२८ जुलै दिनविशेष

२८ जुलै दिनविशेष - [28 July in History] दिनांक २८ जुलै च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२८ जुलै दिनविशेष | 28 July in History

दिनांक २८ जुलै च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल १ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
२८ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • स्वातंत्र्य दिन: पेरू.
 • जागतिक निसर्ग संवर्धन दिवस.
 • जागतिक कावीळ दिवस.

ठळक घटना / घडामोडी
२८ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १४९३: मॉस्को शहराचा मोठा भाग आगीत भस्मसात.
 • १५४०: दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला.
 • १७९४: फ्रेंच क्रांती - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला गिलोटिनवर मृत्युदंड.
 • १८२१: पेरूने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र जाहीर केले.
 • १९१४: पहिले महायुद्ध - ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९३०: रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
 • १९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
 • १९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
 • १९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.
 • १९४२: दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाच्या अध्यक्ष जोसेफ स्टालिनने हुकुम काढला ज्यानुसार कोणत्याही परिस्थितीत लढाईतून माघार घेणार्‍या सोवियेत सैनिकांना तत्काळ मृत्यूची शिक्षा लागू झाली.
 • १९४३: दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.
 • १९४३: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.
 • १९४५: होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९४५: अमेरिकेचे बी.२५ प्रकारचे विमान न्यू यॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींगच्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.
 • १९५०: मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९५६: मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९६३: फर्नान्डो बेलॉंडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ ते ८.२च्या दरम्यान तीव्रता असलेला भूकंप. २,४२,७६९ ठार, १,६४,८५१ जखमी.
 • १९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.
 • १९८०: फर्नान्डो बेलॉंडे टेरी परत पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९८४: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
 • १९८५: ऍलन गार्शिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९०: आल्बेर्तो फुजिमोरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९५: आल्बेर्तो फुजिमोरी दुसर्‍यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.
 • १९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.
 • २०००: आल्बेर्तो फुजिमोरी तिसर्‍यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • २००१: अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • २००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
 • २०१७: पनामा पेपर्सद्वारे उजेडात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षे निवडलेले पद घेण्यापासून बंदी घातल्यावर तेथील पंतप्रधान मियॉं नवाझ शरीफने राजीनामा दिला.

जन्म / वाढदिवस / जयंती
२८ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९०७: अर्ल टपर (टपर वेअरचे संशोधक, मृत्यू: ३ ऑक्टोबर १९८३).
 • १९२५: बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग (हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक, मृत्यू: ५ एप्रिल २०११).
 • १९२९: जॅकलिन केनेडी (जॉन एफ. केनेडी यांच्य पत्नी, मृत्यु: १९ मे १९९४).
 • १९३६: सरगॅरी सोबर्स (वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज).
 • १९४५: जिम डेव्हिस (अमेरिकन व्यंगचित्रकार, मृत्यु: २६ एप्रिल १९८१).
 • १९५४: ह्युगो चावेझ (व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: ५ मार्च २०१३).
 • १९७०: पॉल स्ट्रँग (झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२८ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ४५०: थियोडॉसियस दुसरा (पवित्र रोमन सम्राट, जन्म: १० एप्रिल ४०१).
 • १७९४: मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे (फ्रेंच क्रांतिकारी, जन्म: ६ मे १७५८).
 • १८४४: जोसेफ बोनापार्ते (नेपोलियनचा फ्रेंच, जन्म: ७ जानेवारी १७६८).
 • १९३४: लुइस टँक्रेड (दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू, जन्म: ७ ऑक्टोबर १८७६).
 • १९६८: ऑटो हान (नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ, जन्म: ८ मार्च १८७९).
 • १९७५: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर (चित्रपट दिग्दर्शक, जन्म: २६ नोव्हेंबर १९२३).
 • १९७७: पंडितराव नगरकर (गायक आणि अभिनेते, जन्म: २६ डिसेंबर १९१०).
 • १९८१: बाबूराव गोखले (नाटककार, (जन्म: १९ सप्टेंबर १९२५).
 • १९८८: सैद मोदी (राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे, जन्म: १९६२).
 • २०२०: कोंडाला राव (भारतीय तेलगू अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक, जन्म: ११ फेब्रुवारी १९३२).

दिनविशेष        जुलै महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जुलै महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.