३ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३ जुलै चे दिनविशेष.

नामदेव - (१२७० - ३ जुलै १३५०) संत नामदेव (नामदेव रेळेकर) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व हिंदुस्तानी भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.नामदेव हे ‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
जागतिक दिवस
३ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- - -
ठळक घटना (घडामोडी)
३ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- ३२४: एड्रियानोपलची लढाई.
- ५३३: ऍड डेसिममची लढाई.
- ९८७: ह्यु कापे फ्रांसच्या राजेपदी.
- १२५०: सातवी क्रुसेड - मामलुकसैन्याने फ्रांसचा राजा लुई नवव्याला पकडले.
- १६०८: कॅनडात क्वेबेक सिटी शहराची स्थापना.
- १७५४: जॉर्ज वॉशिंग्टनने फोर्ट नेसेसिटी हा किल्ला फ्रेंच सैन्याला दिला.
- १७६७: रॉबर्ट पिटकैर्नने पिटकैर्न द्वीपसमूह शोधला.
- १७७८: अमेरिकन क्रांती - ब्रिटीश सैन्याने वायोमिंग मध्ये ३६० स्त्री, पुरूष व बालकांची कत्तल केली.
- १७७८: प्रशियाने ऑस्ट्रिया विरुद्ध युद्ध पुकारले.
- १८४८: यु.एस. व्हर्जिन आयलँड्समध्ये गुलामांना मुक्ती देण्यात आली.
- १८५२: महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
- १८८४: न्यू यॉर्क शेरबाजारातील शेर्सचा निर्देशांक डौ जोन्स इंडस्ट्रीयल ऍव्हरेज प्रथम प्रकाशित.
- १८९०: आयडाहो अमेरिकेचे ४३वे राज्य झाले.
- १८९८: स्पॅनिश अमेरिकन युद्ध - अमेरिकेच्या आरमाराने सान्टियागो, क्युबा येथे स्पॅनिश युद्धनौका बुडवल्या.
- १८९८: जोशुआ स्लोक्रम या खलाशाने एकट्याने जहाजातून ११६६ दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
- १९२८: लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले.
- १९३८: इंग्लंडमध्ये मलार्ड या वाफेवर चालणाऱ्या रेल्वे ईंजिनाने ताशी २०३ कि.मी. वेगाने धावून सर्वाधिक गतीचा विश्वविक्रम केला.
- १९५२: अमेरिकेने पोर्तोरिकोचे संविधान मान्य केले.
- १९६४: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने १९६४चा नागरी हक्क कायद्यावर सही केली.
- १९७०: इंग्लंडचे डी हॅविललँड कॉमेट प्रकारचे विमान स्पेनमध्ये बार्सेलोना शहराजवळ कोसळले. ११२ ठार.
- १९७६: इस्रायेलच्या कमांडो सैनिकांनी युगांडात ओलिस असलेल्या १०५ विमानप्रवाश्यांना सोडवले.
- १९८८: अमेरिकेच्या यु.एस.एस. व्हिन्सेनेस या युद्धनौकेने इराण एर फ्लाइट ६५५ हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.
- २००१: व्लादिवोस्तोकिया एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान इर्कुट्स्क येथे कोसळले. १४५ ठार.
- २००४: थायलंडची राजधानी बँगकॉकची भुयारी रेल्वे सुरू.
- २००६: २००४ एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेला.
जन्म (वाढदिवस, जयंती)
३ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १४२३: लुई अकरावा, फ्रांसचा राजा.
- १४४२: गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
- १६८३: एडवर्ड यंग, इंग्लिश कवी.
- १७१७: जोसेफ लॅसोन, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
- १८७०: रिचर्ड बेडफोर्ड बेनेट, कॅनडाचा पंतप्रधान.
- १८८६: गुरुदेव रामचंद्र रानडे यांचा जन्म.
- १९०२: जॅक न्यूमन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९०९: भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ.
- १९२४: सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
- १९४६: लेसेक मिलर, पोलंडचा पंतप्रधान.
- १९५०: इवन चॅटफील्ड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५१: सर रिचर्ड हॅडली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५२: वासिम राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७६: हेन्री ओलोंगा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८०: हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
३ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ६८३: संत लिओ दुसरा.
- १३५०: संत नामदेव यांनी पंढरपूर येथे समाधी घेतली.
- १३५०: संत जनाबाई यांनी समाधी घेतली.
- १९१८: महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट.
- १९३३: हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३५: आंद्रे सिट्रोएन, फ्रेंच अभियंता.
- १९९६: राजकुमार, हिंदी अभिनेता.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जुलै महिन्यातील दिनविशेष
जुलै | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण
आज
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय