उसने हसण्याचा मज सराव जरा जरा
ना पुढे येथे सुखास वाव जरा जरा
द्यारे पाखरांस एक रिकामे घरटे
सारेच पारधी कुणी साव जरा जरा
आसवांनो अता का होता उतावीळ
अजून वेदनेस खास भाव जरा जरा
आज दुनियेची भलतीच फजिती झाली
हर चेहऱ्यात नाटकी भाव जरा जरा
दारात सगळ्यांचा मला सलाम आहे
आलो इथे मी, माझे गाव जरा जरा