Loading ...
/* Dont copy */

आजकालची कला - महाराष्ट्र

आजकालची कला, महाराष्ट्र - [Aajkalchi Kala, Maharashtra] जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये इंग्लडमधील चित्रकला विद्यालयाच्या धर्तीवरून रेखाटन, चित्रे रंगविणे आणि डिझाईन यांचे शिक्षण देण्यात येई.

आजकालची कला - महाराष्ट्र | Aajkalchi Kala - Maharashtra
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट प्रथम बांधण्यात आले तेव्हाची इमारत १८७८, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये इंग्लडमधील चित्रकला विद्यालयाच्या धर्तीवरून रेखाटन, चित्रे रंगविणे आणि डिझाईन यांचे शिक्षण देण्यात येई.

महाराष्ट्रातील चित्रे व मूर्ती यांचे सखोल निरीक्षण करता ध्यानात येते की अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत ज्या पारंपारिक कला येथे अस्तित्वात होत्या त्यांच्याशी इंग्रजी अंमलानंतर एकोणिसाव्य शतकात उदयास आलेल्या कलांचा काहीच दुवा सांधता येत नाही. तोपर्यंत एतद्देशीय कलाकार भित्तीचित्रे, लहान चित्रे, हस्तलिखिते, पटचित्रे आणि लाखेवरील कुसर हे काम करीत असत. या पारंपारिक कलाकुसरीचे नमुने अजूनही पुणे, सातारा, वाई, चांदवड, निपाणी, कोल्हापूर, सावंतवाडी, पिंगुळी आणी माहुली वगैरे ठिकाणी बघायला मिळतात. अठराव्या शतकाच्या अखेरीस जेव्हा मराठी राज्यकर्ते व त्यांचे सरदार-दरकदार यांचा पाश्चिमात्य चित्रकला व कलाकुसरीशी इंग्रजांकरवी परिचय झाला तेव्हा कलाक्षेत्रातील परिस्थितीत बदल घडून येण्यास सुरवात झली.


पुण्यातील इंग्रजी रेसिडन्सी

सवाई माधवराव पेशव्यांच्या दरबारी रेसिडेण्ट असलेल्या सर चार्लस मॅलेट यांनी पुण्यात १७९० साली पाश्चिमात्य चित्रकला भारतीयांना शिकवण्याच्या हेतूने एक संस्था सुरू केली. स्थानिक लोकांची संस्कृती व समाज यांच्यमध्ये मॅलेट यांना रस होता व म्हणून त्यांनी जेम्स वेल्स या आपल्या एका सहकाऱ्याला व चित्रकाराला एक चित्रकला विद्यालय काढण्यस उत्तेजन दिले. याच शाळेच्या पुढे नावारूपास आलेल्या गंगाराम तांबट नावाच्या एका विद्यार्थ्याने १७९४ मध्ये वेरुळ येथील लेण्यांची चित्रे काढली. टॉमस डॅनियल हा इंग्रज चित्रकार १७८६ ते९३ या काळात भारतभर सर्वत्र फिरून निरनिराळी चित्रे व रेखाचित्रे काढीत होता. त्याच्या चित्रांच स्थानिक कलाकारांवर परिणाम झाल्यावाचून राहिला नाही. अठराव्या शतकातील महाराष्ट्रीय चित्रकारांची नांवनिशी विश्वसनीयरित्या ठाऊक नसली तरी त्यांनी काढलेल्या चित्रांपैकी बरीचशी अजून सुस्थितीत असून त्यांच्यात निरनिराळ्या पाश्चिमात्य शैलींची सरमिसळ आढळते. कागदावर टेंपेरामध्ये काढलेली आढळतात. त्यांच्यावर राजस्थान, कर्नाटक व आंध्र यामधील शैलींचही परिणाम झालेला दिसतो. अठराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास काम करणारा शिवराम नामक ऐक चित्रकार व त्याचे पाच चित्रकार पुत्र सदाशिव, माणकू, तानाजी, राघो आणि अनूपराव यांची बरीचशी चित्रे आजून सापडतात; तसेचएकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीचा, नरसप्पा विजापूरकर नावाचा एक चित्रकार इतर चित्रांची नक्कल करण्यात पटाईत होता. त्याचीही नोंद आढळते. या सर्व कलाकारांनी निरीक्षण व उपजत सौंदर्यबुद्धी यांच्या सहाय्याने आपापल्या शैलीचा विकास केला.


मुंबईची चित्रकला व विद्यालय

एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीपवेतो ब्रिटिशांचे राज्य स्थिरस्थावर झालेले असून त्याची राजधानी कलकत्ता येथे होती. बिर्टिशांनी शिक्षण, कायदा, वैद्यक, दळणवळण आणि पुरातत्व या शाखात अनेक नवीन उपक्रम सुरू केलेले होते. कारागीरांसाठी एकनिर्मिती केंद्र स्थापन करण्याची कल्पना १८४५ च्या सुमारास मुंबईतील एका विणकराच्या मुलाच्या डोक्यत घोळत होती. कलांच्या उत्तेजनार्थ शाळा काढण्यात त्याला रस नसून कारागीरांना सोयि सवलती उपलब्ध करून देण्यावर भर द्यायचा होता. हे सद्‍गृहस्थ म्हणजेच जमशेटजी जीजीभाई जोत. लंडन येथे १८५१ साली भरणाऱ्या एका प्रदर्शनासाठि भारतातून पाठवायच्या वस्तूंची निवड करणाऱ्या एका मंडळावर त्यांची नेमणूक करण्यात आली. या मंडळाने पाठवलेल्या भारतीय कारागिरीच्या वस्तूंबद्दल रॅम्से यांनी उद्‍गार काढले.‘१८५१ च्या प्रदर्शनात भारतीय कारागीरांनी सर्व युरोप व अमेरिकेस आश्चर्यचकित होत; तर नाजूक कलाकुसरीच्या बाबतीत कुणी त्यांच्या पासंगालाही पुरणारे नव्हते. त्यांना जर कलाशिक्षणाचा फायदा उठवता आला तर ते सुंदर व कलात्मक वस्तू बनवण्याच्या उद्योगात आपले योग्य ते उच्च स्थान मिळवतील यात शंका नाही.’

सर जमशेटजींनी अशा प्रकारचे शिक्षण सर्व वर्गातील व सर्व जातीजमातींच्या मुलामुलींस उपलब्ध व्हावे म्हणून एक शाळा काढण्याचे पक्के करून त्यासाठी १ लाख रुपयांची देणगी देऊ केली. या शाळेत रेखाटण, रंगचित्रे, हिऱ्यांना पैलू पाडणे आणि लाकडावरील कोरीव काम या कला शिकवण्याची सोय होणार होती. जे. जे. स्कूल ऑफ आर्टने आपले दरवाजे २ मार्च १८५८ रोजी उघडले आणि हल्लीच्या इमारतीत त्याची १ एप्रिल १८७८ रोजी स्थापना झाली.

पारंपारिक भारतीय चित्रकारांना निसर्गनिरीक्षणाची विशेष क्षमता आणि चित्राच्या आंतरिक मांडणीचे उपजत ज्ञान या देणग्या मिळालेल्या होत्या. तर्कशुद्ध आणि सखोल विचाराची त्यांना जोड दिल्यावर ते कुठल्याही वस्तूला हुबेहूब चित्रात उतरवू शकत. परंतु त्याच वस्तूवर क्षणोक्षणी बदलणाऱ्या उजेड-सावलीचा खेळ किंवा निरनिराळ्या रंगछटांची सूक्ष्म हालचाल हे पैलू चित्रात उतरविण्याचे त्यांच्या स्वप्नातही आले नाही. तसेच अंतराचे यथार्थ दर्शन वा किआरोस्कुरो हेही. पाश्चिमात्य चित्रकारांच्या शैलीतील यथार्थ दर्शन व सत्याभावसत्‌ चित्रण बघितल्यावरच भारतीय चित्रकार त्या दिशेने प्रयत्न करू लागले. थिओडोर जेन्सन यांच्या चित्रांनी प्रभावित झालेल्या राजा रविवर्मा यांनी युरोपीय तैलचित्राचे तंत्र अवगत करून घेतले आणि त्याचा भारतीय - विशेषतः भारतीय पौराणिक - विषयांचे चित्रीकरण करण्यासाठी वापर केला.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट (Sir J. J. School of Art) मध्ये इंग्लडमधील चित्रकला विद्यालयाच्या धर्तीवरून रेखाटन, चित्रे रंगविणे आणि डिझाईन यांचे शिक्षण देण्यात येई. ग्रीक व रोमन पुरातन वस्तूंची छाया-प्रकाशातील चित्रे काढणे. छाया-प्रकाशाच्या व गडद-फिकट रंगाच्या निरनिराळ्या छटा रंगवणे. मनुष्याच्या चेहऱ्यावरून तसबिरी उतरवणे ही तंत्रे विद्यार्थ्यांना शिकवली गेली आणि ती त्यांनी चटकन आत्मसात केली. त्यांचे या विषयातील सर्व कसब त्यांच्या चित्रांवरून सहज ध्यानात येते. एकामेकामागील किंवा वरून वस्तू अथवा दृश्ये दाखवण्याची कला या विद्यार्थ्यांना अगदीच नवीन होती. या सर्व गोष्टी शिकता-शिकता विद्यार्थ्यांना वाटू लागले की, आपल्या पारंपारिक चित्रकलेला औपपत्तिक अथवा शास्त्रीय बैठकच नसते. चित्रकला विद्यालये चालविण्याबरोबरच, कित्येक पुरातन व ऐतिहासिक कागदपत्रे, चित्रे वगैरेच्या जतना-संरक्षणाच्या किंवा नक्कल करण्याच्या योजनाही ब्रिटिशांनी हाती घेतल्या. त्यापैकी अजिंठ्याच्या भित्तिचित्रांची नक्कल करण्याचे काम जे. जे. स्कूल ऑफ आर्टकडे नेमून दिले होते.

सन १८६५ मध्ये जॉन ग्रिफिर्थ्स सजावट चित्रकार म्हणून विद्यालयात शिकवायला आले आणि १८८० मध्ये तेथेच प्राचार्य झाले. ते म्हणतात ः ‘माझ्या आठवणीतील तो एक मोठा रंजक व मजेदार अनुभव होता. हिंदू, पार्शी व गोमंतकीय विद्यार्थ्यांना या चित्रांची नक्कल करायला सांगितल्यावर मला उमजले की त्यांच्या पौर्वात्य हाताला व मनाला त्या चित्रातून जे अजिंठ्याचे मन पुरेपूर गवसले, भावले व जे त्यांनी नकलेत उतरवले ते उतरवणे तांत्रिकदृष्ट्या त्यांच्याहून कितीही श्रेष्ठ असलेल्या पाश्चात्य कलाकरांन कदापी साधले नसते.’ परंतु त्या काळच्या कलाकारांपैकी कुणालाच अजिंठ्याचे सौंदर्यशास्त्र आकर्षित करू शकले नाही. सर्वांची धाव सत्याभासवत्‌ वास्तववादाच्या पाश्चात्य तंत्राकडेच होती.

पारंपारिक कला व हुन्नर यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने भारत सरकारने दिल्लीमध्ये १९०२-०३ साली एक प्रदर्शन भरविले. भारताच्या स्थानिक व पारंपारिक कलांस हळूहळू हिणकस बनवणाऱ्या पाश्चात्य प्रभावाचा लवलेशही या प्रदर्शनातील वस्तूंमध्ये आढळणार नाही अशी काळजी घेण्यात आली होती. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने मुंबईच्या चित्रकारांचा सर्वत्र बोलबाला झाला. जी. के. म्हात्रे यांचे देवळाकडे हे चित्रे तेथे प्रदर्शित केले होते. नऊवारी साडीतील मराठी स्त्री हातात उदबत्त्यांचे तबक घेऊन देवळाला जाताना त्यात दाखवली आहे आणि चित्रविषय व मांडणी यांची हाताळणी उत्कृष्टच आहे. परंतु पारितोषिकांच्या यादीत मुंबईच्या कलाकारांची वर्णी लागली नाही.


बॉम्बे आर्ट सोसायटी

कलाकारांची संख्या जशी वाढू लागली तशी त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यासाठि एका व्यासपीठाची गरजही सर्वांना भासू लागली. हे भागविण्यासाठी १८८० मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीची स्थापना करण्यात आली. सोसायटी दर वर्षी चित्रांची प्रदर्शने भरवू लागली आणि लवकरच देशातील आर्ट सोसायट्यांमध्ये तिला मानाचे स्थान प्राप्त झाले. बॉम्बे आर्ट सोसायटीचे दर वर्षीचे नवे प्रदर्शन हा एक सोहळा होऊन बसला. विसाव्या शतकातील सर्व महत्त्वाच्या चित्रकारांना या सोसायटीच्या प्रदर्शनात स्थान मिळालेले आहे आणि सोसायटीचे सुवर्णपदक मिळणे हा कलाकाराच्या जीवनाचा एक मानबिंदू समजला जातो.


नवी माध्यमे - नवे विषय

तैलरंग आणि जलरंग ही नवी माध्यमे ब्रिटिशांनी भारतीयांना शिकवली. यापूर्वी डिंकात वा सरसात मिसळलेले जलरंग टेम्पेरामध्ये वापरले जात असत. पण केवळ जलरंगाची पातळ पारदर्शक झाक देण्याचे तंत्र भारतीय चित्रकार फारसे वापरताना आढळत नसत. तैलरंग भारतात तर कुठेच प्रचलित नव्हता. या दोन नव्या माध्यमांबरोबर नवे विषयही ब्रिटिशांबरोबरच येथे आले. हस्तिदंतावर वा कागदावर रंगवलेली लहानशी व्यक्तिचित्रे मुबलक असली तरी वास्तव आकाराच्या तसबिरी येथे काढल्या जात नसत. स्थिरचित्रे, निसर्गदृश्ये आणि तसबिरी यांचाही आढळ ब्रिटिशांच्या प्रभावामुळेच होऊ लागला. मुंबईच्या विद्यालयात शिकलेल्या कलाकारांची तसबिरी व Genre Painting मध्ये विशेष गती असते असे मानले जाई. विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकात Genre Painting च्या प्रांतात महाराष्ट्रीय कलाकारांची संख्या मोठी होती. पेस्तनजी बोमनजी, धुरंधर, त्रिनदादे, मुलर, सरदेसाई, तासकर, पानवलकर ही या क्षेत्रातील काही नामांकित मंडळी.

सन १८९६ ते १९१८ च्या दरम्यान मुंबईच्या चित्रकला विद्यालयाचे प्राचार्य असणारे सेसिल बर्न्स हे स्वतः निष्णात निसर्ग चित्रकार होते. याचा परिणाम त्यांच्या विद्यार्थ्यांवर झाल्यावाचून राहिला नाही आणि त्यांच्यातील काहीनी या कलेत विशेष नैपुण्य मिळवले. जलरंगातील तसबिरींच्या तंत्रात एस. एल. हळदणकरांचा हात धरणारा कलाकार शोधून सापडायचा नाही. त्यांनी स्वतःचीच शैली निर्माण केली व त्यायोगे अती हळूवार छटा वापरून एक काव्यमय परिणाम ते साधू शकले. ही शैली आत्मसात करणे वा तिची नक्कल करणे कुणालाच जमले नाही. म्हटलेच तर त्यांचा मुलगा गजानन तेवढा त्यांच्या जवळपास पोचू शकला.


निसर्गदृश्ये

१९२० ते ४० या दोन दशकात जलरंगातील चित्रे रंगवण्याची कला अगदी उच्च बिंदूला जाऊन पोचली. सर्व महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी चित्रकार या माध्यमात अति उत्कृष्ट चित्रे काढीत होते. त्यांतील काही नांवे अशीः हळदणकर, आगास्कर, तासकर, पिठावाला, परांडेकर, माळी आणि मुलर हे मुंबईचे; आबालाल रहमान, माधवराव बागल, वडुंगेकर, चन्द्रकान्त मांढरे, एस. एन. कुळकर्णी हे कोल्हापूरचे; व्ही. जी. कुलकर्णी नाशिकचे; दीक्षित आणि पुरण पुण्याचे; जांभळीकर सांगलीचे; आणि पेडणेकर मालवणचे. डी. जे. जोशी, देवळालीकर आणि बेंद्रे हे इंदूरकरही मुंबईच्या चित्रकलेने प्रभावित झाले होते हे खास. कोल्हापूरचे आबालाल रहमान यांचे नांव जरी फारा ऐकण्यात नसले तरी ते त्यांच्या काळापेक्षा फार पुढे गेलेले होते. उपजत ज्ञान व प्रयोगशीलता यामुळे त्यांनी स्वतः जी एक शैली निर्माण केलि तिची तुय्लना तांत्रिकदृष्ट्या एकोणिसाव्या शतकातील इंग्रजी चित्रकार जॉन कॉन्स्टेबल व फ्रेंच चित्रकार आल्परेड सिस्ली यांच्या शैलीशी होऊ शकेल. जलरंगाच्या अनेक पातळ थरांच्या झाकीतून एक गूढ परिणाम साधण्याचे तंत्र नगरकर व चिमुळकर यांनी आत्मसात केले, तर त्यांनी त्या शैलीमध्ये मोठ्या आकाराच्या ज्या तसबिरी रेखाटल्या त्यांचा परिणाम उल्लेखनीय होता. अहिवासी या चित्रकाराने पारंपारिक रजपूत चित्रकलेतील काव्यमयता आपल्या चित्रांत आणण्याकडे लक्ष केंद्रीत केले व त्यासाठी त्यांनी जलरंग डावलून पारंपारिक टेपेरा तंत्राचाच उपयोग केला.

अलीकडच्या बऱ्याचशा चित्रकारांनी श्रेष्ठ युरोपीय चित्रकारांच्या चित्रांनाच आपले स्फूर्तिस्थान मानले आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा या कलाकारांच्या मूळ कलाकृती नजरेखालून घालण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. सन १९३० च्या सुमारास प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये लंडनच्या ब्रिटिश कलोनियल आर्ट सोसायटीच्या सदस्यांच्या जलरंग चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तर मुंबई बंदरात आलेल्या एका रशियन प्रवासी जहाजाच्या दिवाणखान्यात काही रशियन चित्रकारांची जलरंग चित्रे मांडण्यात आली होती. या सर्व परदेशी चित्रातून मुंबईच्या चित्रकारांना जलरंगातील जादूचा खरा साक्षात्कार झाला. प्रथमच त्यांना जलरंगातील मोठमोठी चित्रे, निसर्गदृश्ये, तसबिरी, फुले-पाने, लोक, मिरवणुकी व सोहाळे बघायला मिळाली. खऱ्या चित्रकारांनी त्यांतील मुख्य तांत्रिक मुद्दे केव्हाच आत्मसात केले तर कामचलाऊ कारागीरांनी नकला करण्यवरच समाधान मानले.


तसबिरी

या क्षेत्रातही महाराष्ट्रातील चित्रकारांनी मुंबईतील आणि इतर ठिकाणाच्या - आपला कायम ठसा उमतवला. अवनींद्रनाथ टागोरांनी भारतीय परंपारिक शैलीत काढलेल्या शहाजनहानची अखेर या चित्रास पारितोषिक मिळून सुद्धआ बंगाली पुनरूज्जीवन चळवळीचा महाराष्ट्रीय कलाकारांवर फारसा प्रभाव पडला नाही आणि विद्यायलयाचे प्राचार्य ग्रिफिथ्स्‌, ग्रीनवूडा, बर्न्स आणि त्यांच्यानंतरने ग्लॅडस्टन सॉलोमन यापैकी कुणालाच विद्यार्थ्यांना भारतीय पारंपारिक शैली हाताळायल उद्युक करण्यात फारसे यश आले नाही. विसाव्य शतकाची पहिली तीन दशके तरई पाश्चिमात्य शैलीतील तसबिरींनीच भरलेली होती.

या काळात मुंबईच्या बऱ्याच चित्रकारांनी निरनिराळ्य़ राजेराजवाड्यांच्या तसबिरी खेचल्या व त्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनातून मांडल्या तेव्हा अर्थातच त्यांना भावी आश्रयदात्यांकडून दाद मिळाली. यापैकी पेस्तनजी बोमनजू, पिठावाला, मूलर, आगास्कर, तासकर, लालकाका, हळ्दणक्र आणि त्रिनदादे ही नावे विशेष घेण्यजोगी.

त्रिनदादे यांचि सर्व शैली अभिजात आहे. ते मूळचे गोव्याचे व म्हणून की काय, त्यांच्या रोमन कॅथालिक धर्माचाही या खास शैलीवर परिणाम झालेला आहे.त्यांच्या सखोल विचारी मनाचे प्रतिबिंब त्यांच्या तसबिरीतही दिसते. तर छाया-प्रकाशाचा ताजेपणा व रंगछटांचा निखळपणा गोवा व वेलाकेझ या स्पॅनिष चित्रकारांची आठवण करून देताअ. त्रिनदादे जसे तैलरंगात तसे हळदणकर जलरंगात. आपल्या एकमेवाद्वितीय शैलीने ते आपल्या तसबिरीत जे काव्यमय सौंदर्य भरायचे ते वर्णताच येणार नाही. या पिढीतील आणखी एक चित्रकार कोल्हापूरच्या बाबूराव पेंटरांची स्वयंभू कला तर लेनर्दो दा विंचीच्या प्रज्ञेसारखी अनेकरंगी, विविधमुखी होती. त्यांनी चित्रकला, मूर्तिकला, चित्रपट निर्मिती, फोटोग्राफी, अभियंत्रिकी शास्त्र, साऱ्यात नैपुण्य मिळवले होते. औंध, मुंबई व बडोदे येथील संग्रहालयातील पाश्चात्य तसबिरींचे नमुने बघून बघूनच केवळ ते तसबिरी काढू लागले. त्यातही त्यांना एकोणिसाव्या शतकातील इंग्रजी प्री-राफेलाइट चित्रकारांच्या रोमॅटिक शैलीबद्दल अधिक आत्मीयता वाटली.

त्यानंतर नावे घ्यायची भोसले, माळी, बेंद्रे, गुर्जर, देउस्कर, नागेशकर, अडूरकर, आचरेकर यांच्याच तसबिरीत काही विशिष खोली, दृष्टीकोनाची विशालता अढळते. भोसल्यांनी काढलेली सॉलोमन यांची तसबिर म्हणजे भारतीय तसबीअ कलेच्या प्रगतीचा एक मोठा टप्पा ठरेल. देउस्करांनी निरनिराळ्या संस्थानिकांच्या दरबारातून तसबिरी रंगविण्याचे काम केले. त्यांच्या सर्व तसबिरी शास्त्रशुद्ध व बारकाव्यांची जाण ठेवणाऱ्या होत्या. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरातल्या त्यांनी रंगविलेल्या बालगंधर्वांच्या तसबिरी उल्लेखनीय आहेत. सन १९३४ मध्ये आचरेकर इंग्लंडहून परत आले तेव्हा त्यांच्यावर व्हाइसरॉयची वास्तव आकाराची तसबीर तयार करण्याचे काम सोपवले गेले. खेरीज त्यांनी काढलेले गोलमेज परिषदेचे चित्र दिल्ली येथे त्यावेळच्या असेम्ब्ली हॉलमध्ये लावण्यात आले होते. १९५० ते ६० च्या दरम्यान नांव घेण्यजोगे तसबीर - चित्रकार होते ते असे: गजानन हळदणकर, माधव सातवळेकर, एस.बी. पळशीकर, रवीन्द्र मिस्त्री, बाबूराव सडवेलकर, जी. एन. जाधव आणि संभाजी कदम. सर्वांना तसबिरीसाठी वेळोवेळी पारितोषिके मिळाली आहेत; परंतु त्यांच्यापैकी फक्त सातवळेकर व मिस्त्री हे दोघेच या प्रांतातील नावाजलेले व्यावसायिक म्हणता येतील. चित्रकलेच्या या प्रांतात कलेच्या अंगभूत असणाऱ्या समस्या व कटकटी ध्यानात घेता आजही महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तरुण चित्रकार या क्षेत्रात आपला कुंचला राबवत आहेत याचे आश्चर्य वाटावे.


पुनरूज्जीवन

महाराष्ट्रातील आधुनिक कलांच्या विकासातमुंबई चित्रकला विद्यालयाचे प्राचार्य सॉलोमन यांचा मोठा वाटा आहे. ते स्वतः उत्कृष्ट चित्रकार होते, तसेच चोखंदळ रसिक व टीकाकारही. विद्यालयाचे प्राचार्य म्हटल्यावर ते कुशल संघटनाकार होते हेही गेगळि सांगयाला नको. पण त्यांच अतिशय आगळा गुण म्हणजे पारंपारिक भारतीय कलांवरील त्यांचे प्रेम. भारतीय कलांच्या पुनरूज्जीवनाची चळवळ प्रथम ई.बी.हॉवेल यांनी १८९६ साली, ते कलकत्त्याच्या कलाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहू लागले. तेव्हा केली. भारतीय कला विद्यार्थ्यांन या बाबतीत जागृत करण्याच्या कामी त्यांना आनंद कुमारस्वामी, सिस्टर निवेदिता आणि ओरोबिंदो यांनी हातभार लावला. या वेळेपर्यंत भारतीय कलेची ‘रंगांचे निरर्थक धब्बे- तुकडे आणि रेषेचे वेडेवाकडे ओहोळ’ अशा शब्दात अवहेलना करणाऱ्या जॉन रस्किन, मोनिअर विल्यम्स, जॉर्ज वर्डवुड, व्हिन्सेट स्मिथ आणि रॉजर फ्रॉय अशा टीकाकारांच्या अज्ञानावर प्रकाश टाकून त्यांना त्यांना चोख उत्तर देण्याचे काम या कलावंतांनी अव्याहत केले. भारतीय कला व कारागिरी यांच्यातील सौंदर्यशास्त्र सूत्रबद्ध करून लोकांस समजावून सांगण्यासाठी त्यांनी अनेक मौलिक ग्रंथ लिहिले.

पण या चळवळीला मुंबईपर्यंत पोचायला चांगली वीस वर्षे लागली. आणि तेव्हाही सॉलोमन मुंबईच्या कलाविद्यालयाचे प्रमुख नसते तर या पुनरूज्जीवनाच्या लाटेतही तेथील शिक्षक कोरडेच राहिले असते. पण सॉलोमन यांनी स्वतःच आपल्या सिद्ध लेखणीतून भारतीय कलेचा आकार, बांधणी व विचार यांच्यावर लेख लिहिण्यास आरंभ केला. त्यांनी या विषयावर एकूण सहा पुस्तके व अनेक निबंध लिहिले.

या लिखाणातून त्यांच्या चिकित्सक व बारीक नजरेचे भारतीय कलेच्या आविष्कारातील गूढरम्यता टिपण्याचे प्रयत्न सहज लक्षात येतात. तसेच भारतीय कलातील मूल्यांबद्दलचा त्यांचा आदरही आपल्याला समजतो.


मुंबई चित्रकारांचा उज्ज्वल काल

सॉलोमन यांच्या प्रयत्नामुळे लवकरच मुंबई शहर, देशातील कलाव्यापाराचे केंद्र झाले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १९२३ मध्ये मुंबई विद्यापीठाचे इंडियन रूम तयार करण्याचे महत्त्वाचे व मानाचे काम अंगावर घेऊन पार पाडले. या दालनामुळे आधुनिक भारतीय कलेचे दर्शन इंग्रजी रसिकांना झाले असे म्हणता येईल. कलात्मक अभिव्यक्तीच्या पारंपारिक व एतद्देशीय तंत्रांचे पुनरूज्जीवन करून त्यांच्यात नवा जोम भरणे आणि त्यांना पूर्वीचे स्थान पुन्हा प्राप्त करून देणे हेच आधुनिक भारतीय कलाकारांचे खरे जीवितकार्य आहे ही गोष्ट त्यावेळी सर्वांनीच मानली होती.

विद्यार्थ्यांना भितिचित्रकलेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळावे म्हणून सॉलोमन यांनी विद्यालयाचे कोनाडे सुशोभित करायला सांगितले. त्यानंतर त्यांनी चित्रकला विभागाच्या मुख्य हॉलमधील भिंतीवर २३ फूट*१२फूट असे एक प्रचंड भित्तिचित्र काढायचे योजले. त्याचे नांव होते कलादेवतेची पुनर्स्थापना. हे चित्र मूळ कॅनव्हसवर चित्रून मग भिंतीला डकवण्यात आले. या सर्व तंत्राला मॅरुफ्लॉज असे म्हणतात. हे चित्र अजूनही विद्यालयात पहायला मिळेल. त्याचप्रमाणे दिल्लीतील इम्पिरियल सेक्रेटरियटमधील भित्तिचित्रेही सॉलोमन यांच्या देखरेखीखालीच काढण्यात आली. ती एका प्रशस्त घुमटाखाली, रुंद कंगोरा आणि चिंचोळी किनार यांच्यावर रंगवलेली आहेत. १५०० चौरस फुटांच्या पृष्ठभागावर काढलेल्या या चित्रात संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, मूर्ती, स्थापत्य अशा कलांचे रेखाटन असून भारतीय कलेतिहासातील आठ काल, आठ अप्सरांच्या स्वरूपात रंगविलेले आहेत. ही चित्रे भोसले, फर्नांडिस, नगरकर, अहिवासी, गाडगीळ, जोशी, मोहित वगैरेंनी काढली आहेत. या संचात श्रीमती दावर वबाबोट या दोन स्त्री-चित्रकारही होत्या. या प्रकल्पाच्या सांगतेनंतर मुंबईच्या चित्रकारांची कीर्ती सर्वांच्या कानावर पडली व मुंबईचे चित्रकला विद्यालय आशियातले सर्व प्रथम कलाविद्यालय समजू जाऊ लागले. भारतीय पद्धतीच्या विषयनिष्ठ चित्रकलेत मुंबईचे चित्रकार बंगाली चित्रकारांच्याहून फारच सरस होते. कारण नगरकर, भोसले, अहिवासी, चिमूळकर यांनी पारंपारिक लहान चित्रांच्या तंत्राचे अनुकरण करीत बसण्याचे केव्हाच सोडून दिले होते.

सन१९३६ मध्ये चार्लस्‌ जेरार्ड यांनी मुंबईच्या चित्रकला विद्यालयाचे प्राचार्य म्हणून सूत्रे हाती घेतली आणि सॉलोमन यांनी हळुवारपणे जपलेल्या भारतीय कलातंत्राच्या पुनरूज्जीवनाच्या रोपट्याने मानच टाकली. जेरार्ड यांनी जोमाने आपल्या विद्यार्थ्यांना नवी तंत्रे, नवी साधने, रंगाचे नवनवे प्रयोग आणि पोत यांच्याकडे खेचून घेतले. त्यांनी त्यांना जाड रंगलेप आणि पॅलेटा नाईफचा रंग, लावण्यासाठी उपयोग वगैरे तंत्रे शिकविली. लवकरच पोस्ट इम्प्रेशनिझम व एक्सप्रेशनिझम यांचा विद्यार्थांनी स्वीकार केला आणि तरुण तुर्कांची एक पिढी चित्रकला क्षेत्रात उदयास आली. ए. मजीद ही काही नांवे होत. त्यांच्यातील सर्वात यशस्वी चित्रकार के. के. हेब्बर.


अमृता शेर-गिल

सन १९३७ मध्ये मुंबईच्या कलाजगतील महत्त्वाचे वर्ष. त्यावर्षीचे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक त्यावेळी फारशा नावारूपाला न आलेल्या अमृता शेर-गिल नावाच्या तरुण चित्रकर्तीला मिळाले. बुडापेस्ट येथे जन्मलेली हंगेरियन माता व शिख पिता यांच्या ह्या कन्या पॅरिसमध्ये कलाशिक्षण पूर्ण करून आलेल्या होत्या. त्यांच्या शैलीवर फान गोख, गोग व सेझान यांच्या तंत्राचा प्रभाव पडलेला होता. परंतु भारतात परत येऊन भारतातील पारंपारिक कलेचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी स्वतःची अशी खास शैली निर्माण केली. सुवर्णपदक मिळवणाऱ्या त्यांच्या ग्रुप ऑफ यंग गर्ल्स या चित्रात भारतीय व पाश्चिमात्य शैलींचा सुंदर मिलाफ साधला आहे. अमृता शेर-गिल १९४१ च्या डिसेंबर महिन्यात अवघ्या २८ व्या वर्षी मरण पावल्या.

सन १९३९ मध्ये सोसायटीचे सुवर्णपदक टाइम्स ऑफ इंडियाचे आर्ट डायरेक्टर वॉल्टर लॅंगहॅमर यांना त्यांच्या शिरीन विमादलात यांच्या तसबिरीसाठी मिळाले. प्रा. लॅंगहॅमर यांना निर्मिती वैपुल्याची देणगी मिळालेली असून त्यांच्या कलाविष्कारात स्वतंत्र ठसठशीत व अचूक रेखाटन तसेच उजळ रंगही आढळून येत. त्यांचे तंत्र एक्सप्रेशनिस्ट होते आणि पॅलेट नाईफने लावलेले रंग व कुंचल्याचे जोरकस फटकारे आश्चर्यकारकरीत्या स्वतंत्र तसेच जिवंत व सखोल होते. त्यांच्या चित्रांनी कलाकारांना एक आगळीच भाषा शिकवली.


प्रगतीशील मंडळ

स्वातंत्र्यानंतरच्या काळात मुंबईतील कलाविश्वात लक्षणीय बदल झाले. १९४६ मध्ये मुंबई कला विद्यालयाला पहिले भारतीय प्राचार्य व्ही. एस्‌. अडूरकर लाभले. परंतु याच काळात मुंबईच्या कलाकारांचा मित्र व गुरु भूमिका पार पाडण्यात विद्यालय तोकडे पडले. विद्यालयाशी काहीही संबंध नसणारे हुसेन, बेंद्रे, आरा, अलमेलकर असे मातबर चित्रकार लॅंगहॅमर, लेडन आणि श्लेसिंगर अशा युरोपीय उत्तेजकांच्या प्रोत्साहनामुळे पुढे आले. या व अशा इतर कलाकारांच्या भेटीगाठी होण्याचे स्थान आर्टिस्टस्‌ एड फंड सेंटर [पूर्वीचे बॉम्बे आर्ट सोसायटी सलून] हे होते आणि तिथे जमणाऱ्या लोकांना प्रोग्रेसिव्ह ग्रूप असे नांव १९४८ पासून पडले. हुसेन, आरा, राझा, सूझा, गाडे आणि बाक्रे ही यातील काही मोठी नावे. त्या सर्वांनीच निरर्थक भारतीयकरणा विरूद्ध बंड पुकारले होते; परंतु तशा अर्थांचे काही पत्रकबित्रक कुणी कधी काढले नाही. पी. आर. रामचंद्र राव म्हणतात की ‘तात्त्विक दृष्ट्या, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस्‌ ग्रूप एका उदयोन्मुख आंतरराष्ट्रीयत्वाचा पुरस्कर्ता आहे. आपण फक्त कलेच्या मूलतत्वांचा मानतो असेही हा ग्रूप म्हणतो, तसेच रुढीमान्य स्थापत्य, आकारक्षमतेचा मेळ आणि रेखा व रंग यांची सुसंगती यांचीही मूलतत्वे तो आदरणीय मानतो.... चित्रविषय व तंत्र या बाबतीत नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्यातून होणाऱ्या नवनिर्मितीत इतका व्यक्तिनिष्ठ गूढपणा आहे की तिला कधी कधी गोंधळाचे सरूप येते. कारण स्वतःच्या उपजत स्फूर्तीखेरीज इतर कुठल्या लादलेल्या आकाराची बांधिलकी ती मानत नाही. तिच्या अंतर्मुखातही काहीशी तोकडीच पडते हे वेगळे सांगायला नको. आणि तिचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे उघड उघड व काहीशी डोळ्यावर येणारी धडाडी. या नवनिर्मितीस कारणीभूत असणारी आव्हानात्मक प्रेरणाच या धाडसी वृत्तील सतत तारून नेत असते.’

या ग्रूपचा प्रत्येक सदस्य युरोपातल्या कुठल्या न कुठल्या नामांकित चित्रकाराच्या कलेने प्रभावित झालेला होता. राझा, सुझा आणि बाक्रे युरोपातच स्थायिक झाले आणि काही प्रदर्शनानंतर हा ग्रूप हळूहळू विस्कळीत झाला.


व्यक्तिगत शैली

सन १९४५ च्या नंतर आणि १९५५ च्या आधी काही तरुण चित्रकारांनी आपापल्या व्यक्तिगत शैलीचा चांगलाच प्रभाव पाडला. के. के. हेब्बरांनी रोजच्या जीवनातील प्रसंगनाच नव्या आकार रचनात गुंफले आणी त्यासाठी त्यांनी रंगाच्या पोताच उपयोग केला. रांझच्या एक्सप्रेशनिस्ट निसर्गदृश्यांनाही हेब्बर यांच्या पोत प्रयोगांइतकीच दाद मिळाली. शंकर पळशीकरांनी गूढ व भारतीय रचनांवर भर दिला. अलमेलकर व राइबा यासारख्या कलाकारांनी भारतीय कलेतील कसरीच्या अंगाचा आपल्या चित्रात वापर केला. १९५० च्या दशकात आपापल्या व्यक्तिगत व नव्या शैली निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या आणि कलाप्रेमींची मान्यता मिळालेल्या चित्रकारआत मोहन सामंत, गाडे , सडवेलका, हरकिशान लाल यांची नावे घ्यावी लागतील. गूढ रहस्यमय आशय असणारे सामंताचे चित्रविषय आणि अरचित रचनांनी चित्रकलेत नवाच मार्ग काढला तर सडवेलकरांनी नवकवितेचा [इलियट, रिल्कि, पाउंड व लॉरेन्स] व नव्या शास्त्रीय प्रयोगांचा आपल्या चित्रविषयांसाठी शोध घेतला. हरकिशन लाल यांनी ठळक, एक्सप्रेशनिस्टिक शैलीत निसर्गचित्रे रंगवली. गायतोंडे आपल्यातच मगन होते, पण तरीही त्यांच्यावर पॉल क्लेचा पुष्कळ प्रभाव पडला होता. त्यांची चित्रे अ‍ॅबस्ट्रॅक्ट असली तरी झंकारणाऱ्या व अप्रतिम पोताच्या रंगांनी झगमगत होती.


मुंबईचे मंडळ

प्रगतिशील मंडळाची वाताहत झाल्यावर बॉम्बे ग्रूप नामक एक नवेच कला मंडळ उदयास आले. त्यामध्ये हेब्बार, चावडा, सामंत, डी. जी. कुळकर्णी, लक्ष्मण पै, सडवेलकर आणि लाल प्रभूती चित्रकार होत. १९५७ ते ६२ च्या दरम्यान या चित्रकारांनी आपली सहा मोठ्यांनी प्रदर्शने भरवली व त्यांना भाभासारख्या इतर जाणकारांनी मनापासून दाद दिली.


इतर केंद्रे

स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईच्या चित्रकारांनी चित्रे, तंत्र व कसब या बाबतीत विशिष क्षमता दाखवली. पण जसजसे ते अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझम वगैरे आधुनिक इझमच्या मागे लागले तसतसे त्यांच्यातील हे गुण हळूहळू लोप पावले. इतर केंद्रातील कलाकारांमध्ये मात्र या तांत्रिक बाबतीत सातत्याने प्रगती झालेली दिसून आली.

मुंबईत सध्या जोमाने निर्मिती करईत असलेल्या कित्येक चित्रकारांना अजून स्वतःची शैली व स्थान निश्चित करायचे आहे. त्यांच्या पैकी ज्यांनी काहीसा वेगळेपणा आणि नवनवीन कलपना चित्रातून दाखविल्या आहेत त्यांमध्ये प्रभाकर बर्वे, लक्ष्मण श्रेष्ठ, गीव पटेल, गोपाळ आडिवरेकर, गुलझार गवळी यांचा समावेश करावा लागेल. प्रभाकर कोलत, दीपक शिंदे, विजय शिंदे आणि इतरही, काही चित्रकारंनी आपल्या विषयाच्या आशयात सुसंगतला आणि एक संघटनात्मक रचना दाखवलेली आहे.

स्त्री चितकारांमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत बी. प्रभा त्यांची निर्मिती एकसंच व विपुल आहे. लांबसडक शरीरयष्टीच्या त्यांच्य कोळणी आकर्षक वाटतात. इतर स्त्री चित्रकारात मीरा देवीदयाळ, प्रफुल्ला डहाणूकर, नलिनी मलानी, सुरुची चांद, ललिता लजमी, हेमा जोशी आणि विजू सडवेलकर यांची नावे घ्यावी लागतील. गेल्या पिढीत अंबिका धुरंधुर व अम्जेला त्रिनदादे यांनी सातत्याने निर्मिती केली खरी पण त्यांच्या नामवंत पित्यांच्या तोडीची चित्रे त्या उतरवू शकल्या नाहीत.


शिल्प मूर्तिकला

मुंबईच्या चित्रकला विद्यालयात शिकून पुढे आलेले रावबहादूर म्हात्रे हे पाश्चिमात वास्तवभासी शैलीत मूर्ती करणारे पहिले भारतीय शिल्पकार, संस्थानिकांचा आश्रय लाभल्यामुळे त्यांनी सर्व देशभर तऱ्हतऱ्हेचे स्मारक पुतळे उभारले. त्यांची सर्व माध्यमांवर पकड होती तरी संगमरवरातील त्यांचे पुतळे विशेष लक्षणीय होते. अहमदाबादेतील व्हिक्टोरिया राणीचा पुतळा हे या गुणी कलावंताच्या कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हात्र्यानंतर व्ही. पी करमरकर हेही शिल्पकलेत तितकेच निपुण होते. घोड्यावर बसलेल्या शिवाजीचा वास्तव आकाराचा पुतळा एकसंघ ओतण्याची कठिण कामगिरी यांनी यशस्वीर्रीत्या पार पादली आणि तो पुतळा आज पुण्यात पहावयाला मिळतो, संस्थानिकांनी अंगावर टाकलेले कामसोडून इतर कित्येक मूर्ती, शिल्पे व पुतळे त्यांनी केवळ स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी म्हणून घडवले. त्यांच्यापैकी कित्येक आज त्यांच्या घरी, कोकणातल्या सासवने या गावी आहेत.

गोरेगावकर, तालीम, फडके आणि जोग हे याच काळचे इतर शिल्पकार, फडक्यांचा चौपाटीवरील टिळकांचा पुतळा आणि गोरेगावकरांची पुण्यातली झाशीची राणी हे दोन्ही पुतळे जगमान्य आहेत. आर. पी. कामत यांनी जेकब एपष्टाईनचा साधेपणा आपल्या शिल्पात आणण्याचा प्रयत्न केला. पण लवकरच तो सोडूनही दिला. त्यांच्यानंतर पानसरेंनीच ती शैली प्रथम खऱ्या गंभीरपणे व मनापासून हाताळली. पानसऱ्यांनी स्थापत्यप्रधान मूर्तिकलेचा ओनामा केला आणि मुंबईतील न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स बिल्डिंगवर त्यांची या शैलीतील निर्मिती पहायला मिळते. दविअरवाला आणि पिलू पोचखानावाला यांच्या महत्त्वपूर्ण शिल्पकलेने अनेक तरुण शिल्पकार प्रभावित झालेले दिसतात.

वारखेडी व डी.जी कुळकर्णि यांच्या स्वतःच्याच रांगड्या पन अननुकरणीय शैली आहेत; तर बी. विठ्ठल यांच्यात नवनवीन माध्यमात सहजतेने यशस्वी प्रयोग करण्याची धडाडी आहे. याखेरीज सोनवडिकरांच्या नेटक्या तंत्राचाही उल्लेख करावा लागेल.

कित्येक तरुण शिल्पकार सध्या निरनिराळ्या दिशांनी धडपडत आहेत व त्यांच्या या प्रयत्नांना निर्मितीशील म्हटले तरी त्यांना अजून विचारांची सखोलता व तंत्राची सफाई साधायची आहे हेही खरेच.

स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईचे कलाविश्व झपाट्याने बदलले. या बदलास१९५२ मध्ये बांधलेली जहांगीर आर्ट गॅलरी बऱ्याच अंशी कारण झाली. सर्व देशातील कलाकारांना आपली निर्मिती येथे प्रदर्शित करण्यास त्यामुळे उत्तेजन मिळाले. त्यानंतर ताज, पुंडोल, शेमूल, सिमरोबा, बजाज अशा अनेक गॅलरी एकामागून एक उघडल्या व त्यांच्यामधून शेकडो चित्रकार आपली चित्रे प्रदर्शित करू लागले. चाहते व जाणकार यांना आपले नेत्ररंजन करण्याची ही मोठीच संधी लाभली.


कलाक्षेत्रातील सद्यःस्थिती

बंगाली पुनरूज्जीवन मोहिमेतून कुणी विशेष थोर कलाकार पुढे आले नाहीत. तसेच मुंबईचे चित्रकार आधुनिक युरोपीय कलेच्या जवळजवळ अनिवार्य प्रभावापासून स्वतःला वाचवू शकले नाहीत. आता स्वातंत्र्यप्राप्तीला तीन दशके होऊन गेली तरी भारतीय चित्रकार अजून कुठल्या रस्त्याने जावे या संभ्रमात चव्हाट्यावरच उभे आहेत. त्यांना अजून स्वत्व सापडलेले नाही. बऱ्याचशा पौर्वात्य देशातून दृश्यकलांच्या क्षेत्रात एक प्रकारची आंतरराष्ट्रीयता सापडते. अ‍ॅबस्ट्रॅक्ट किंवा आकृती विरहित चित्रकलेच्या आविष्कारात कुणा एका विशिष्ट संस्कृतीचा वा देशांचा ठसा उमटलेला सापडणे दुरापास्तव, ही वस्तुस्थिती आहे.

महाराष्ट्रीय कलाकार सातत्याने निर्मिती करीत आले असून पुष्कळदा अति उच्च अभिरूचीची कलानिर्मिती करणे आपल्याला सहजसाध्य आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. आताचे कलाकार पूर्व व पश्चिम या दोन्हीकडच्या उत्कृष्ट मूल्यांचे एकत्रीकरण करण्यात गुंतले आहेत. महाराष्ट्रीय कलाकारांचे जे अनेक गुण वाखाणण्याजोगे आहेत त्यापैकी कामसूपणा, तंत्रशुद्धता, वास्तवाद, विवशतेचा अभाव व मिरवण्याचा तिटकारा यांचा आवर्जून उल्लेख करावाया वाटतो. ब्रिटिश वाटाड्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीयीकरण स्वीकारण्याचा प्रयत्न केला. तरी त्या भारतीयत्वातील भावूक काव्यमयता त्यांनी कधी आपलीशी केली नाही. अशा परिस्थितीत ही, पुढील काही दशके काय निर्मान करतात हे बघण्यालायक असेल. पुढे काय होणार हे सांगणे अशक्य असले तरी भारतातील कलाविष्कारास पोषक पार्श्वभूमीची गरज आहे यात बिलकूल शंका नाही.

- बाबुराव सडवेलकर

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1381,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,6,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1115,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,9,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,3,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,64,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,3,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,70,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,12,निवडक,8,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,38,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,6,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1156,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,29,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,287,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,8,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,21,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: आजकालची कला - महाराष्ट्र
आजकालची कला - महाराष्ट्र
आजकालची कला, महाराष्ट्र - [Aajkalchi Kala, Maharashtra] जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये इंग्लडमधील चित्रकला विद्यालयाच्या धर्तीवरून रेखाटन, चित्रे रंगविणे आणि डिझाईन यांचे शिक्षण देण्यात येई.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCo2ROj7t4Mxr3vaeIZTmmwqV5vWarqO8od_3pumk1PdWbyTNi9t9uIfdvnuWMo31CVbiudftjkDRYqwVDnKXj8sKPdZ04YoANI6HZ-prmVF4W-Dzc-g_KR5VKU5mCt4pSAYyrReR7-dBP/s1600/sir-j-j-school-of-art-first-built-in-1878.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCo2ROj7t4Mxr3vaeIZTmmwqV5vWarqO8od_3pumk1PdWbyTNi9t9uIfdvnuWMo31CVbiudftjkDRYqwVDnKXj8sKPdZ04YoANI6HZ-prmVF4W-Dzc-g_KR5VKU5mCt4pSAYyrReR7-dBP/s72-c/sir-j-j-school-of-art-first-built-in-1878.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/aajkalchi-kala-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/aajkalchi-kala-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची