२६ जुलै दिनविशेष

२६ जुलै दिनविशेष - [26 July in History] दिनांक २६ जुलै च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२६ जुलै दिनविशेष | 26 July in History

दिनांक २६ जुलै च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल १ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
२६ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • राष्ट्रीय क्रांती दिन: क्युबा.
 • स्वातंत्र्य दिन: लायबेरिया, मालदीव.
 • विजय दिन: भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).

ठळक घटना / घडामोडी
२६ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ११३९: अफोन्सो पहिला पोर्तुगालच्या राजेपदी.
 • १५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.
 • १७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.
 • १७८८: न्यू यॉर्कने अमेरिकेचे संविधान मान्य केले व त्यायोगे अमेरिकेचे ११वे राज्य झाले.
 • १८४७: लायबेरियाला स्वातंत्र्य.
 • १८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
 • १९३६: जर्मनी व इतर मित्र देशांचा स्पॅनिश गृहयुद्धात हस्तक्षेप.
 • १९४१: दुसरे महायुद्ध - जपानच्या नैऋत्य एशियातील शिरकावास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेतील जपानी मालमत्ता सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश दिला.
 • १९४५: युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत लेबर पार्टीचा विजय. विन्स्टन चर्चिलने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.
 • १९४७: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने सी.आय.ए., संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
 • १९४८: हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.
 • १९४८: आंद्रे मरी फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९५३: क्युबन क्रांतीला सुरुवात.
 • १९५३: अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यात मोर्मोन पंथाच्या फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स या बहुपत्नीत्त्व पाळणार्‍या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
 • १९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
 • १९५७: ग्वाटेमालाच्या हुकुमशहा कार्लोस कॅस्टियो अर्मासची हत्या.
 • १९५८: अमेरिकेने एक्स्प्लोरर ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
 • १९६३: सिनकॉम २ या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
 • १९६३: युगोस्लाव्हियातील स्कोप्ये शहरात भूकंप. १,१०० ठार.
 • १९६५: मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९७१: अमेरिकेच्या अपोलो १५ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
 • १९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.
 • १९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.
 • १९९९: क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.
 • १९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
 • २००५: मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
 • २००८: अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.
 • २०११: मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
२६ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८५६: जॉर्ज बर्नार्ड शॉ (नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक, मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०).
 • १८६५: रजनीकांत सेन (भारतीय कवी आणि संगीतकार, मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०).
 • १८७५: कार्ल युंग (मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ, मृत्यू: ६ जून १९६१).
 • १८९३: पं. कृष्णराव शंकर पंडित (ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक, मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९).
 • १८९४: वासुदेव गोविंद मायदेव (कवी समाजसेवक, मृत्यू: ३० ऑगस्ट १९६९).
 • १८९४: अल्डस हक्सले (इंग्लिश लेखक, मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३).
 • १०९४: एडविन अल्बर्ट लिंक (फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक, मृत्यू: ७ सप्टेंबर १९८१).
 • १९२७: जी. एस. रामचंद (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ८ सप्टेंबर २००३).
 • १९२८: इब्न-ए-सफी (भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी, (मृत्यू: २५ जुलै १९८०).
 • १९३९: जॉन हॉवर्ड (ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान).
 • १९४२: व्लादिमिर मेसियर (स्लोव्हेकियाचे पंतप्रधान).
 • १९४९: थाकसिन शिनावात्रा (थायलंडचे पंतप्रधान).
 • १९५४: व्हिटास गेरुलायटिस (अमेरिकन लॉन टेनिसपटू, मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४).
 • १९५५: आसिफ अली झरदारी (पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष).
 • १९७१: खलिद महमूद (बांगलादेशी क्रिकेटपटू).
 • १९८६: मुग्धा गोडसे (अभिनेत्री मॉडेल).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२६ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ७५०: निसेफोरस (बायझेन्टाईन सम्राट, जन्म: ३१ ऑक्टोबर ८०२).
 • १८४३: सॅम ह्युस्टन (टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष, जन्म: २ मार्च १७९३).
 • १८६७: ओट्टो (ग्रीसचा राजा, जन्म: १ जून १८१५).
 • १८९१: राजेन्द्रलाल मित्रा (बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष, जन्म: १५ फेब्रुवारी १८२४).
 • २००९: भास्कर चंदावरकर (मराठी नाट्य चित्रपट संगीतकार, जन्म: १६ मार्च १९३६).
 • २०१०: शिवकांत तिवारी (भारतीय राजकारणी, जन्म: २० डिसेंबर १९४५).
 • २०१५: बिजॉय कृष्णा हांडिक (भारतीय वकील आणि राजकारणी, जन्म: १ डिसेंबर १९३४).

दिनविशेष        जुलै महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जुलै महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.