२५ जुलै दिनविशेष

२५ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २५ जुलै चे दिनविशेष.
२५ जुलै दिनविशेष | 25 July in History
जागतिक दिवस
२५ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • गॅलिशिया दिन: गॅलिशिया(स्पेन).
 • संविधान दिन: पोर्तोरिको.
 • प्रजासत्ताक दिन: ट्युनिसीया.

ठळक घटना / घडामोडी
२५ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ३०६: कॉन्स्टॅटाईन पहिला रोमन सम्राटपदी.
 • ८६४: इंग्लंडचा राजा टकल्या चार्ल्सने व्हाईकिंग लुटारूंपासुन संरक्षणासाठी तटबंदी उभारण्यास सुरूवात केली.
 • १५४७: हेन्री दुसरा फ्रांसच्या राजेपदी.
 • १५९३: फ्रांसचा राजा हेन्री चौथ्याने जाहीररीत्या कॅथोलिक धर्म स्वीकारला.
 • १६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले.
 • १७९७: स्पेनच्या तेनेरीफ द्वीपांवरील हल्ल्यात होरेशियो नेल्सनने ३०० सैनिक व स्वतःचा उजवा हात गमावला.
 • १७९९: नेपोलियन बोनापार्टने ईजिप्तमधील अबु किर जवळ ओट्टोमन सैन्याचा पराभव केला.
 • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकन कॉंग्रेसने जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे.
 • १८६८: वायोमिंगला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
 • १८९४: पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
 • १८९८: अमेरिकेने पोर्तोरिकोवर आक्रमण केले.
 • १९०७: कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले.
 • १९०८: किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला.
 • १९०९: लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
 • १९१७: कॅनडात आयकर लागू.
 • १९२५: सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना.
 • १९३४: ऑस्ट्रियाच्या चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या.
 • १९४३: दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीची हकालट्टी.
 • १९४४: दुसरे महायुद्ध-ऑपरेशन स्प्रिंग - तुंबळ युद्धात ५,०२१ ठार, १३,०००पेक्षा जास्त जखमी.
 • १९५२: पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले.
 • १९५६: अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
 • १९५६: नान्टुकेट द्वीपाजवळ एस.एस. ॲंड्रीया डोरीया व एस.एस. स्टॉकहोमची धुक्यात टक्कर. ॲंड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
 • १९७३: सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे अंतराळयान प्रक्षेपित.
 • १९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लॅंकेशायर येथे जन्म.
 • १९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
 • १९९४: इस्रायेल व जॉर्डनमधले १९४८पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
 • १९९५: पॅरिसच्या उपनगरी रेल्वेत स्फोट. ८ ठार, ८० जखमी.
 • १९९७: के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९९: लान्स आर्मस्ट्रॉॅंगने आपली पहिली टुर दि फ्रांस सायकल शर्यत जिंकली.
 • २०००: एर फ्रांस फ्लाइट ४५९० हे कॉॅंकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
 • २००७: प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी.

जन्म / वाढदिवस / जयंती
२५ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ११०९: अफोन्सो (पहिला) (पोर्तुगालचा राजा, मृत्यू: ६ डिसेंबर ११८५).
 • १८७५: जिम कॉर्बेट (ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक, मृत्यू: १९ एप्रिल १९५५).
 • १९१९: सुधीर फडके (गायक संगीतकार, मृत्यू: २९ जुलै २००२)
 • १९२२: वसंत बापट (कवी, वक्ते, कलावंत, संपादक, मृत्यू: १७ सप्टेंबर २००२).
 • १९२९: सोमनाथ चटर्जी (लोकसभेचे सभापती आणि माकप नेते, मृत्यू: १३ ऑगस्ट २०१८).
 • १९७८: लुईस ब्राऊन (पहिली मानव टेस्टट्यूब बेबी).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२५ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ३०६: कॉन्स्टान्शियस क्लोरस (रोमन सम्राट, जन्म: ३१ मार्च २५०).
 • १८८०: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका (समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते, जन्म: ९ एप्रिल १८२८).
 • १९७३: लुईस स्टिफन सेंट लोरें (कॅनडाचे १२वे पंतप्रधान, जन्म: १ फेब्रुवारी १८८२).
 • १९७७: कॅ. शिवरामपंत दामले (महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक, जन्म: १४ एप्रिल १९००).
 • २०१२: बी. आर. इशारा (चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक, जन्म: ७ सप्टेंबर १९३४).
 • २०१५: आर. एस गवई (भारतीय वकील आणि राजकारणी, जन्म: ३० ऑक्टोबर १९२९).

दिनविशेष        जुलै महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जुलै महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.