११ जुलै दिनविशेष

११ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ११ जुलै चे दिनविशेष.
११ जुलै दिनविशेष | 11 July in History
जागतिक दिवस
११ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस


ठळक घटना / घडामोडी
११ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १३४६: लक्झेंबर्गचे चार्ल्स पाचवे पवित्र रोमन सम्राटपदी.
 • १४०५: चीनचे ‘झ्हेंग हे’ हे जहाजांचा तांडा घेउन जग धुंडाळायला निघाले.
 • १५७६: मार्टिन फ्रोबिशरला लांबून ग्रीनलॅंडचा किनारा दिसला.
 • १६५९: ‘अफझल खान’शी मुकाबला करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ ‘राजगड’वरून निघून ‘प्रतापगड’ येथे पोचले.
 • १७५०: कॅनडातील हॅलिफॅक्स शहर आगीत भस्मसात.
 • १८०१: फ्रेंच खगोलविद जॉन लुई पॉन याने पॉन धूमकेतूचा शोध लावला.
 • १८०४: अमेरिकेच्या उपराष्ट्रपती एरन बरने अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टनला द्वंद्वयुद्धात ठार केले.
 • १८११: इटलीच्या आमादिओ ऍव्होगाड्रोने आपला वायुच्या अणुरचनेचा सिद्धांत प्रकाशित केला.
 • १८५९: चार्ल्स डिकन्सची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी प्रकाशित.
 • १८८९: मेक्सिकोतील तिहुआना शहराची स्थापना.
 • १८९३: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.
 • १९०८: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली..
 • १९१९: नेदरलॅंड्समध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.
 • १९२१: मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य.
 • १९३०: ऑस्ट्रेलिया चेसर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.
 • १९४०: हेन्री फिलिप पेटैं विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९५०: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.
 • १९५५: अमेरिकेने आपल्या चलनावर इन गॉड वी ट्रस्ट (देवावर आमचा विश्वास आहे) असे मुद्रित करण्याचे ठरवले.
 • १९५७: करीम हुसेनी आगाखान इस्माइलीपंथाच्या प्रमुखपदी.
 • १९६०: हार्पर लीची टु किल ए मॉकिंगबर्ड ही कादंबरी प्रकाशित.
 • १९७१: चिलीने तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण केले.
 • १९७३: ब्राझिलचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिस ओर्लि विमानतळावर कोसळले. १३४ पैकी १२३ प्रवासी ठार.
 • १९७५: चीनमध्ये इ.स.पू. तिसर्‍या शतकातील चीनी मातीच्या ६,००० मुर्ती असलेली दफनभूमी सापडली.
 • १९७८: स्पेनमध्ये प्रवाहीकृत वायू घेउन चाललेल्या ट्रकला अपघात. २१६ ठार.
 • १९७९: अमेरिकेचे अंतराळस्थानक स्कायलॅब पृथ्वीवर कोसळले.
 • १९८२: फुटबॉल विश्वकपच्या अंतिम सामन्यात इटलीने पश्चिम जर्मनीला ३-१ असे पराभूत केले.
 • १९८३: इक्वेडोरमध्ये बोईंग ७२७ प्रकारचे विमान कोसळले. ११९ प्रवासी ठार.
 • १९९१: नायजेरिन एरवेझने भाड्याने घेतलेले नेशनएरचे डी.सी.८ प्रकारचे विमान जेद्दा येथे कोसळले. २६१ प्रवासी ठार.
 • १९९४: पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
 • १९९५: अमेरिका व व्हियेतनाममध्ये राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित.
 • १९९५: स्रेब्रेनिकाची कत्तल - युगोस्लाव्हिया व बॉस्नियाच्या सैन्याने स्रेब्रेनिका शहर काबीज केले व ८,००० व्यक्तींना ठार मारले.
 • १९९५: क्युबाना दि एव्हिएशनचे ए.एन.२४ प्रकारचे विमान कॅरिबियन समुद्रात कोसळले. ४४ ठार.
 • २००१: आगरताळाते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.
 • २००३: १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.
 • २००४: सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.
 • २००६: मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
११ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८८९: नारायण हरी आपटे (कादंबरीकार, चित्रपट कथालेखक, मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१).
 • १८९१: परशुराम कृष्णा गोडे (प्राच्यविद्या संशोधक, मृत्यू: २८ मे १९६१).
 • १९२१: शंकरराव खरात (दलित साहित्यिक, मृत्यू: ९ एप्रिल २००१).
 • १९३४: जियोर्जियो अरमानी (जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक).
 • १९५३: सुरेश प्रभू (केंद्रीय मंत्री).
 • १९५६: अमिताव घोष (भारतीय-अमेरिकन लेखक आणि साहित्यिक).
 • १९६७: झुम्पा लाहिरी (भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
११ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९८९: सर लॉरेन्स ऑलिव्हिये (ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक निर्माता, जन्म: २२ मे १९०७).
 • १९९४: मेजर रामराव राघोबा राणे (परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी, जन्म: २६ जून, १९१८).
 • २००३: सुहास शिरवळकर (कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक, जन्म: १५ नोव्हेंबर १९४८).
 • २००९: शांताराम नांदगावकर (गीतकार, जन्म: १९ ऑक्टोबर १९३६).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जुलै महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.