Loading ...
/* Dont copy */

मुंबई महत्त्वाची स्थळे - महाराष्ट्र

मुंबई महत्त्वाची स्थळे, महाराष्ट्र - [Mumbai Mahatvachi Sthale, Maharashtra] ब्रिटिश राजवटीने भारतीय पर्यावरणला दिलेल्या प्रतिसादाचे चिरंतन स्मारक त्या राजवटीने उभरलेल्य व मागे ठेवलेल्या स्थापत्याइतके दुसरे कोणतेही नाही.

असामान्य सौंदर्याने आणि लक्षणीय संस्कारिततेने नटलेल्या खाजगी आणि सार्वजनिक इमारती

ब्रिटिश राजवटीने भारतीय पर्यावरणला दिलेल्या प्रतिसादाचे चिरंतन स्मारक त्या राजवटीने उभरलेल्य व मागे ठेवलेल्या स्थापत्याइतके दुसरे कोणतेही नाही.

हे सर्वसाधारणपणे भारतीय उपखंडाच्या संदर्भात जेवढे खरे आहे तेवढचे त्याच्या अंगभूत भागांच्या संदर्भात देखील-जगात इतरत्र एक एक स्वतंत्र देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांना व्यापून टाकतील एवढे हे भौगोलिक घटक विस्तृत आहेत- आणि महाराष्ट्र तर त्यातील इमारती आणि स्मारके यांच्यद्वारा पृथगात्म प्रादेशिकतेचे उदाहरणच घालून देतो.

मुळातच मानवी इतिहासाची प्रभावी परिदृश्ये सादर करणाऱ्या पुरातत्त्वीय आणि स्थापत्यशास्त्रीय स्मारकांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या स्थापत्य-दर्पणात एकोणिसाव्या शतकातील भारतातील ब्रिटिश राजवटीच्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक आत्मविश्वाचे सुरेख प्रतिबिंब पडले आहे. आर्थिक सत्तेने, गव्हर्नर सर बार्टली फ्रीअर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, नव्या स्थापत्याची सर्वोत्तम उदाहरणे मुख्यतः मुंबईतच आढळतील याची काळजी घेतली. परिणामतः ‘हाय व्हिक्टोरिअन गॉथिक’ पद्धतीच्या असामान्य सौंदर्याने आणि लक्षणीय संस्कारिततेने नटलेल्या खाजगी आणि सार्वजनिक इमारतीचे इथे केंद्रीकरण झाले.

१८६० नंतर पश्चिम भारतीय पारंपारिक पाथरवटांच्या आणि शिल्पकारांच्या उत्कृष्ट कलाकौशल्याचा उपयोग यासठी केलेला असला तरी ही संस्कारितता बाह्य अंगांपुरतीच मर्यादित नव्हती. एका परक्या वातावरणात, आपल्या इतिहासाशी जुळेल अशा स्थापत्याच्या विकासासाठी ब्रिटिश बांधकामतज्ञ आणि स्थापत्यतज्ञ यांनी केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांचा हा भाग होता.

प्रतिकूल म्हणून वर्णिल्या गेलेल्या हवामानाशी आणि वाढती लोकसंख्या व उष्ण कटिबंधीय निसर्ग असलेल्या पर्यावरणाशी जुळवून घेणाऱ्या स्थापत्याच्या या परंपरेची चार सूत्रे सांगता येतील. बऱ्याच आद्य ब्रिटिशांना ही तप्त आणि उष्ण बजबजपुरीत टाकलेली भर होय असे वाटत असे. ‘ब्लॅक टाऊन’ असे भारतातील गजबजलेल्या शहरी वस्त्यांचे वारंवार केले जाणारे वर्णन - ज्यापासून कॅन्टो-मेन्टस्‌ आणि सिव्हिल लाइन्स च्या रचनाकारांनी आपली वस्ती कटाक्षाने दूर ठेवली- यातून प्रामुख्याने हा द्रुष्टीकोण व्यक्त होतो.

[next] या दुरवस्थेतून काही व्यवस्था निर्मिणे अपरिहार्य आहे असे ब्रिटिश सत्तेला वाटले. ब्रिटिश राजवटीच्या आनुक्रमिक युगातील चैतन्याची सार्वजनिक अभिव्यक्ती करण्यासाठी लष्करी अभियंते आणि सरकारी नोकरीतील, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमधील स्थापत्यतज्ञ यांच्याशिवाय कोण पुढाकार घेणार? आरंभीची रचना म्हणजे (खास लष्करी तटबंद्या वगळता) देशी गृहरचनेला सर्वत्र ‘बंगला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमाबद्ध, भक्कम आणि दर्जेदार वास्तूचा आकार दिला, ही होय. जमिनीपासून उंच जोते, त्यावर उभारलेल्या भिंती, राहण्यासाठी किंवा कचेरीच्या वापरासाठी बांधलेल्या खोल्या, चारही बाजूंना असलेल्या ओसऱ्या, आधी गवताने व पुढे बहुधा कौलांनी शाकारलेली उंच छपरे. सर्वसाधारणपणे ही वास्तु एकमजली असायची, परंतु दुसऱ्या मजल्यापर्यन्त ती अनेकदा वाढवली जायची. प्रादेशिक शैलींचा विकास झाला आणि प्रसंगांनुरूप बंगल्याची रचना अधिक संकुल व विशाल होत गेली. पश्चिम भारतातील छोट्या शहरांमध्ये या प्रारंभिक शैलीच्या खुणा शोधता येतात. वाढत चाललेल्या मुंबईत काही भव्य बंगले अजून टिकून आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळातील मलबार हिलवरील राजभवनांतर्गत बॅंक्केट हॉल हा एक रमणीय बंगला. पुण्यसारख्या नागरी वसाहती एकोणिसाव्या शतकातील लष्करी छावण्या व सुंदर खाजगी बंगल्यांनी अजूनही देखण्या दिसतात.

साम्राज्याची जसजशी भरभराट झाली तसतशी भारतातील बांधकामाने ब्रिटिश स्थापत्य प्रवाहांपासून स्फूर्ती घेतली आणि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील व रिजन्सी कालखंडाच्या पूर्वार्धातील अभिजात शैलीचा अवलंब केला यात नवल नाही. या विकासाची प्रमुख उदाहरणे म्हणजे कलकत्ता येथील अनेक प्रासादतुल्य सार्वजनिक इमारती. अभिजात परंपरेच्या खुणांचा बंगल्याच्या प्रादेशिक रूपांतरांशी जोडलेला दुवा हा संपूर्ण ब्रिटिशशासित भारतातील ब्रिटिश वास्तुकलेचा साधारण विशेष ठरला. मुंबईत याची काही उदाहरणे अजून शिल्ल्क आहेत. मेजर जॉन हॉकिन्स या रॉयल इंजिनिअर्सच्या तज्ञाने १८२० मध्ये बांधलेली सरकारी टाकसाळ, आणि कर्नल थॉमस कूपरने १८३३ मध्ये आरेखिलेली, सौंदर्यदृष्ट्या सिद्धीस गेलेली पूर्वीच्या टाउनहॉलची (सध्याच्या सेंट्रल लायब्ररीची) इमारत. सरकारी टाकसाळीच्या इमारतीत निव्वळ ‘आयोनिक’ बारकावे आढळतात, तर टाउनहॉलच्या दर्शनी भाग ‘डोरिक’ शैलीची वैशिष्टये असलेली आहे. १८६३ मध्ये या भव्य वास्तूच्या समोरच्या जागेचा वर्तुळाकार उद्यानात अंतर्भाव करण्यात आला. हे एल्फिन्स्टन सर्कल, पुढे त्यालाच हॉर्निमन सर्कल हे नवे नाव मिळाले.

टाउनहॉलच्या अर्थवर्तुळाकार पायऱ्यांवरून समोरच्या उद्यानापलीकडल्या अरबी समुद्राचे मनोहारी द्रुश्य नजरेस पडू लागले. अपोलो स्ट्रीटवरील, अठराव्या शतकाच्य उत्तरार्धातील खाजगी बंगली - पुढे ओल्ड गव्हर्नमेंट हाऊस म्हणून ख्यात - हे दुसरे उत्तम उदाहरण होय. चार्ल्स फोर्ब्‌सचे घर आणि मिलिटरी स्क्वेअर लेन, फोर्ब्‌स स्ट्रीट व के, दुबाश मार्गासमोर असलेल्या रोपवॉक लेन यामधल्या अनेक अठराव्या शतकातील इमारतीचे जतन करण्याची गरज आहे.

[next] भारतातील एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील चर्चेसमधून या अभिजात प्रेरणेचा प्रत्यय येतो. १८१८ मध्ये बांधलेल्या सध्याच्या डॉकयार्डसमोरच्या सेंट अ‍ॅण्ड्रयूज चर्चमध्ये, तसेच १८३५ मध्ये पूर्ण झालेल्या भायखळ्यच्या ख्राइस्ट चर्चमध्ये, जॉर्जियन शैली स्पष्ट दिसते. १८२५ मध्ये बिशप हेबर यांनी ठाण्याचे सेंट जेम्स व घोरपडी, पुणे येथील दक्षिणेतले अत्यंत जुने चर्च, सेंट मेरी द व्हर्जिन, या जॉर्जियन चर्चसाचे उद्‌घाटन केले. या जॉर्जियन रचनेतील अंतर्भाग मनोवेधक आहे. आतला प्रकाश दुपदरी काचांनी परिवर्तित केलेला असून, भिंतींवर जतन केलेया पलटणीच्या फाटक्या पताकांमुळे सभोवतालच्या वातावरणातील हुरहुर अधिकच वाढलेली आहे. कर्नल ट्रॉटर या रॉयल इंजिनिअर्सपैकी अभियंत्याने पूर्वेकड्च्या खिडकीची रंगीत काचांमध्ये रचना केली. १९८२ मध्ये छपरावरच्या मनोऱ्याचे नूतनीकरण झाले.

अनेक प्रकारच्या शैलीचे मिश्रण असलेले, मुंबईतले सर्वात जुने चर्च, सेंट थॉमस कॅथीड्रल १७१८ मध्ये वापरासाठी सिद्ध झालेले होते. या मिश्र शैलीचा कळस १८३८ मध्ये बांधलेल्य गॉथिक टॉवरमध्ये दिसतो, आणि आतला गॉथिक चान्सल हा भाग शासकीय स्थापत्यविशारद जेम्स ट्रबशॉ यांनी केलेल्या नूतनीकरणाचा भाग होय. या नूतनीकरणातून जाणवणाऱ्या गुणातेच्या कसोशीची फार थोड्यांना कल्पनाअसेल. ब्रिटनमधील विख्यात स्थापत्यतज्ञ विलम बटरफीलड यांची या चान्सलच्या फरसबंदीचे रेखाटन करण्यासाठी निवड केली होती. परंतु काटकसरीच्या धोरणामुळे बटरफील्ड यांच्या १८७२ मधल्या मूळ फरसबंदीच्या रेखाटनाचा फार थोडा भाग प्रत्यक्षात आणता आला. दुसरे नामवंत व्हिक्टोरियन स्थापत्यतज्ञ सर गिल्बर्ट स्कॉट यांनी कॅथीड्रलच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या गॉथिक कारंज्याचे रेखाटन केले.

मुंबई, जगात सर्वत्र ‘बॉम्बे’ म्हणून ओळखली जाणारी, एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश सत्तेच्या वैभकाळात भारतातली पहिली नगरी म्हणून उदयास आली. १८५० च्या मध्यास मुंबईने स्थापत्यदृष्ट्या हे स्थान मिळाविले ते त्यावेळच्या समकालीन वर्तमानात तांत्रिक, शैलीदार आणि क्रांतिकारी झेप घेऊन. १८४७ ते १८५७ च्या दरम्यान चर्चशास्त्रज्ञांनी मान्यता दिलेल्या ‘निओ-गॉथिक’ तत्त्वांनुसार जेव्हा भारतातील पहिले चर्च मुंबईत बांधले गेले आणि १८६८ च्या सुमारास मुंबईतील पहिली. लोखंडी चौकटी व तयार अर्धवट जुळवलेले सांगाडे वापरून आर. एम्‌ ऑर्डशच्या रेखाटनानुसार, आज एस्प्लनेड मॅन्शन म्हणून ओळखली जाणारी जुन्य वॉटसन हॉटेलची इमारत बांधली गेली. तेव्हा ते घडले. कुलाबा कॅन्टोनमेंटमधील शंभर वर्षाहून जास्त काळ समुदकाळी उभे असलेले सेंट जॉन्स अफगाण मेमोरियल चर्च हे आजही स्थापत्यदृष्टया महत्त्वाचे ठरते. शहराकडून आता त्याच्याकडे पहिले की त्याच्य भोवती अस्ताव्यस्तपणे उभ्या झालेल्या उंच इमारतींमुळे त्याची भव्यता काहीशी खुजी झाल्यासारखी वाटते.

[next] ब्रिटिशांच्या सार्वजनिक बांधकामाच्या धोरणाची परिसीमा ब्रिटिश राजवटीत व्हिक्टोरिअन पुनरुज्जीवित गॉथिकच्या भव्य युगांत दिसून येते. पश्चिम भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये याच्या खुणा आढळतात. परंतु जगातला अशा इमारतींचा खरा अप्रतिम संग्रह मुंबईतच दिसतो.

खुल्या बाल्कन्य, जिने, सज्जे आणि व्हरांडे असलेली. इंग्लंडमध्ये बऱ्याच पूर्वी मागे पडलेली, गॉथिक पुनरुज्जीवित शैली उष्ण कटिबंधीय भारताशी जुळणारी अशीच होती. त्यामुळे ती बराच काळ टिकून राहिली.

पश्चिम भारतातील या इमारतीपैकी बहुतेक पी. डब्ल्यू, डी. या १८५४ मध्ये बांधकामाच्या गरजा पुरवण्यासाठी स्थापन झालेल्या खात्यामार्फत बांधल्या गेल्या. बांधकाम स्थानिक साधने वापरून करण्यात आले. उदा. दक्षिणी चिरेबंदी दगड, निळा कुर्ला खडक, लाल वसई वाळूचा दगड, आणि पोरबंदर पाषाण. स्थापत्यतज्ञ इंग्रज असत; एक तर ते पी. डब्ल्यू. डी. मध्ये नोकरईस असलेले अथवा सरकारी सेवेतले अथवा प्रसंगी कराराने बांधलेले व्यावसायिक असत. त्यातले बहुतेक मुंबईचेच रहिवासी असले तरी तत्कालीन ब्रिटनमधल्या स्थापत्य-विश्वातील नव्या प्रवाहांशी त्यांचा परिचय होता. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईच्या सार्वजनिक इमारतींमध्ये त्यांनी ए. डब्ल्यू. एन. प्युगिंनचे चैतन्य ओतले. गॉथिक पुनरुज्जीवनाची अत्याधुनिक तत्त्वे आणि हिंदु-मुस्लिम स्थापत्याच्या देशीय शैलींचे त्यांचे आकलन यांचा मेळ घालून एक निराळी स्थापत्यशैली निर्माण करण्याचा त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न होता. लक्षणीय, लहान प्रमाणातील निओ-गॉथिक इमारतीत (आता जिथे डेव्हिड ससून लायब्ररी आहे) असलेल्या मेकॅनिक्स इन्स्टिट्यूटने उत्कृष्ट स्थापत्य्शास्त्रीय रेखाटनासाठी द बॉम्बे बिल्डर मध्ये पारितोषिकांची एक योजना जाहीर केली व त्याकाळच्या बौद्धिक वातावरणात भर घातली. ही गोष्टच त्या काळात स्थापत्याच्या प्रसारासाठी स्थानिक स्थिती किती अनुकूल होती याची निदर्शक आहे.

गव्हर्नर सर बार्टली फ्रीअर यांनी दिलेल्या उत्तेजनाला विशेष महत्त्व आले ते १८६२ मध्ये जेव्हा मुंबईच्या किल्ल्याच्या भिंती आणि बुरुज अखेर पाडण्यात आले तेव्हा. या मोकळ्या करण्यात आलेल्या जमिनीमुळे नव्या बांधकामाला व स्थापत्यविशारदांना संधी मिळाली. पी.डब्ल्यू. डी. आणी जुने, सैन्यदलाचा भाग असलेले, रॉयल इंजिनिअर्स यांचे १८६२ मध्ये झालेले एकीकरण हा निव्वळ योगायोग नव्हता. त्यामुळे अखिल भारतीय स्वरूपाची व्यवस्था तयार झाली. त्याच वर्षी फ्रीअरने चौदा सार्वजनिक इमारती बांधण्याची एक योजना जाहीर केली. त्यातल्या बहुतेक सुघड, भक्कम बांधणीच्या, स्थापत्यकलेचा अमूल्य वारसा देणाऱ्या इमारती आजही मुंबईला अभिमानास्पद अशा आहेत.

मुंबईची स्थापत्यकलादृष्टया सर्वोत्कृष्ट कृती विश्वमान्य आहे. ती म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस. या इमारतीची रचना एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स यांनी केली व ती १८७८ मध्ये पूर्ण झाली. प्युगीन, बर्जेस, बटरफील्ड, स्कॉट, स्ट्रीट यासारख्या त्या कालखंडातील महान ब्रिटिश स्थापत्यविशारदांच्या परंपरेत बसणारी ही निर्मिती होती. समप्रमाणबद्ध असलेल्या या इमारतीची रचना एका उत्तुंग चिरेबंदी घुमटात उत्कर्ष पावते. संपूर्ण इमारत स्थानिक गॉथिक अलंकरणाने व तपशिलाने सजवलेली असून भारतीय गवंड्यांनी प्रशंसनीय रीतीने ही कामगिरी पार पाडली आहे.

[next] स्टीव्हन्सवर बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोशनच्या इमारतीची रचना करण्याचे कामही सोपवले होते. व्हिक्टोरिया टर्मिनस समोरची ही इमारत १८९३ मध्ये पूर्ण झाली. त्याने केलेल्या गोपुरांच्या व घुमटांच्या रचनेमुळे त्या त्रिकोणी कोपऱ्याच्या जागेचा पुरेपूर व यशस्वी वापर झालेला दिसतो. या आव्हानपूर्ण आणि जाणकारीच्या कामासाठी करण्यात आलेली एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्सची नियुक्ती किती अचूक होती हे त्यावरून दिसते.

आणखी एका मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे रेखाटन करण्यासाठी स्टीव्हन्स यांनाच निवडले जावे यात आश्चर्य नाही. ही इमारत ओव्हाल मैदान आणि ऐस्प्लेनेड यांचा देखावा दिसेल अशी व अरबी समुद्राभिमुख असून १८९९ मध्ये ती पूर्ण झाली. चर्चगेट स्टेशनसमोरच्या या इमारतीत, आरंभी, बी. बी. अ‍ॅण्ड सी. आय. रेल्वेच कार्यालय होते. आता राष्ट्रीयीकरणानंतर वेस्टर्न रेल्वेचे मुख्य कार्यालय म्हणून ती वापरली जाते आहे. व्ही. टी. प्रमाणे ते रेल्वे टर्मिनस नाही. व्हिक्टोरिया टर्मिनस, म्युनिसिपल कॉर्पोरशनची इमारत किंवा आल्परेड सेलर्स होमची १८७२ मध्ये बांधलेली दुसऱ्या एक चौरस्त्यावरील वेलिंग्टन फाउंटनच्या बाजूची इमारत यांसारख्या स्टीव्हन्सने केलेल्या काटेकोर शिस्तबद्ध रचनांमध्ये अभावानेच आढळणारी प्रसन्नता व सहज खेळकर वृत्ती या इमारतीच्या अनेक घुमट असलेल्या रचनेतून प्रत्ययास येते.

सर बार्टल फ्रीअर यांनी पुरस्कृत गॉथिक शैलीतल्या इमारतांपैकी सर गिल्बर्ट स्कॉटची युनिव्हर्सिटी स्नेट बिल्डिंग आणि शिरोभागी देखणा मनोरा असलेली युनिव्हर्सिटी लायब्ररी, या दोन इमाअती गौरवपूर्ण मान्यतेसाठी एक्मेकींशी स्पर्धा करीत आहेत. इग्लंडमधील स्थापत्यविशारदाने तयार केलेल्या रेखाटनांवरून त्या अनुक्रमे १८७४ व १८७८ मध्ये बांधल्या गेल्या. या दोन इमारती दुरून पाहिल्यास सारख्याच संयमित वजनदार व अभ्यस्त, भारदस्त वाटत असल्या तरी जवळून निरीक्शण केल्यास त्यातील लाबच लाब नागमोडी जिने, मोकडे ‘व्हेनिशिअन’ व्हरांडे आणि कौशल्याचे केलेले सूक्ष्म आलंकारिअक कोरीव काम दृष्टीस पडते. हे आलंकारिक कोरीव काम मुकुंद रामचंद्र यांच्या देखरेखीखाली व जे. एल. किपलिंग आणी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी यांच्या निरीक्षणाखाली झाले.

व्हिक्टोरिअन गॉथिक पुरुज्जीवित स्थापत्याची ही असामान्य उदाहरणे तितक्या वैशिष्टयपूर्ण नसलेल्या परंतु त्यासारख्याच समृद्ध अशा स्थानिक पार्श्वभूमीवर पाहिली पाहिजेत. तथापि दक्षिण मुंबईच्या मध्यभागी एकवटलेल्या या सर्व इमारतींनी एकत्रितपणे एक भारदस्त व्यक्तिमत्व धारण केले आहे. ते भारतात अपूर्व आहे. मुंबईतील त्या काळातील पहिली सरकारी इमारत म्हणजे ओल्ड सेक्रेटरीऐट, ही कर्नल एच्‌.एस्‌. क्लेअर विल्किन्स या रॉयल इंजिनिअर्स दलाच्या अभियंत्याने रेखाटन केलेली होती. आणि १८७४ मध्ये ती पूर्ण झाली. त्या इमारतीचा विविध रंगी स्थानिक पाषाण तेराव्या शतकातील युरोप खंडातील गॉथिकची आठवण करून देतो. दुसरे रॉयल इंजिनिअर, जे. जे. फुलर, यांनी रेखाटन केलेली हायकोर्टाची १८७८ मध्ये बांधलेली वैभवशाली इमारत व कर्नल विल्किन्स यांनीच बांधलेली पी. डब्ल्यू. डी. ची इमारत यांतून आश्चर्यकारक वैचारिक समृद्धी व सौंदर्यदृष्टी असलेली नगर-रचना जाणवते. सध्याच्या ओव्हल मैदानाच्या पश्चिमेकडची जागा पूर्ण मोकळी होती आणि अरबी समुद्राचा क्षितिजापर्यन्तच देखावा दृष्टीस पडत असे. यावरून इमरतीचा मूळ प्रभाव वाढवणारी अशी विशिष्ट जागा त्यांनी का निवडली असावी हेही स्पष्टा होए. १८६० मधल्या शहराच्या नियोजन उत्साहला व्यापून टाकणाऱ्या स्थापत्याच्या आसर्शासाथी घेतलेल्या असाधारण, ध्य्साची, क्रांतीकारक एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील मुंबईची गॉथिक क्षितिजरेष आठवण करून देते. मध्यंतरी १८६० च्या दशकात फोर्ट भागाच्या बाहेर, नामवंत व्हिक्टोरिअन स्थापत्यविशारद विल्यम बर्जेस यांच शिष्य विल्यम इमर्सन याच्य कलेचा पहिला फुलोरा दृष्टीस पडला. तरूण इमर्सन मुंबईला आला तो जमशेदजी जीजीभॉय स्कूल ऑफ आर्टच्या इमारतीचे बर्जेसने केलेले रेखातन देण्यासाठी. ते स्वीकृत झाले नाही अथवा त्यावरून इमारत बांधली गेली नाही. तरी तत्कालीन स्थापत्यविशारद बुद्धीजीवींना ते अतिशय प्रभावित करणारे ठरले. त्यावेळी मुंबईतल्या अनुकूल व्यावसायिक वातावरणात इमर्सन रमला. त्याने घडवलेली स्मरणीय सार्वजनिक इमारत म्हणजे थंड आणि हवेशीर क्रॉफर्ड मार्केट- आताची महात्मा फुले मंडई- या इमारतीच ओतीव लोखंडाच्या तुळ्या आणि उष्णतारोधक उतरत्या पाख्यांचे छप्पर असून ती १८६९ मध्ये बांधली गेली. त्याने चार चर्चेसचेही रेखाटन केले- अम्ब्रोली चर्च, अलीकडेच पाडलेल्या, एके काळी डॉ. जॉन विल्सनचे निवासस्थान असलेल्य इमारतीसमोरचे, आणि गिरगावतले इमॅन्युअल चर्च. दोन्ही १८६९ मध्ये पूर्ण झाली. तसेच १८७२ मध्ये पूर्ण झालेले कामाठापुऱ्यातील सेंटा पॉल्स चर्च परळचे, १८८४ मधले, सेंट मेरी द व्हर्जिनचे चर्च.

[next] इमॅन्युअल चर्च मध्ये स्थापत्यशास्त्राच्या इतिहासकारांना चर्च-स्थापत्याची दोन उत्तम स्थानिक उदाहरणे मिळतात. संपूर्ण निमज्जन करता येण्याजोगे बांधलेले स्नानाचे कुंड आणि नामकरणविधींचे तीर्थपात्र.

स्थापत्याची त्यावेळी विकसित झालेली शिली इतकी व्यापून टाकणारी होती की स्थानिक ज्यूंची दोन प्रार्थनास्थानेदेखील ब्रिटिश निओ-गॉथिक शैलीने अत्यंत प्रभावित जालेली दिसतात. एक, पुण्यातले, देखणा घंटेचा मनोरा असलेले, लाल विटांमध्ये बांधलेले, १८६३ मधले ओहेल डेव्हिड सिनॅगॉग आणि दुसर्वे, एक्नेसेथ एलियाहू सिनॅगॉग, फोर्ब्‌स स्ट्रीट, मुंबई, येथे, जी. जी. गोसलिंग यांनी बांधलेले व १८४८ मध्ये पूर्ण झालेले. स्थापत्याची अनुकृती प्रार्थनास्थानांपुरतीच मर्यादित नव्हती. १८८० मधले मुंबईतले पेरीन नरीमन स्ट्रीटवरचे जॉन अ‍ॅडम्सकृत बोमनजी होरमसजी वाडिया मेमोरिअल कारंजे झोरास्ट्रीयन अग्निमंदिरासारखे वाटते.

जॉन अ‍ॅडम्स, मुंबई सरकारचे स्थापत्यविषय्क कार्यकारी अभियंते, यांन आणखी काही संस्मरणीय निर्मितीचे श्रेय देता येईल. त्यांचे १८८९ मधले त्यांचे प्रेसिडेंसी (एस्प्लेनेड) मॅजिस्ट्रेट कोर्टचे रेखटन पाहिले तर त्यात स्थानिक कोरीव कामे करणारांकडून नाजूक कलाकुसरीतले बारकावे स्पष्टपणे कोरवलेले आढळतात. १९८४ मधल्या बाहेरच्या लिफ्टमुळे या सुंदर इमारतीच्या दर्शनी भागाच्या सौंदर्याला उणेपण आले आहे. ओल्ड रॉयल यॉट क्लब या १८८१ मध्ये पूर्ण झालेल्या बंगल्यासारख्या दिसणाया वैशिष्टयपूर्ण कृतीचा निर्माताही अ‍ॅडम्स हाच होता. तसेच अपोलो बंदरवरील समुद्राभिमुख यॉट क्लब चेम्बर्सचाही.

समुद्राच्या काठाशी पाण्याकडे तोंड करून दिमाखदारपणे उभे असलेले स्मारक, ज्यासाठी मुंबई विशेष प्रख्यात आहे ते म्हणजे सरकारी वास्तुशास्त्रज्ञ जॉर्ज विटेटनिर्मित गेटवे ऑफ इंडिया १९२२ मध्ये पूर्ण झालेले हे स्मारक मध्यायुगीन गुजरातच्या ‘उत्तर-इंडो-अ‍ॅग्लिअन सॅरोसेनिक’ शैलीतील आहे. या शैलीत एरवी असणारे पूरक बांधकाम इथे गाळले आहे.

चौथ्या ब्रिटिश सूत्रीकरणात सुविहित अभिजातवाद आणि एकदेशीय परपरांचे जाणीवपूर्वक केलेले पुनरावलोकन यामुळे इंडोअ‍ॅम्लिसन संयोगाला महता प्राप्त झाली व नव्या दिल्लीत सर एडवर्ड लुट्‌येन्स आणि त्यांचे सहकारी सर हर्बर्ट बेकर, एच. जे. एच. मेड व ए जी. शूस्मिथ यांनी त्याला चिरस्थायी केले. पश्चिम भारताला त्यांनी निर्मिलेल्या स्थापत्यकृतींचा प्रत्यक्ष लाभा झालेला नव्हता. परंतु स्थापत्यकलआव्यवहारात त्यांचा व्यापक प्रभाव होता. ब्रिटिश राहवटीतील स्थापत्यकलेच्या चार परंपरापैकी शेवटची परंपरा विसाव्या शतकाच्या आरंभपर्यन्त, नव्हे, खरे तर मध्यापर्यन्त, रेंगाळत राहिलीअ. मुंबईत बॅलॉर्ड इस्टेटमधल्या इमारतींच्या सुरचित दर्शनी भागातून ही परंपरा उत्कृष्टपणे आविष्कृत झाली. विशेषतः क्लॉड बेटली यांनी बांधलेल्य कस्टम हाऊस या भव्य इमारतीतून, क्लॉड बेटली (१८७९-१९५६) हे तसे स्थानिक मान्यता मिळालेले, परंतु ज्यांच्या कलेचे खरे मूल्यामापन झाले नाइई असे. ब्रिटिश स्थापत्यविशारद. त्यांनी मुंबईत कामकेले आणि मुंबईतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या कलाकृतींची परिष्कृत गुणवत्ता इतरांहून वेगळी ठरणारी आएह आणि मुंबई शहराच्या एखाद्या अवचित कोपऱ्यामध्ये त्यांच्या रचना अकस्मात दिसतात. उदाहरणार्थ, १९४० मध्ये बांधलेली न्यू मरीन लाऐन्समधली अग्यारी आणि कुलाबा कॉजव्हपलीकडची खुश्रू बाग व तिच्यातली छोटी अग्यारी. स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाच्या ठरतील अशा खाजगी इमारतींच्या निर्मितीचे श्रेयही बेटलींकडे जाते. माऊंट प्लेझंट मार्गावरील, मागे टेकडीचे भव्य नेपथ्य असलेले, जिनांचे घर हे एक असामान्य उदाहरण आहे. तसेच डहाणूकर मार्गावरील कस्तुरभाई लालभाई यांच्यासाठी बांधलेला लहानसा पण अत्यंत आकर्षक असा बंगला.

ब्रिटिश राजवटीतल्या स्थापत्यकलेच्या वृती-प्रवृतींचे प्रत्यंतर आणून देणारी आणि ज्यांच्याशी अधिक जवळीक साधता येईल अशी काही स्मारके आणि पुतळे आहेत. त्यापैकी एक स्थळ सेंट्रल लायब्ररीच्या मागचेई आय ऐन्‌ आंग्रे. मूळ किल्ल्याच्या प्रेवेडाद्वरावरच्या चौदाव्या शतकातील ऐतिहासिक आकृती ही बहुधा ब्रिटिश नसलेली पहिली-वहिली उदाहरणे होत. मुंबई वसाहत म्हणून वसविली गेल्यानंतर अठराव्या शतकात प्रचलित असलेले पुतळे आणि चर्चस्मारके यांन मुंबई आणि पश्चिम भारतात भरपूर वाव मिळाला.

[next] मुंबईतील आरंभिच्य काळातील पुष्कळच सुंदर सार्वजनिक पुतळ्यांची भरून न येणारी मोडतोड झालेली आहे आणि कित्येक तर स्थानभ्रष्टही झालेले आहेत. मूल्यात्मक महत्त्वाच्या दृष्टीने त्यांची ही स्थिती अरिष्टासारखी वाटते. त्यापैकी काही त्या काळातल्या प्रख्यात स्मारक-शिल्पकारंच्या कलेचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. उदा. धाकट्या जॉन बेकनने १८१० मध्ये घडवलेला मार्किस कॉर्नवॉलिसचा पुतळा. १८७२ मध्ये मॅथ्यू नोबलने घडवलेला छत्र असलेल्या सिंहासनावर बसलेल्या व्हिक्टोरिया राणीच प्रसिद्ध पुतळा आणि त्याचे छत्र जोडले जाईल तो दिवस संग्राहक वृत्तीच्या लोकांच्या दृष्टीने भाग्याचा असेल. १८६५ मध्ये घडवलेल्या जगन्नाथ शंकरडेठ यांच्या पुतळ्याच्या निर्मितीने पूर्वीच मॅथ्यू नोबलने मुंबईत आपला ठसा उमटवला होता. ही विलक्षण, पुराणपुरुष बैठी आकृती मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या तळमजल्याच्या प्रवेशद्वार्राशी असून माथ्यावरील खिडकीमुळे नाट्यमयरीतीने उजळलेली आहे.

सर फ्रान्सिस चॅन्ट्रे यांनी तयार करून घेतलेल्या आणि एशियाटिक सोसायटीच्या परिसरात असलेल्या अनेक प्रशंसनीय पुतळ्यापैकी स्टीफन बॅबिंग्टन (१८२७) माऔन्टस्टुअर्ट एल्‌फिन्स्टन व सर जॉन माल्कम (दोन्ही १८३३ मध्ये पूर्ण झालेले) आणि चार्लस्‌ फोर्ब्‌स (१८४१) हे पुतळे कुणालाही अद्याप आवडतील. १८६५ मध्ये ज्यांन मनोचजी नसरवानजी यांचा पुतळा बनवण्यास सांगितले होत त्या जॉन ऐच. फोले यांनी घडवलेला, लॉर्ड एलफिन्स्टन (१८६४) चा पुतळाही यातच आढळतो.

एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जी अनेक शिल्पित स्मारके निर्माण झाली. त्यातली बहुतेक लक्षणीय स्मारके धाकट्य जॉन बेकनने निर्मिलेली आहेत. त्यांच्य कृतीचे समकालीनांकडून विशेष कौतुक झाले नव्हते. त्याच्या कितीतरी विचारपूर्ण रचना अजूनही आपल्याला आढळतात. सेंट थॉमस कॅथीड्रलच्या आतील, कॅथरिन कर्कपॅट्रिक (१८००), कलात्मक चौथऱ्यावरील कॅ. जी. ह्यार्डिन्ज (१८०८) हे पुतळे आणि गव्हर्नर डंक्कन (१८१७) यांचे स्मारक, या त्यापैकी काही.

मुंबईच्या स्मारक-कलेत भर घालणाऱ्यांमध्ये ज्यात प्रि-रॅफेलाऐट ब्रदरहूडच्या एका प्रतिनिधीचाही समावेश केला पाहिजे. तो म्हणजे थॉमस वूलनर, एशियाटिक सोसायटीच्या जागेत असलेला. १८७२ मधला, सर बार्टल फ्रीअर यांचा सुंदर पुतळा त्याने बनवला.

एडवर्ड, प्रिन्स ऑफ वेल्स, यांचा ब्रॉंझमधला, सर्वोत्कृष्टतेचा नमुना म्हणून एके काळी प्रख्यातीस पावलेला, मुंबईच्या गर्दीच्या एका चौरस्त्याला ज्याचे नाव मिळले आहे असा अश्वारूढ पुतळा १८७७ मध्ये जे.जी. बोहेम यांनी पूर्ण केला. तो मुंबई शहराला सर्वोत्तम सार्वजनिक पुतळा होय. दुसऱ्या एका उत्तर-व्हिक्टोरिअन शिल्पकाराने ब्रॉंझमध्येच घडवलेली कलाकृती अजूनही पहायला मिळते. ती म्हणजे डोनाल्ड जेम्स मॅके, अकरावे लॉर्ड रे, यांची, सर आल्परेड गिल्बर्ट यांनी घदवलेली, मुंबई विद्यापीठाच्य कुलगुरुंच्या पायघोळ झग्यातील भव्य तरीही संवेदनशील बैठी आकृती.

१८६० नंतरचा बांधकामाचा उद्रेक हा १८६०-१८६५ मधल्या अमेरिकन कापूस व्यापारातील नाकेबंदीमुळे शहरात आलेल्या अचानक समृद्धीतून उगम पावलेल होता. शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था स्थापन करणे हे तेव्हा अद्ययावत समजले जात होते. तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आणि शहरात सर्वत्र शोभिवंत पाणपोया उभ्या करणे हेही समाजकार्य मानले गेले. या मान्यतेमुळेच अनेक सुंदर कारंजी निर्माण झाली. त्यातले फ्लोरा फाउंटन हे विशेष प्रसिद्ध आहे. ब्रिटनमध्ये आर. नार्मन शॉ यांनी रेखाटन केले व जेम्स फोरसाऔंथ यांनी त्याची उत्तम पोर्टलॅण्ड दगड वापरून रचना केली. १८६९ पासून मुंबईच्या ‘फोर्ट’ भागाचा तो मानबिंदू मानला जात आहे. पी. डिमेलो मार्गावरील मूळजी जेठा फाउंटनजवळून रोज येजा करणाऱ्या मुंबईच्या नागरिकांपैकी फार थोड्यांना ठाउक असेल की, हे कारंजे म्हणजे एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स यांनी स्थापत्याच्य परिभाषेत उच्चारलेले सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक होय. तर विल्यम इमर्सनने रचना केलेल्या व जॉन लॉकवूड किपलिंगने घडवलेल्या भव्य कारंज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत याची महात्मा फुले मंडईतल्या फळबाजारात घासाघीस करणाऱ्या विक्रेत्यांना व ग्राहकांन कल्पनाही नसते.

[next] कामाठीपुऱ्यातील किपलिंगचे नाव धारण करणारे कारंजे त्याच्या अपुऱ्या अर्धवट शिल्पित अवस्थेमुळे अधिक आकर्षक वाटते. हे कारंजे मुंबईच्या त्या काळाच्या स्थापत्याच्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला रचनाकर्त्याच्या कल्पनाशीलतेतून क्रमशः आकार घेणारा कच्चा आराखडा म्हणून विचार करायला लावणारे आहे. कामाठीपुऱ्यातील कारंजे हा अर्धवट सोडून दिलेला प्रयत्न, फुले मार्केटमधील कारंज्याचा मूळ खर्डा, पण ड्रॉईंग बोर्डवर नव्हे तर पाषाणात कोरलेला, रचनाकर्त्याच्या व शिल्पकाराच्या कलेच्या प्रतीकात्म चिन्हांनी नटलेला, डब्ल्यू, ई, के, जे, ही आद्याक्षरे व आर्थर ट्रॅव्हर्स क्राफर्ड हे नाव कोरलेला असा आहे. अनुमान स्पष्ट आणि उत्तेजक आहे. कारण इमर्सन हा बर्जेसचा शिष्य होता. खाजगी पत्रव्यवहारात (१९८५) सी. डब्ल्यू, लंडन यांनी लक्षात आणून दिले आहे की, या कारंज्याचे शिखर आणि त्यावरील अलंकरणात्मक कलाकुसरीमध्ये डब्ल्यू, बर्जेसने १८५७-१८५८ मध्ये ग्लूस्टर येथील साब्रीना फाउंटनसाठी केलेल्या, पण प्रत्यक्षात बांधल्या न गेलेल्या, आकृतीचा प्रतिध्वनी उमटला आहे.

मुंबईच्या व्हिक्टोरिअन युगाच्या प्रतिभाशाली विकासानंतर आता सुमारे एक शतक उलटून गेल्यानंतरही, त्या युगाच्या दृश्य खुणा, स्थापत्याच्या गुणवत्तेविषयी आणि त्यातील व्यावसायिक समस्यानिवारक नावीन्यपूर्ण शोधांविषयी, आपल्य मनात आदर निर्माण करतात. या इमारतींच्या भौतिक वारशाच्या मुळाशी त्यांचे बौद्धिक योगदान आहे व शैलींची एकात्मता कशी साधली गेली याचा मागोवा घेण्यातले आकर्षण आहे.

- फ्रॉय निस्सेन


संपादक मंडळ | Editors
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,1,अनुभव कथन,17,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1284,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,33,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,3,अरुण कोलटकर,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1036,आईच्या कविता,27,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,13,आदित्य कदम,1,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,24,आमट्या सार कढी,17,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,68,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,69,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,267,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगुळकर,5,ग दि माडगूळकर,1,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,18,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,428,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,58,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,74,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,65,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,5,निसर्ग कविता,31,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,12,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,16,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,7,बातम्या,9,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,6,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,17,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,106,मराठी कविता,1072,मराठी कवी,3,मराठी गझल,26,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,17,मराठी टिव्ही,50,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,18,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,46,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,274,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीमाती,154,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,308,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,10,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,6,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,22,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,10,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,1,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,211,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,57,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,7,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,50,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,11,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,116,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,317,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: मुंबई महत्त्वाची स्थळे - महाराष्ट्र
मुंबई महत्त्वाची स्थळे - महाराष्ट्र
मुंबई महत्त्वाची स्थळे, महाराष्ट्र - [Mumbai Mahatvachi Sthale, Maharashtra] ब्रिटिश राजवटीने भारतीय पर्यावरणला दिलेल्या प्रतिसादाचे चिरंतन स्मारक त्या राजवटीने उभरलेल्य व मागे ठेवलेल्या स्थापत्याइतके दुसरे कोणतेही नाही.
https://1.bp.blogspot.com/-5NRQX-MhxxY/XRmganT1eJI/AAAAAAAADiY/UZOTctNZcnUwD5Ko1iZ_nJefLOTyuVXWwCLcBGAs/s1600/town-hall-mumbai.jpg
https://1.bp.blogspot.com/-5NRQX-MhxxY/XRmganT1eJI/AAAAAAAADiY/UZOTctNZcnUwD5Ko1iZ_nJefLOTyuVXWwCLcBGAs/s72-c/town-hall-mumbai.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/mumbai-mahatvachi-sthale-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/mumbai-mahatvachi-sthale-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची