तुम्हीच करा’ या ग्रंथातील पृष्ठ क्र. ९५ ते ११८ वाचा. तीन दिवसांचे व्रत करणार्यांनी उपवासादरम्यान दुध व फलाहार आवश्यकतर करावा. आरती दरम्यान शक्य व उपलब्ध असल्यास ब्रम्हसावित्रीची आरती म्हणावी.
वटपूजनासाठी वटवृक्षाची फांदी तोडणे हे शास्त्र संमत नाही. वटवृक्ष जवळ उपलब्ध नसल्यास वटवृक्षाच्या चित्राची पूजा - अर्चा करावी. पूजेत स्थापन केलेल्या वटवृक्षाच्या चित्रा भोवती प्रदक्षीणेचा वरील मंत्र म्हणत प्रदक्षीणा करीत अखंड सुताचे प्रत्येक प्रदक्षीणेनी फेरे करीत वेटोळे करावे व ते चिररूपी वडास समर्पित करावे.
इति श्री ब्रम्हार्पणमस्तु । श्री कालार्प्णमस्तु ॥ शुभंभवतु ॥