Loading ...
/* Dont copy */

महाराष्ट्रातील चित्रपटाचा इतिहास (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील चित्रपटाचा इतिहास (महाराष्ट्र) - चित्रपट व्यवसायात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे [History of Chitrapat in Maharashtra].

महाराष्ट्रातील चित्रपटाचा इतिहास (महाराष्ट्र)

चित्रपट व्यवसायाच्या सुरवातीपासूनच धंदा म्हणून आणि कला म्हणूनही त्याचा जो विकास झाला त्यात महाराष्ट्रातील चित्रपटाचा इतिहास महत्त्वाचा आहे


महाराष्ट्रातील चित्रपटाचा इतिहास (महाराष्ट्र)

(History of Chitrapat in Maharashtra) चित्रपट व्यवसायाच्या सुरवातीपासूनच धंदा म्हणून आणि कला म्हणूनही त्याचा जो विकास झाला त्यात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे. १८९५ च्या जुलैमध्ये लुमिअरे बंधूंनी तयार केलेल्या सिनेमाचा पहिला खेळ मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये झाला. १९१२ मध्ये पुंडलीक चे चित्रीकरण याच शहरी झाले आणि दादासाहेब फाळके - भारतीय सिनेमाचे जनक - यांनी राजा हरिश्चंद्र या, सिनेइतिहासातील मैलाचा टप्पा ठरणाऱ्या चित्रपटाचे चित्रीकरणही इथेच केले.

१९३१ साली बोलक्या चित्रपटाचे आगमन होईपर्यंत मुंबईच भारतीय सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, पण तिच्याबरोबरच पुणे, खडकी, कोल्हापूर, नाशिक या गावीही चित्रीकरणाचे काम चालू होते. कोल्हापूरला बाबुराव पेंटर यांच्या उत्कृष्ट ‘सेटस्‌’ मुळे चित्रीकरणाचे एका श्रेष्ठ कलेत रूपांतर झाले. त्यांची सैरंध्री एतद्‍देशीय चित्रपट कलेतील एक लक्षणीय टप्पा आहे..


हेच माझे माहेर या चित्रपटात मोहन गोखले, रमेश देव, नयना आपटे आणि अशोक सराफ.

विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात मुंबईतील चित्रपट व्यवसायाची भरभराट झाली. अनेक चित्रपट कंपन्या अस्तित्वात आल्या. पौराणिक कथा विषयांबरोबरच मराठ इतिहासातील प्रसंग, तसेच रोजच्या जीवनातील समस्याही चित्रीकरणासाठी निवडल्या गेल्या. या कालातील दोन सर्वात उल्लेखनीय चित्रपट म्हणजे महाराष्ट्र फिल्म कंपनी चा ऐतिहासिक चित्रपट सिंहगड (१९२३) आणि त्याच कंपनीचा सामाजिक चित्रपट सावकारी पाश (१९२५). या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन बाबूराव पेंटर यांचेच आहे. सिंहगड मध्ये तानाजीच्या आणि शिवाजीच्या इतर शूर शिपायांच्या देशभक्तीची कथा चित्रीली आहे.

तर सावकारी पाश मध्ये गरीब मराठी शेतकऱ्याच्या सावकाराकडून होणाऱ्या पिळवणुकीची. हा चित्रपट सत्यजित राय यांच्या पाथेर पांचाली आधी चाळीस वर्षे काढला गेला असून त्यातील सद्यःस्थितीचे चित्रीकरण हृदयाला भिडणारे आहे. याला भारतातील पहिला वास्तव चित्रपट म्हणता येईल. यातील तरुण शेतकऱ्याची भूमिका करणारे व्ही. शांताराम पुढे एक श्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी आणखी दोन महत्त्वाच्या मूक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली ती याच काळात. नेताजी पालकर (१९२८) आणि उदयकाल (१९३०). या चित्रपटाचे मूळ नांव स्वराज्य-तोरण होते. पण त्या काळच्या सेन्सॉरने त्यास हरकत घेतल्यावरुन ते बदलून उदयकाल असे ठेवण्यात आले. त्यात शिवाजीच्या तारुण्यातील धाडसी मोहिमांची कथा दाखवण्यात आली होती.

[next]

बोलपट


अमेरिकेत बोलपटांची निर्मिती सुरू होऊन तीन-चार वर्षे नाही झाली तोच भारतात पहिला बोलपट निर्माण केला गेला. आलम आरा या पहिला भारतीय बोलपटाने प्रकाशन १९३१ च्या मार्चमध्ये करण्याचा मान मुंबईचा होता. या चित्रपटाचे निर्माते अर्देशीर एम्‌ इराणी होते. त्यात झुबेदा व मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या. यानंतर जवळ जवळ १ वर्षाने, फेब्रुवारी १९३२ मध्ये व्ही, शांताराम यांनी पहिला मराठी बोलपट प्रकाशित केला. या चित्रपटासाठी त्यांनी दादासाहेब फाळक्यांच्या हरिश्चंद्राचीच कथा निवडली. त्याचे नांव होते अयोध्येचा राजा आणि तो मराठी व हिंदी या दोन्ही भाषात एकदमच काढला गेला. यानंतर प्रभात व इतर महाराष्ट्रीय चित्रपट संस्थांनी दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटापर्यंत द्वैभाषिक चित्रपट काढण्याचा नेम कायम ठेवला.

अयोध्येचा राजा मुख्यत्वेकरून पडद्यावरचे नाटक होते असे म्हणावे लागेल. संवादापेक्षा घटना वा ‘अ‍ॅक्शन’ यांच्यावर भर देणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे प्रभात आणि व्ही. शांताराम यांचाच अग्निकंकण. भटक्या लोकांनी पळवून नेलेल्या राजपुत्राची गोष्ट यात सांगितली आहे. एकाच वेळी मराठी व हिंदी अशा दोन आवृत्त्या एकदम काढण्याच्या प्रथेमुळे हे चित्रपट भारतभर वितरण करण्याच्या व खपण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाकांक्षी प्रमाणावर चित्रिलेले होते. सर्वप्रथम रौप्यमहोत्सव (२५ आठवडे ) साजरा करणारा मराठी चित्रपट भालजी पेंढारकर यांचा श्यामसुंदर. यात शाहू मोडकने कृष्णाची तर शांता आपटेने राधेची भूमिका केलेली होती.

१९३३ मध्ये देखील व्ही. शांताराम यांनी रंगीत चित्रपटाच्या चित्रीकरणात रस घ्यायला सुरवात केली होती. त्यांच्या सैरंध्रीची त्यांनी एक रंगीत आवृत्ती जर्मन रंगप्रक्रिया वापरुन तयार केली होती. पण या त्यांच्या प्रयत्नास दुर्दैवाने यश आले नाही. भारतातील रंगीत चित्रपट मात्र दुसऱ्या महायुद्धानंतरच उदयास आले. मेहबूब यांचा आन, सोहराब यांचा झांसी की रानी आणि व्ही. शांताराम यांचा झनक झनक पायल बाजे हे तीन पहिले भारतीय रंगीत चित्रपट. ईस्टमन कंपनीच्या रंगप्रक्रिया येथे सुरू झाल्यावरच रंगीत चित्रपटांची चलतीही सुरू झाली. अंबालाल पटेल यांनी मुंबईत प्रथम प्रक्रियाकरणाची प्रयोगशाळा १९५० नंतर सुरू केली.

[next]

सामाजिक चित्रपट


सैरंध्रीच्या अपयशानंतर प्रभातने सिंहगड हा ऐतिहासिक चित्रपट प्रकाशित केला आणि मग लवकरच पुण्यात स्वतःची मोठी चित्रपट नगरी खोलून त्यांनी पुण्यास बस्तान हलवले. १९३४ पर्यंत मराठीत संपूर्ण सामाजिक चित्रपट बनविण्यात आलेले नव्हते. पुण्यात जम बसवल्यानंतर प्रभातने पहिला सामाजिक चित्रपट तयार केला. विनायक हे त्याचे दिग्दर्शक होते. विलासी ईश्वर हा तो चित्रपट. भा. वि. वरेकरांच्या कादंबरीकर आधारित होता. परंतु त्यास म्हणावे तितके यश मिळाले नाही. १९३५ पर्यंत विश्राम बेडेकरांनी राम गणेश गडकऱ्यांच्या ठकीचे लग्न चे व चि. वि. जोशांच्या सत्याचे प्रयोग चे चित्रीकरण करून ४००० व ६००० फूट लांबीचे दोन छोटे चित्रपट काढले. दोन्हीचे प्रकाशन एकदमच झाले. परंतु त्यांनाही लोकाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

तथापि पहिल्याच अपयशाने फारसे खचून न जाता विनायकांनी दुसरा सामाजिक चित्रपट छाया हंस पिक्चर्ससाठी काढला. हा वि. स, खांडेकरांच्या एका कथेवर आधारित असून त्याच्या पटकथेस पारितोषिक मिळाले. आणि विनायक यांचा एक प्रगतिशील दिग्दर्शक म्हणून सर्वत्र बोलबाला झाला. त्यानंतर त्यांनी आचार्य अत्र्यांच्या औपचारिक, विडंबनात्मक, व प्रचलित समाजव्यवस्थेवर टीका करणाऱ्या लिखाणावर आधारित धर्मवीर, ब्रह्मचारी, ब्रॅंडीची बाटली आणि अर्धांगी हे चित्रपट काढले. तसेच वि, स. खांडेकरांच्या दमदार व दर्जेदार कथांवर आधारित देवता, अमृत आणि माझे बाळ हेही.

[next]

उज्ज्वल काल


मराठी चित्रपटांच्या इतिहासात १९३६ ते ४२ हा काळ सर्वाधिक निर्मितीक्षम ठरेल. विनायक यांच्या सामाजिक चित्रपटांव्यतिरिक्त बाबूराव पेंटर यांनी आपल्या मूक सावकारी पाश ला याच काळात बोलके केले आणि व्ही. शांताराम यांनी आपला प्रसिद्ध कुंकू निर्मिला तोही १९३७ मध्ये. हा चित्रपट तर भारतभर गाजला. याच्यात शांतारामनी कुठलेही पार्श्वसंगीत न वापरता फक्त नैसर्गिक आवाजच वापरले. त्यानंतर आले त्यांचेच माणूस - एक वेश्या आणि एक पोलिस यांची कथा आणि शेजारी - आंतजातीय. आंतर्धर्मीय सलोख्याचीकथा या तिन्ही चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या दुनिया न माने, आदमी व पडोसी अशा होत्या. परंतु मूळ मराठी चित्रपट त्यांच्या हिंदी आवृत्त्यांपेक्षा सरस होते हे कुणालाही कबूल करावे लागेल.

या तीन सामाजिक चित्रपटांबरोबरच प्रभातने महाराष्ट्राच्या संतांच्या जीवनावर आधारित धर्मात्मा, तुकाराम आणि ज्ञानेश्वर हे तीन चित्रपटही याच काळात काढले. पहिल्यात अस्पृश्यतेविरुद्ध हृदयस्पर्शी आवाहन आहे, तर दुसऱ्यातील वास्तववाद व माणुसकी नावाजण्याजोगी आहे. याच चित्रपटाला (तुकाराम) व्हेनिस येथील चित्रप्टमहोत्सवात पारितोषिक मिळाले आणि तो मुंबईतील एका चित्रपटागृहात एक वर्ष चालला. ज्ञानेश्वर मध्ये मानवतावाद व समता यांचा संदेश विशेष प्रभावीपणे देण्यात आला होता. त्याचप्रमाणे तो सिनेतंत्रातील ‘स्पेशल इफेक्टस्‌’च्या बाबतीत उल्लेखनीय आहे.

त्यातील ज्ञानेश्वराने चालविलेल्या भिंतीची तुलना ‘अमेरिकन सिनेमॅटॉग्राफर’ या मासिकाने अलेक्झांडर कॉर्डाच्या थीफ ऑफ बगदाद मधल्या जादूच्या उडत्या सतरंजीशी केली आहे. शेजारी मधील धरण फुटण्याचे देखावे प्रल्हाद दत्त यांनी तांत्रिक कौशल्याची कमाल करून हुबेहूब वाटावे इतके थरारकरीत्या घेतले आहेत.

याच सुमारास भालजी पेंढारकरांनी बरेच ऐतिहासिक चित्रपट काढले, नेताजी पालकर आणि स्वराज्य सीमेवर हे त्यापैकी दोन. त्यांच्या राजा गोपीचंद ह्या पौराणिक आणि सुनबाई ह्या सामाजिक चित्रपटानाही बऱ्यापैकी दाद मिळाली. शेजारी चे पटकथा लेखक विश्राम बेडेकर यांनी पहिला पाळणा काढून नांव केले. १९४१ मध्ये शांतारामनी प्रभात सोडले. त्याच सुमारास अत्रे आणि विनायक यांची फारकत झाले. विनायकांनी त्यानंतर लग्न पहावं करून, सरकारी पाहुणे आणि पहिली मंगळागौर हे विनोदप्रधान चित्रपट काढले. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे आणि तेव्हा जारी केलेल्या फिल्म कपातीमुळे मराठी चित्रपटनिर्मिती जवळ जवळ संपूर्ण बंद पडली. १९४३ ते ४६ च्या दरम्यान फक्त दहा मराठी निघाले, पण त्यांच्यात प्रभातचा उत्कृष्ट रामशास्त्री व प्रकाश पिक्चर्सचा लोकप्रिय रामराज्य हे होते. या काळात अत्रे-विनायक यांनी विशेष नांव घेण्याजोगे काही केले नाही.

[next]

संवर्धन काल


दुसऱ्या महायुद्धाचा शेवट आणि स्वतंत्र भारताचे नवे लोकशाही राज्य या दोन्ही घटनांमुळे मराठी चित्रपट क्षेत्रात नाविन्याचे वारे वाहू लागले. या नव्या जोमाचे दर्शन व्ही. शांताराम यांच्या रामजोशीत व मंगल पिक्चर्सच्या जय मल्हार मध्ये होते. लोकनाट्य, लोकसंगीत व लोकनृत्यावर भर असणारे हे चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले. तमाशा आणि लावणी या लोकप्रिय ग्रामीण करमणूक प्रकारांची मराठी चित्रपटातील चलती या दोन चित्रपटापासून सुरू झाली. दोन्ही चित्रपटांचे गीतकार व रामजोशी चे पटकथा-लेखक ग. दि. माडगूळकर यांचा स्वातंत्र्योत्तर मराठी चित्रपटांच्या प्रगतीत व जडणघडणीत मोठा वाटा होता.

हे चित्रपट बघायला गर्दी करून जाणाऱ्या प्रेक्षक वर्गातही या काळात मोठाच बदल घडून आला होता. सुशिक्षित मध्यम वर्गाऐवजी आता त्याच्यात गिरणी कामगार, कारखान्यातील कामगार, शेतकरी व ग्रामीण मजूर यांचा भरणा दिसू लागला. या नव्या जमान्यात चित्रपटाच्या प्रत्येक क्षेत्रात नवनवे तारे चमकताना दिसु लागले. दिग्दर्शानात राजा परांजपे, दत्ता धर्माधिकारी, राम गबाळे, राजा ठाकूर, अनंत माने, माधव शिंदे, अभिनयात सुलोचना, वनमाला, उषाकिरण, चंद्रकांत, सूर्यकांत, हंसा वाडकर, राजा गोसावी, रमेश देव, सीमा , जयश्री गडकर, शकुंतला, अरुण सरनाईक, पटकथा लेखनात ग. दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर, पु.ल. देशपांडे, दिनकर पाटील, ग, रा. कामत, तर संगीतात सुधीर फडके, वसंत पवार, वसंत देसाई आणि दत्ता डावजेकर.

१९५० नंतरच्या दशकात या सर्वांच्या प्रयत्नामुळे मराठी चित्रपटांची दखल सर्व भारत घेताना दिसू लागला. यापैकी काही चित्रपट असे : राजा परांजपे यांचा पेडगावचे शहाणे, दत्ता धर्माधिकारींचा बाळा जो जो रे, राजा ठाकुरांचा मी तुळस तुझ्या अंगणी राम गबालेंचा जशास तसे, अनंत मानेंचा अबोली आणि माधव शिंदेंचा कांचनगंगा.

खेरीज व्ही. शांतारामनी अमर भूपाळी काढला. त्याची पटकथा विश्राम बेडेकरांची होती. मराठी राज्याच्या अखेरच्या काळातील होनाजी या लोककवीच्या आयुष्यावर हा आधारित होता. बेडेकरांनी स्वतः याच काळात वासुदेव बळवंत काढला. अत्र्यांनी साने गुरूजींच्या कादंबरीवर श्यामची आई काढला. त्याला त्या वर्षीचा सर्वोतुकृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावण्याचा मान मिळाला आणि त्यानंतरच्या त्यांच्या महात्मा फुले नेही राष्ट्रीय पारितोषिकाचा मान अत्र्यांना पुन्हा मिळवून दिला. सदाशिव राव कवींनी त्याच काळात वहिनींच्या बांगड्या व शेवग्याच्या शेंगा हे दोन लोकप्रिय चित्रपट घेतले.

[next]

हिंदी चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेला व यशाला भुलून राजा परांजपे व दत्ता धर्माधिकारी यांनी त्या प्रांतातही पाऊल पण त्यांच्या प्रयत्नास यश आले नाही. राजा परांजपे यांनी जगाच्या पाठीवर काढून आपले अपयश पार धुवून टाकले; तर अनंत माने यांच्या सांगत्ये ऐका (१९५९) ने पुण्यात एकाच गृहात १३८ आठवडे सतत हजेरी लावून एक विक्रमच प्रस्थापित केला.

सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. राज्य सरकारने ताबडतोब नाटकांवरील करमणूक कर माफ करून तीन सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांसाठी पारितोषिके जाहीर केली. हे पारितोषिक मिळवणारा पहिलाच चित्रपट प्रपंच हा कुटुंबनियोजनाची भलावण करणारा होता आणि त्यांत वाढत्या कुटुंबाचा भार न पेलवणाऱ्या बापाची शोककथा ग. दि. माडगूळकरानी सांगितली होती. पारितोषिकांबरोबरच राज्य सरकारने तीन चित्रपटांना दर वर्षी करमणूक कर माफ करण्याचेही ठरवले. परंतु त्याचा फायदा प्रेक्षकांना न होता निर्मात्यांना होईल अशी व्यवस्था केली आणि ही सवलत मिळणाऱ्या चित्रपटांच्या निर्मात्यांना करमणूक करातून दोन लाख रुपये देण्यात येऊ लागले. दहा वर्षे राबवण्यात आलेल्या या योजनेचा काही लक्षणीय फायदा मात्र वाढीव चित्रपट संख्येच्या रूपाने होताना दिसेना.

किंबहुना १९६० नंतरच्या दशकात मराठी चित्रपटांची निर्मिती घटत घटत वर्षास दहा बारा चित्रपटांवर येऊन ठेपली. आणि त्यांतही अनंत मानेच्या तमाशाप्रधान चित्रपटांस सर्वाधिक लोकप्रियता लाभली. या चित्रपटांचे घटना क्षेत्र ग्रामीण व मुख्य भूमिका तमासगीरांच्या असल्या तरीही खेड्यातील पंचायत अधिकाऱ्यांची लाचलुचपत लाभली. पाटलाचे ना कर्तेपण अशा सामाजिक समस्याही त्यांनी हाताळल्या. त्यामुळे त्यांना प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने लाभला. या दशकातील काही नांव घेण्याजोगे चित्रपट असे : माधव शिंदेचा कन्यादान, राजा ठाकुरांचा रंगल्या रात्री अशा, वसंत जोगळेकरांचा शेवटचा मालुसरा आणि भालजी पेंढारकरांचा साधी माणसे.

याच सुमारास मराठी चित्रपटांसमोर दोन मोठे प्रतिस्पर्धी उभे राहिले : मराठी नाटक आणि हिंदी चित्रपट. करमणूक कर माफ केल्यानंतर मराठी नाट्यभूमीला मोठा भरभरटीचा काळ आला आणि रंगभूमीवर एकामागून एक येणाऱ्या आकर्षक नाटकांना गर्दी करून जाणाऱ्या मध्यम वर्गीय शहरी प्रेक्षकवर्गाला मराठी सिनेमा पार मुकला. तसेच आदल्या दशकात रंगचित्रीकरणाशी झटापट करणारा हिंदी सिनेमा १९६० नंतर त्या तंत्रावर प्रभुत्व मिळवून भराभर रंगीत चित्रपट प्रकाशित करू लागला. या दोन प्रतिस्पर्ध्यांमुळे मराठी सिनेमा तमाशा व ग्रामीण प्रेक्षक यांच्यावर अधिकाधिक अवलंबून राहू लागला.

[next]

पुनरूज्जीवन


सन १९७० च्या आसपास मराठी चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग जवळ जवळ संपुष्टात आला होता. अशा काळी दोन नवीन चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांना पुन्हा खेचून आणण्यात यश मिळवले. दादा कोंडकेंचा सोंगाड्या आणि व्ही. शांतारामचा पिंजरा हे दोन चित्रपट. कोंडकेंच्या साध्या भोळ्या नायकावर ( त्यानी ही भूमिका स्वतःच केली. ) व शांतारामच्या सुरेख रंगावर, आकर्षक संगीतावर व हृदयस्पर्शी कथानकावर प्रेक्षक खूष झाले. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्याचे, तसेच त्यांना निर्भेळ व सशक्त करमणूक पुरवण्याचे सामर्थ्य मराठी चित्रपटांत आहे हे दोघांनीही सिद्ध करून दाखवले. अशा चित्रपटांना प्रेक्षकांची वानवा नसते हेही. पिंजरा सर्वाधिक लोकप्रिय हिंदी चित्रपटांपेक्षाही प्रचंड ‘हिट’ ठरला.

करमणूक कर परतीबाबत मराठी चित्रपट महामंडळाने शिफारस केलेली योजना राज्य सरकारने १९७५ मध्ये स्वीकारल्यावर चित्रपटनिर्मितीला पुन्हा चालना मिळायला मदत झाली. य़ा योजनेनुसार रंगीत चित्रपट निर्मात्याला रु. ८ लाख व कृष्ण धवल चित्रपट निर्मात्याला रु. ४ लाख इतकी रक्कम प्रथम चित्रपट वितरणानंतर व दुसरा पूर्ण केल्यानंतर मिळू लागली. या योजनेमुळे आता जवळ जवळ सर्व मराठी चित्रपट रंगीत निघू लागले आहेत, तसेच निर्मितीत वाढही झालेली आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, अर्थपूर्ण आणि आशयनघन चित्रपटांची निर्मितीही लक्षात येण्याइतकी वाढली आहे.

[next]

सन १९७५ साली जब्बार पटेल यांनी चित्रपट दिग्दर्शनात प्रथम पाऊल टाकले. विजय तेंडुलकरांनी लिहिलेला व पटेलांनी दिग्दर्शिलेला सामना बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिके मिळवून गेला. त्यांच्याच जैत रे जैत ला राज्य सरकारचे पारितोषिके मिळाले. त्यानंतरचा त्यांचा सिंहासन सत्ताधीशांच्या सत्तेच्या राजकारणाचे वास्तव चित्रण करतो; तर उंबरठा कौटुंबिक जीवनाची कोंडी फोडून मुक्त होऊ बघणाऱ्या स्त्रीचा संघर्ष दाखवतो. तसेच पीडित स्त्रियांना संरक्षण देणाऱ्या संस्थांतील लाचलुचपतही. जयू आणि नचिकेत पटवर्धन यांनी जुलमी रॅंडची हत्त्या करणाऱ्या चाफेकर बंधूंवर २२ जून १८९७ हा चित्रपट काढला आहे. तसेच अमोल पालेकरांचा फ्रान्समध्ये पारितोषिक मिळवणारा आक्रित भोळ्या समजुती व जुनाट रूढींचा समाजावरील पगडा दाखवतो. अशाच अनेक इतर विविध समस्यांना सामोरे जाणारे किंवा गुंतागुंतीच्या घटनांचे विश्लेषण करणारे आणखी काही नवे चित्रपट म्हणजे : अनंत मानेंचा सुशीला, बाबासाहेब फत्तेलाल यांचा चोरीचा मामला, दादा कोंडकेंची हिट मालिका, राजदत्तचा देवकीनंदन गोपाला. अलीकडे मराठे चित्रपट पूर्वापेक्षा लोकप्रिय आहेत.

हुंडाबळीच्या विषयावरील लेक चालली सासरला तर सर्व महाराष्ट्रात जोरात चालू आहे. यावरून हे स्पष्ट होत की आता तमाशा लावण्याचा मसाला घातल्यावाचूनही मराठी चित्रपट सहज लोकप्रिय होऊ शकतात. या चित्रपटांची तांत्रिक पातळीही निश्चित उंचावली आहे. चित्रपटांची तांत्रिक बाजू अधिक भक्कम व आधुनिक व्हावी यासाठी राज्य सरकारने मुंबईच्या एक उपनगरात मोठी चित्रनगरी बांधली असून तेथे डबिंग, ध्वनिमुद्रण व मिक्सिंग यांसाठी अत्याधुनिक सामग्री वापरण्याची सोय केलेली आहे. नुकतीच राज्य सरकारने बांधायला हातात घेतलेली कोल्हापूरची चित्रनगरीही पुढच्या वर्षी पूर्ण व्हावी, आणि त्यानंतर तेथे मराठी तर मुंबईत हिंदी चित्रपट निर्मिती असे विभाजन होईल.

येथे मुख्य समस्या सिनेगृहात मराठी चित्रपट दाखवायची वेळ खरेदी करणे हीच आहे. राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे वर्षातून चार आठवडे तरी प्रत्येक चित्रपटगृहाने मराठी चित्रपट दाखवलेच पाहिजेत. परंतु या आदेशाचे काटेकोर पालन होते अशी परिस्थिती नाही. परंतु आता हिंदी चित्रपट फार मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ फिल्मच्या रूपाने निघू लागल्यामुळे ही समस्या आपोआपच सुटण्याची शक्यता आहे. याखेरीज वरील करपरतीच्या योजनाही सरकार राबवीत असल्याने मराठी चित्रपटांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे यात शंका नाही.


महाराष्ट्रातील चित्रपटाचा इतिहास (महाराष्ट्र) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- वसंत साठे


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

अभिप्राय: 1
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,2,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1345,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,36,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,3,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1086,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,25,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,220,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,68,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,33,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,8,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1129,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,27,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,286,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,54,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: महाराष्ट्रातील चित्रपटाचा इतिहास (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील चित्रपटाचा इतिहास (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील चित्रपटाचा इतिहास (महाराष्ट्र) - चित्रपट व्यवसायात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे [History of Chitrapat in Maharashtra].
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEirQXiDFKpSfEEZioB_Ryf_N_Si5_vme091Ed4DHpOcyeZKV5gkDawWJNkjTjbOOcqkZVf2O8bR8jgOwxhcF9hPky6wo5BrwQ8WgfFFrN5Na7qtj39Hk0um7YL0UzRNsOVLM3AEXPiD_DLU/s16000/mohan-gokhale-ramesh-dev-nayana-apte-and-ashok-saraf-in-movie-hech-majhe-maher.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEirQXiDFKpSfEEZioB_Ryf_N_Si5_vme091Ed4DHpOcyeZKV5gkDawWJNkjTjbOOcqkZVf2O8bR8jgOwxhcF9hPky6wo5BrwQ8WgfFFrN5Na7qtj39Hk0um7YL0UzRNsOVLM3AEXPiD_DLU/s72-c/mohan-gokhale-ramesh-dev-nayana-apte-and-ashok-saraf-in-movie-hech-majhe-maher.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/chitrapat-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/chitrapat-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची