Loading ...

१९ ऑगस्ट दिनविशेष

१९ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १९ ऑगस्ट चे दिनविशेष.

१९ ऑगस्ट दिनविशेष | 19 August in History

जागतिक दिवस

१९ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • -

ठळक घटना (घडामोडी)

१९ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • १६६६: दुसरे ॲंग्लो-डच युद्ध-होम्सची होळी - रियर ॲडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलॅंड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.
  • १६९२: सेलम विच ट्रायल्स - चेटूकविद्येचा वापर करीत असल्याच्या आरोपावरून सेलम, मॅसेच्युसेट्स येथे एक स्त्री एक धर्मगुरू सहित पाच व्यक्तींना मृत्युदंड.
  • १८३९: जाक दग्वेरेने आपल्या फ्रेंच विज्ञान अकादमीला छायाचित्र तयार करून दाखवले.
  • १८५६: गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट.
  • १९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९३४: जर्मन जनतेने ८९.९% मतांनी फ्युह्रर हे पद निर्माण करण्याचे ठरवले.
  • १९४४: दुसरे महायुद्ध - दोस्त सैन्याच्या साथीने पॅरिसमधील जनता जर्मनीविरुद्ध उलटली.
  • १९४५: हो चि मिन्ह व्हियेतनाममध्ये सत्तेवर.
  • १९५३: सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचे सरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीला सत्तेवर बसवले.
  • १९५५: हरिकेन डायेनने अमेरिकेच्या ईशान्य भागात २०० बळी घेतले.
  • १९८०: सौदी अरेबियातील रियाध शहराच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया फ्लाइट १६३ हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार प्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार.
  • १९८१: अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी सिद्राच्या अखातात लिब्याची दोन सुखॉई एस.यु. २२ प्रकारची विमाने पाडली.
  • १९८७: युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला.
  • १९९१: सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
  • २००२: ग्रॉझ्नीजवळ चेच्न्याच्या सैन्याने रशियाचे एम.आय. २६ प्रकारचे हेलिकॉप्टर पाडले. ११८ सैनिक ठार.
  • २००३: इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूत सर्जियो व्हियैरा डि मेलोसह २२ ठार.
  • २००३: जेरुसलेममध्ये हमासने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ७ मुलांसह २३ ठार.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१९ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८७१: ऑर्व्हिल राईट (विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते, मृत्यू: ३० जानेवारी १९४८).
  • १८८३: होजे मेंडेस काबेसादास (पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष आणि पोर्तुगालचे पंतप्रधान, मृत्यू: ११ जून १९६५)
  • १८८६: नरकेसरी बॅरिस्टर मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर (स्वातंत्र्यसैनिक व वकील, मृत्यू: २ जानेवारी १९३५).
  • १९०३: गंगाधर देवराव खानोलकर (मराठी लेखक, मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)
  • १९०७: सरदार स्वर्ण सिंग (केंद्रीय मंत्री, मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९४).
  • १९१८: शंकरदयाळ शर्मा (भारताचे माजी राष्ट्रपती व माजी उपराष्ट्रपती, मृत्यू: २६ डिसेंबर १९९९).
  • १९२१: जीन रॉडेनबेरी (स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते, मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९१).
  • १९२२: बबनराव नावडीकर (मराठी गायक, मृत्यू: २८ मार्च २००६).
  • १९४६: बिल क्लिंटन (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, हयात).
  • १९५९: संजय सूरकर (भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक, मृत्यू: २७ सप्टेंबर २०१२).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१९ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १४९३: फ्रेडरिक तिसरा (पवित्र रोमन सम्राट, जन्म: २१ सप्टेंबर १४१५).
  • १६६२: ब्लेझ पास्कल (फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी, जन्म: १९ जून १६२३).
  • १९४७: ऍल्सिदे दि गॅस्पेरी (इटलीचा पंतप्रधान, जन्म: ३ एप्रिल १८८१).
  • १९७५: डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे (शिक्षणतज्ञ, लेखक, पत्रकार, जन्म: १७ ऑगस्ट १९१६).
  • १९७६: केन वॉड्सवर्थ (न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू, जन्म: ३० नोव्हेंबर १९४६).
  • १९९३: उत्पल दत्त (रंगभूमी आणि चित्रपट कलाकार, जन्म: २९ मार्च १९२९).
  • १९९४: लिनस कार्ल पॉलिंग (अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, जन्म: २८ फेब्रुवारी १९०१).
  • २०००: बिनेश्वर ब्रह्मा (भारतीय कवी, लेखक आणि शिक्षक, जन्म: २८ फेब्रुवारी १९४८).

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष

विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची