Loading ...
/* Dont copy */

गुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस (सण-उत्सव)

गुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस (सण-उत्सव) - [Guru Pournima, Festival] आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस.

गुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस (सण-उत्सव)

आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस


गुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस (सण-उत्सव)

आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच आहे ते गुरु आणि सद्गुरु यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरुचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरुंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे.



आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत. मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरुकुलात गुरुंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरु असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरु.

अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरुतत्त्व आपण अनुभवत असतो.

खरं पूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे.

सद्गुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरु पूजन.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरु आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्य दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत.

सद्गुरु सारीखा असता पाठीराखा ।
इतरांची लेखा कोण करी ॥

किंवा

सद्गुरु वाचोनी सापडेना सोय ।
धरावे जे पाय आधी आधी ॥

ही आपल्या मनावर केलेली खोल नोंदणी आहे. गुरुशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत.

उदाहरणार्थ: व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ.

ह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे. नारळ हार पेढे शाल गुरुंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं गुरुंना केलेत नमन. त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती.

असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरु आशिषामधून गुरुतत्त्व कृपावर्षाव करत असते. त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ह्याचं उदाहरण म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरुकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य.

गुरुवंदनांत गुरु नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी.

महर्षी व्यास ह्यांना जगद्‌गुरु मानतात. त्यामुळेच कांही जण ह्या गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात.

गुरुला अनन्य भावे शरण जाणाऱ्या. गुरु महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की...

सद्गुरु साईखा असता पाठीसारखा ।
इतरांची लेखा, कोण करी ।

- स्वाती खंदारे

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची