Loading ...
/* Dont copy */ body{user-select:none;-moz-user-select:none;-ms-user-select:none;-khtml-user-select:none;-webkit-user-select:none;-webkit-touch-callout:none} pre, code, kbd, .cmC i[rel=pre]{user-select:text;-moz-user-select:text;-ms-user-select:text;-khtml-user-select:text;-webkit-user-select:text;-webkit-touch-callout:text}

मुंबई दृष्टिकोन - महाराष्ट्र

मुंबई दृष्टिकोन, महाराष्ट्र - [Mumbai, Drushtikon, Maharashtra] बॉम्बे हे नाव मुंबई ह्या मूळ नावाच्या पोर्तुगीजानी केलेल्या बॉम्बैम्‌ अशा भ्रष्ट रूपावरून आले आहे.

बॉम्बे हे नाव ‘मुंबई’ ह्या मूळ नावाच्या पोर्तुगीजानी केलेल्या बॉम्बैम्‌ अशा भ्रष्ट रूपावरून आले आहे

बॉम्बे हे नाव ‘मुंबई’ ह्या मूळ नावाच्या पोर्तुगीजानी केलेल्या बॉम्बैम्‌ अशा भ्रष्ट रूपावरून आले आहे. जुन्या पोर्तुगीज दप्तरात ह्या बंदराच उल्लेख ‘मौम्बैम्‌’ व बॉम्बेम्‌’ अशा दोन्ही नांवानी केलेला आढळतो. ‘मुंबई’ हा शब्द ह्या बेटांच्या आद्य रहिवाश्यांच्या - कोळी जमातीच्या ‘मुम्बाआई’ ह्या कुलदेवतेच्या नावावरून आलेला आहे. हल्ली ज्या ठिकाणी व्हिक्टोरिया टर्मिनस आहे त्याच्या जवळपास ह्या देवीचे मूळ देवालय होते. गुजरातच्या सुलतान मुबारकने इ.स. १३२० च्या सुमारास ह्या बेटांवर जेव्हा स्वारी केली तेव्हा बहुधा हे देवालय नष्ट केले गेले असावे. ते पुन्हा बांधले गेल्यानंतर इ.स. १७३७ पर्यंत तिथे होते. त्यानंतर मुंबई सरकारने जुन्या शहराची तटबंदी विस्तृत करण्यास सुरवात केली तेव्हा ते भुलेश्वर जवळ सध्याच्या जागी पुन्हा नव्याने उभारले गेले.

इतिहासपूर्व काळी मुंबई ही हिंदुस्थान देशाचा एक भाग असावी. पण कालांतराने भूकंपाच्या उद्रेकामुळे ती लहान लहान बेटांत विभागली जाऊन अलग झाली व ती अपरान्ताचा (उत्तर कोकणचा) भाग म्हणून मानली गेली. दक्षिणेकडच्या रत्नागिरीच्या किनाऱ्यावरून भंडारी (ताडी काढणारे ) इकडे आले.

इसवी सनापूर्वी आठव्या शतकात आर्यांनी दक्षिणेवर स्वारी केली. वसईजवळ शूर्पारक (सोपारा) येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखावरून व अवशेषावरून असे दिसते की इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात हे राज्य बौद्ध सम्राट अशोक ह्याच्या आधिपत्याखाली होते. नंतर मौर्य, सातवाहन, क्षत्रप आणि त्यानंतर राष्ट्रकूट व चालुक्य इथे आले. चालुक्य राजा मंगलराज ह्याने मुंबई बंदरातील एलिफण्टा बेटातील पुरी येथे आपली राजधानी बसवली होती. त्यानंतरच्या शिलाहारांच्या कारकीर्दीत, लंकेला जाताना राम जिथे काही काळ राहिला होता त्या वाळेकश्वरी एकमंदिर बांधले गेले होते. त्या मंदिराच्या कीर्तीमुळे, तसेच तिथल्या जवळपासच्या समुद्रात असलेल्या श्री गुंडीच्या (पवित्र गुहेच्या) अपूर्व महात्म्यामुळे मलबार आणि पश्चिम किनाऱ्याच्या इतर भागांतून भाविक लोक सतत दर्शनास येत असत. त्यावरून त्या जागेला ‘मलबार पॉइन्ट’ व भोवतालच्या टेकडीला ‘मलबार हिल’ अशी नावे पडली. हे वाळकेश्वर मंदिर सुलतान मुबारकने किंवा पोर्तुगीजानी नष्ट केले. श्रीगुंडीचे काही अवशेष गव्हर्नमेण्ट हाऊसजवळच्या किनाऱ्यावर अद्याप दिसू शकतात. ह्याच सुमारास (इ.स. १०६०) शिलाहारांनी बांधलेले आणखी एक मंदिर ठाणे जिल्हयातील अंबरनाथ येथे आहे आणि आजही ते सुस्थितीत असून त्या काळच्या मंदिर शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणून प्रेक्षणीय आहे. शिलाहारानंतर देवगिरीचे यादव इथे आले. असे सांगतात की यादव वंशाचा कुलदीपक राजा बिंब उर्फ भीमदेव ह्याने आपली राजधानी माहीम येथे स्थापन केली होती व त्याने आपल्यासमवेत काही लोक आणून तिथे वसाहत उभारलि, नारळाची झाडे लावली आणि घरे व मंदिरे बांधली. त्याच्या आश्रितांपैकी प्रभु पळशीकर, ब्राह्मण आणि पांचकळशी त्याचाबरोबर इथे आले व माहिमच्या आसमंतात त्यानि वस्ती केली. आपली कुलदेवता प्रभादेवी हिचे भीमदेवाने त्यावेळी बांधलेले देऊळ नंतरच्या मुसलमांनाच्या स्वारीत नष्ट केले गेले. जवळपासच्या विहिरीत त्यावेळी दडवलेली देवीची मूर्ती कालांतराने वर काढण्यात आली व इ, स. १७१४ मध्ये प्रभु ज्ञातीने हल्लीच्या जागी प्रभादेवी येथे एक नवे मंदिर बांधून देवीची स्थापना केली.

[next] मुसलमानी अमल इथे इ.स. १३५८ ते १५३४ पर्यंत होता. ह्या कालखंडातील वास्तुशिल्पाचा एकमेव नमुना म्हणजे माहिम येथील मख्दूम फकी अली पारूचा दर्गा. आजही कोकणी मुसलमान त्याची भाविकतेने पूजा बांधतात. पंधराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज भारतात आले. इ.स. १५३४ मध्ये त्यानी गुजरातचा सुलतान बहादुरशहा ह्याला युद्धात नमवून वसई प्रांत, बेटे व सभोवतालचा समुद्र ह्यांचा ताबा मिळवून पोर्तुगालचा राजा आणि त्याचे वारस ह्यांचे त्यावर आधिपत्य प्रस्थापित केले. अशा रीतीने मुंबई बेटे ख्रिस्ती धर्मीयांच्या मालकीची झाली. पोर्तुगीजांनी ह्या बेटांचे निरनिराळे भूखंड पाडून पोर्तुगालच्या राजाला भावी कालात युद्धविषयक सहाय्य करण्याचे आश्वासन देणाऱ्यांना बक्षीस म्हणून अथवा नाममात्र भाडे आकारून ते दिले. अशा एका भूखंडाचा पहिला भाडेकरी मेस्त्री दिओगो हा होता. सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ व भिषग्वर गार्सिया द ओर्टा हा त्याचा वारस होता. ह्या भूखंडाबद्दल तो वार्षिक ८५ पौंड भाडे भरीत असे. त्याने राहण्यासाठी बांधलेला सोळाव्या शतकातला भव्य प्रासाद ‘क्विन्टा’ हा सध्या टाऊनहॉलचा पिछाडीस भारतीय आरमाराच्या ‘आंग्रे’ नावाच्या वसाहतील असलेल्या ‘बॉम्बे कॅसल’ मधल्या शस्त्रागाराच्या जागी होता. ह्या प्रासादाभोवती हिंदुस्थानात सर्वोत्त्म गणली गेलेली त्याची रम्य आणि विस्तृत बाग होती. पुढे डच व इंग्रजांनी केलेल्या स्वाऱ्यांत ह्या प्रासादाच काही भाग जळाला.

पोर्तुगीजांनी निरनिराळ्या ख्रिस्ती धर्मपंथीयानाही जमिनी दिल्या होत्या. फ्रान्सिस्कन व जेझुइट पंथीयांनी इथे कित्येक प्रार्थनामंदिरे (चर्च) बांधली. त्यापैकी उल्लेखनीय असलेले नोसा सेन्होरा डा एस्परान्का हे चर्च एस्प्लनेडवर होते. इ,स. १७६० साली सरकारी आज्ञेने ते पाडण्यात आले व १८३० च्या सुमारास भुलेश्वर येथे पुन्हा उभारण्यात आले. त्याच्या पूर्वास्तित्वाची खूण म्हणजे क्रॉस मैदान नावाने आज परिचित असलेल्या मैदानात अस्तित्वात असलेला भव्य क्रॉस, उत्तर माहिम भागात अंदाजे सन १५४० मध्ये बांधलेले सांमिगेल चर्च, दादरचे पोर्तुगीज चर्च नावाने ओळखले जाणारे इ.स. १५९६ मध्ये बांधलेले नोसा सेन्होरा डा साल्वासाव चर्च, माझगावाच्या चर्च स्ट्रीट मधील क्रॉसच्या जागी पूर्वी असलेली नोसा सेन्होरा डा ग्लोरिया आणि सध्याच्या परळच्या हाफकीन इन्स्टिट्यूटच्या जागी होते ते नोसा सेन्होरा डा बॉम कॉस्टेलो चॅपेल हीही सर्व त्याकाळची महत्त्वाची चर्चेस्‌ होती.

पोर्तगीज मिशनऱ्यांनी स्थानिक ख्रिस्ती रहिवाशाच्या गरजांचा विचार न करता ह्या धार्मिक बांधकामासाठी पैशाची खूप उधळपट्टी केली. जनतेच्या अज्ञानाचा गरिबीचा त्यानी गैर फायदा उठवला. धर्मान्तर करून ख्रिस्ती होणाऱ्या लोकांना त्यांनी सर्व तऱ्हेच्या सवलती व देणग्या दिल्या. ज्यानी धर्मान्तर करण्यास विरोध दर्शविला त्यांची मानहानी केली. त्याना मोलमजुरी करण्याची सक्ती केली आणि कामगारांना गुलामासारखे छळाले ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांनी स्थानिक मंदिरे व मूर्ती यांचा सूड बुद्धीने विध्वंसही केला.

[next] ह्या काळच्या पोर्तुगीज प्रार्थनामंदिरामध्ये कालांतराने पूष्कळ बदल झाले. उरली ती फक्त जुनी नावे. पोर्तुगीज राजसत्ता कालीन वास्तूंपैकी बॉम्बे कॅसलची तटबंदी, पोर्तुगिज सैनिकांच्या शिल्पाकृती दोन्ही बाजूस असलेले भव्य प्रवेशद्वार व अंतर्भागतात वैचित्र्यपूर्ण शिल्पकास असलेले दहा फुट उंचीचे भव्य छायायंत्र एवढीच उरली आहेत.

ग्रेट ब्रिटनचा राजा दुसरा चार्लस व पोर्तुगीज राजकन्या कॅथेरिन ब्रॅगन्झा ह्यांच्या विवाह करारान्वये मुंबई बंदर व बेटे ग्रेट ब्रिटनच्या राजाला देण्यात आली व १६६५ मध्ये त्याच्या ताब्यात आली.

त्या काळी मुंबईचा महसूल फार अल्प होता आणि तो एस्प्लनेड व मलबार हिलच्या मधल्या जागेत माहिम येथे असलेल्या ताडमाडांपासून व सखल जमिनीवरच्या भातशेतीपासून प्राप्त होत असे. बेटांचा इतर सर्व भाग दलदलीचा, नापीक व पडित होता. लोकसंख्या जेमतेम दहा हजार होती. काही थोडे कोळी, शेतकरी व प्रभु, ब्राह्मण आणि मुसलमान सोडले तर इतर बहुसंख्याक लोक जातीहीन, भटके व उडाणटप्पू होते. इ,स. १६६८ साली राजसत्तेच्या सनदेनुसार वार्षिक दहा पौंड भाड्याने मुंबई बेटे ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आली. बंदर म्हणून मुंबईचा विकास करणे व बाहेरच्या लोकांना इथे वस्ती करण्यासाठी आवाहन करणे ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे प्रथम लक्ष देण्याचा विचार करण्यात आला.

[next] ईस्ट इंडिया कंपनीकडे अधिकार आल्यानंतर सुरतेचे अध्यक्ष सर जॉर्ज ऑक्सिन्डन ह्याना मुंबईचे पहिले गव्हर्नर नेमण्यात आले. जुलै १६६९ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी जेराल्ड ऑजिअर आले. हा थोर मनाचा आणि समंजस गव्हर्नर आधुनिक मुंबईचा खरा संस्थापक होता असे म्हणता येईल. त्याने मुंबईची संरक्षण व्यवस्था दृढ केली. जमीन महसुलाची शिस्तबद्ध योजना आखली. न्यायालय स्थापन केली. टाकसाळ स्थापन करून पहिले रुपयाचे नाणे पाडले. रुग्णालय बांधले. मुद्रणालय स्थापन केले. पंचायत योजना सुरू केली आणि बेटांवरल्या सर्व रहिवाशाना व्यापार आणि धर्माचरणाच्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिले. १६७५ च्या सुमारास मुंबईची लोकवस्ती साठ हजार झाली पोर्तुगीज सत्ताकाली असलेल्या सर्वाधिक लोकसंख्ये पेक्षा ती पन्नास हजारांनी अधिक होती.

मुबंई हे व्यापाराचे प्रमुख केंद्र व्हावयाचे असेल तर तिचे उद्योग व्यवसाय स्थापन होणे इष्ट आहे. तसेच व्यापारी वस्तुही तिथे निर्माण झाल्या पाहिजेत हे जाणून ऑजिअरने कसबी कारागीर, कामगार व व्यापारवर्ग ह्याना बेटात वस्ती करण्यासाठी उत्तेजन दिले. त्याच्या सहिष्णू कारभारामुळे निरनिराळ्या जातीजमातीत विश्वास उत्पन्न झाला आणि गुजरातेतील पारशी व बनिया लोकाना इथे आपल्या बुद्धिकौशल्याला वाव मिळू शकले अशी खात्री पटून तेही मुंबईकडे वळले. इ.स. १६७३ मध्ये ऑजिअरने पारशी धर्मायांच्या शवसंस्कार आवश्यक असे स्मशान ( टॉवर ऑफ सायलेन्स ) बांधण्यासाठी मलबार हिलवर जागा दिली व त्यांचे वास्तव्य आणि धर्मसंस्कार सुकर होण्यासाठी असलेली मोठी अडचण दूर केली. तसेच नीमा पारेख ह्या बनियालाही सर्व धार्मिक सोयीसवलती देऊ करून आप्तेष्टांसहित मुंबईत वास्तव्यासाठी येण्याचे आवाहन केले. हे सर्व ऑजिअरच्या दूरदृष्टीस साजेल असेच होते. कारण मुंबीचे रूप कालांतराने पार बदलून टाकण्यासाठी ह्याच पारशी व बनियांची व्यापार व उद्योगव्यवसायातील अक्कल हुशारी कारणीभूत झाली. जून १६७७ मध्ये सुरत येथे ऑंजिअरचे निधन झाले. त्याने मुंबईत उभारलेले कांहीही आज अस्तिवात नसले तरी मुंबईला विकासासाठी त्याने केलेल्या योजना मात्र अद्याप बहुतांशी टिकून राहिल्या आहेत.

[next] व्यापार व वाहतूक सुलभ व्हावी ह्यासाठी मुंबई सुरक्षित राखण्याचा ऑंजिअरच्या निर्धार होता. ह्यासाठी त्याने निरीक्षण मनोरे बांधले,मुख्य किल्ला भक्कम केला व मोक्याच्या ठिकाणी बुरुजही बांधले. तसेच पश्चिम व उत्तरेकडूनही संरक्षण व्हावे म्हणून वरळी, माहिम व शीव येथे किल्ले बांधले. मुंबई नगराचे शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे ह्यासाठी नगराभोवती तटबंदी बांधण्याचाही त्याने बेत केला. ही तटबंदी पश्चिमेकडील मेन्ढॅम पॉईंटपासून पूर्वेकडे पोर्तुगीजांचा डोंगरी किल्ला आहे तिथपर्यंत बांधली जावयाची होती. ही योजना अखेरीस १७१६ साली गव्हर्नर सर चार्ल्स्‌ बूनच्य कारकीर्दीत पूर्ण झाली. रॉयल इंडियन मरीनच्या संचालकाच्या बंगल्याच्या पूर्वेकडील टोकाला सुरवात होऊन रॅम्पार्ट रो ( त्याकाळी रोपवॉक ) पर्यंत व तिथून एस्प्लनेड व हॉर्न्बी रस्त्यांच्य दिशेने पूर्वेकडे वळण घेऊन पोर्ट स्ट्रीट जवळच्या मोदी बे पर्यंत ती पोचली होती. १७३९-४३ दरम्यान ह्या तटबंदीभोवती खंदक खणण्यात आले आणि पुढल्या दोन दशकात बुरूज, निरीक्षण मनोरे व तोफखान्याची त्यात भर पडली. १७६९ च्या सुमारास गुन्हेगार व ऋणकोसाठी कोठडी म्हणून वापरण्यात येणारा पोर्तुगीजांचा डोंगरी किल्ला पाडण्यात आला आणि त्याजागी एक भव्य भक्कम ‘फोर्ट जॉर्ज’ किल्ला बांधण्यात आल. ह्या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष सेन्टज~इर्ज हॉस्पिटलच्या पिछाडीस आजही पहावयास मिळातात. ह्या किल्ल्यचा (फोर्ट) विस्तार उत्तर-दक्षिण दोन मैल व पूर्व-पश्चिम पाउण मैल असा होता. किल्ल्याला तीन मुख्य दरवाजे होते. -अपोलो गेट, चर्चगेट व बझार गेट. अपोलो गेट हा दक्षिण दिशेला सेण्ट अ‍ॅंण्ड्र्यूज चर्चजवळ होता. चर्चगेट हा हल्लीच्या फ्लोरा फाऊन्टन जवळ होता व शहारात येण्याजाण्याचा तो मुख्य दरवाजा होता. बझार गेट हा बझार स्ट्तीटच्या उत्तरेकडील टोकाशी होता आणि स्थानिक जनता व व्यापारी प्रामुख्याने त्याचा वापर करीत असत. किल्ल्याच्या आंत दक्षिण बाजूस सरकारी, युरोपिअन व्यापाऱ्यांच्या पेढ्या आणि निवासस्थाने होती. उत्तरेकडील बाजूस एतद्देशीय लोकांची वस्ती - त्यांच्या पेढ्या व निवासस्थाने होती बॉम्बे ग्रीन हे हिरवळयुक्त मैदान मध्येभागी होत. पूर्वेच्या बाजूस कस्टम्स हाउसेस, बंदर, टाकसाळ व ‘बाम्बे कॅसल’ होता. बझार गेट स्ट्रीटवर बनिया लोकांनी निवासस्थाने व मंदिरे होती. पारशी लोक प्रामुख्याने पारशी बझार स्ट्रीटवर व बोहरी लोक बोरा बझार स्ट्रीटवर राहात असत. ह्या एतद्देशीय वसाहतीतील घरे अगदी एकमेकाला खेटून बांधलेली होती. आरोग्यरक्षणाची व्य्वस्था जुनाट पद्धतीची होती. विहिरी आणि खुल्या तलावातून पाणीपुरवठा होत असे व लोकवस्तीच्या मानाने तो अपुरा असून पाणी बहुतेक अशुद्दच असे. इ,स. १८००३ मध्ये फोर्टमधल्या ह्या भागात लागलेली भयंकर आग ही एका परीने नगराची नवरचना व आरोग्य योजना आखणाऱ्याना वरदानच होते . ह्या आगीत ४७१ घरे भस्मसात होऊन जवळजवळ चाळीस लाख रुपांचे नुकसान झाले. सरकारने त्यानंतर एक समिती नेमली. तिने नव्याने नगररचना करण्याच आराखडा तयार केला. पण जुन्याच पायावर इमारती उभारण्याच हट्ट धरणाऱ्या घरमालकंनी ह्या आराखड्यास विरोध केला. आजही हा विभाग दाटीवाटीने वसलेला व असुरक्षित असून बझार गेट स्ट्रीटवर ह्या जुन्या इमारती तशाच खेटून दुतर्फा उभ्या असलेल्या दिसतात.

इ.स. १७३६ मध्ये सुरतेचा पारशी कंत्राटदार लवजी नसरवानजी वाडिया ह्याच्या देखरेखीखाली डॉकयार्डचा विस्तार करण्यात आला. १७७० च्य सुमारास नगरविस्तारासही प्रारंभ झाला. त्यासाठी प्रथम जुनी, काळोखी व आरोग्यविघातक घरे पाडण्यात आली आणि एस्पलनेडचे मैदान सारखे व विस्तृत करण्यात आले. किल्ल्याबाहेर घरे बांधण्यासाठी नागरिकाना सर्व सोयीसवलती देण्यात आल्या, ईस्ट इंडिय कंपनीने साष्टी आणि बंदरातील इतर बेटीचा ताबा मिळवला. त्या काळिई मुंबईचा बहुतेक व्यापार जलमार्गेच होत असे. मुंबईच बेटांच्या सभोवती एकूण ४५ बंदरे आणि धक्के त्यासाठी उपलब्ध होते. त्या बंदरात छोटीमोठी गलबते व पडाव निरनिराळ्या प्रकारच्या मालाची नेआण करीत असत. मात्र माल‌उतारचे मुख्य बंदर ओल्ड्‌ कस्टमस्‌ हाऊस जवळ होते. पोर्तुगीजांनी आपल्या सैनिकांसाठी तिथे वराकी बांधल्या होत्या. त्यापैकी काही माल ठेवण्यासाठी व काही ईस्ट इंडिय कंपनीच्य ‘रायटर्सना’ (कारकून) राहाण्यासाठि वापरण्यात आल्या. ह्या ओल्ड्‌ कस्टम्‌ हाउसच्या इमारतीचा दर्शनी भाग गव्हर्नर ऐन्स्लाबीच्या कारकीर्दीत १७१४ मध्ये बांधण्यात आला असावा. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस असलेल्या लेखशिलेवर ईस्ट इंडिय कंपनीने कुलमानद्योतक चिन्ह, गव्हर्नरचे नाव आणि वर्ष १७१४ ही कोरलेली आहेत. ही लेखशिला प्रवेशद्वाराबाहेर बऱ्याच वर्षांनी बांधलेल्या पोर्चमुळे झाकली गेली आहे. ह्यावरून ह्या इमारतीचे वय समजू शकते. १८०२ नंतरच ह्या इमारतीचा कस्टम्स्‌ हाऊससाठी उपयोग होऊ लागला आणि १८९५ मध्ये ह्या इमारतीची डागडुजी करण्यात येऊन तिच्यावर एक मजलाही चढविण्यात आला.

[next] ह्या ओल्ड्‌ कस्टम्स‌ हाऊसच्या जवळपास व हल्लीच्या कामा हॉलच्या शेजारी अशीच एक जुनी इमारत आहे. गेल्या अडीचशे वर्षात मुंबईत पुष्कळ बदल झाला असला तरीपण हे ‘अ‍ॅडमिरल्टी हाऊस’ जसे होते तसे त्या ठिकाणी राहिले आहे. हे घर गव्हर्नर हॉन्बींच्या मालकीचे होते. १७७० ते १७९५ पर्यंत इंग्रजांच्या भारतातील आरमाराच्या प्रमुख अधिकाऱ्याचे ह्या ठिकाणी कार्यालय होते. १७८६ ते १८७८ पर्यंत ह्या घरात मेयर्स कोर्ट होते. पुढे १८६२ मध्ये त्याचे हायकोर्ट असे नामांतर होऊन ते १८७८ पर्यंत त्या ठिकाणीच चालू राहिले. त्यानंतर ही इमारत ग्रेट वेस्टर्न हॉटेलचा भाड्याने देण्यात आली. ह्या इमारतीच्या प्रवेशा द्वाराजवळ बाहेरच्या बाजूस बसवलेला संगमरवरी शिलालेख हा सर्व इतिहास मोठ्या अभिमानाने प्रदर्शित करीत आहे.

किल्ल्याच्या पश्चिमेकडच्या दरवाजाला चर्चगेट असे नाव पडएल. ते त्याच्या आसमंतात ह्या बेटावरच्या पहिल्या अ‍ॅम्लिकन चर्च-सेन्ट थॉमस कॅथीड्रलवरून हे चर्च १७१५ मध्ये बांधण्यास घेतले व १७१८ मध्ये ते पूर्ण झाले. १७१८ सालच्या नाताळच्या दिवशी त्याचे उद्‍घाटन झाले. रेव्हरंड रिचर्ड कॉबच्या असीम प्रयत्नामुळेह्च अहे चर्च उभारले गेले. त्यासाठी लोकांकडून त्याने वर्गणी गोळा करून फंड जमविला होता. ही इमारत साढी पण विस्तृत होती व तिच्या मनोऱ्याचा वरचा भाग कंदिलासारखा होता. मनोऱ्याच्या मध्यावर घंटालय होते. त्यातील घंटा गव्हर्नर बूनने देणगीदाखल दिली होती. ही भव्य घंटा मुंबईतच घडविलेली होती. १८५३ साली सेन्ट थॉमस चर्चला कॅथीड्रलचा दर्जा देण्यात आला. ह्या घटनेचा स्मृतीप्रीत्यर्थ चर्चच्या मनोऱ्याची उंची वाढवून तो मोठा करण्यात आला. पूर्वीच्या घंटालयाच्या ठिकाणी आज असलेला मनोरा उभारण्यात येऊन वरच्या मनोऱ्याच्या तळाशी तांब्याच्या तबकड्या व जोड काटे असलेले चौमुखी भव्य घड्याळ बसविण्यात आएल. ह्या कॅथीड्रलमध्ये ऐतिहासिक महत्वाची अनेक स्मारके चतुर्स्त्र भिंतीवर प्रदर्शित केली असून दक्षिणोत्तर मधल्या भागातील संगमरवरी स्मृतीचिन्हांच्या कलापूर्ण शिल्पाकृती अत्यंत आकर्षक आहेत. चर्चच्या पश्चिमेला प्रवेडद्वारानजिक एक शोभिवंत कारंजे असून ती सर कावसजी जहांगीर रेडीमनी ह्यांची भेट आहे.

बॉम्बे कॅसलच्या उत्तरेस टाकसाळ होती. मोदी बे रेक्लेमेशन योजनेद्वारे समुद्र हटवून प्राप्त केलेल्या जमिनीवर ही इमारत १८२९ मध्ये बांधण्यात आली. तिची रचना ग्रीक वास्तुशिल्प पद्धतीची आहे. सुरवातीस तीन वाफेच्या इंजिनावर टाकसाळीचे कम चालू करण्यात आले होते. नाणी पाडण्यासाठी ऐरणी व हातोडे वापरण्यात आले होते. १६७२ साली पहिले रुपयाचे नाणे पाडण्यात आले. त्यावर ईस्ट इंडिय कंपनीचे कुलमानद्योतक चिन्ह होते.

[next] पूर्वी मुंबईचा टाऊन हॉल हा निरनिराळ्य ठिकाणि होता. शेवटी तर हॉर्न्बी हाऊसच मधला दिवाणखाना टाऊन हॉलसाठी वापरण्यात येत होता. १७९३ साली टॉऊन हॉलसाठी स्वतंत्र इमारत असावी अशी सूचना केली गेली होती पण तिला सरकारचा पाठिंबा मिळाल नाही. ईस्ट इंडिया कंपनीचे न्यायाधीश सर जेम्स मॅकिन्टॉश ह्यानी १८०४ च्या नोव्हेम्बरमध्ये प्रमुख नागारीकांची सभा भरवली व लिटरती सोसायटी ऑफ बॉम्बे स्थापना करण्याची योजना सभेपुढे मांडली. त्यांची ही योजना तत्काळ स्वीकृत झाली ह्या संस्थेच्या ग्रंथालय व वस्तुसंग्रहालयासाठी स्वतंत्र इमारत असावी व त्या इमारतीत सभा, सम्मेलने व व्याख्याने भरवण्यासाठी एक विस्तृत हॉलही असावा असेही त्यानी सुचवले. इमारत बांधणीच्या खर्चासाठी लॉटरी काढावी ही त्यांची सूचना कंपनी सरकारने मान्य केली. अशा तीन लॉटऱ्या काढून मिळालेला पैसा इमारत सुरू करण्यास पुरेसा होता. पण दोन वर्षात बांधकामावर तो सर्व खर्च झाल्यामुळे १८२३ साली आणखी एक लॉटरी काढावी लागली. पण तिला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. इ,स. १८२६ मध्ये सरकारने ही योजना स्वतः हाती घेतली व संस्थेशी बोलणी करून १८२९ मध्ये इमारतीच्या बांधकामास पुन्हा सुरवात केली. १८३३ मध्ये इमारत पूर्ण बांधून झाली. ही इमारत २६० फूट लांब व १०० फूट रुंद आहे. मध्यवर्ती असलेल्या टाऊन हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी पश्चिमेच्या बाजूस ३० दगडी विस्तृत पायऱ्यांचा खुला जिना अहे. इमारतीत एक उंच तळघर असून वर एक मजला आहे. इमारतीचा दर्शनी भाग, उंच स्तंभा व विस्तृत द्वारमंडपाचे वास्तुशिल्प ग्रीक पद्धतीने प्रभावित झाल्यासारखे दिसते. इमारतीच्या आग्नेयेकडील भागात ‘दरबार हॉल’ आहे. ह्या लहान हॉलमध्ये पूर्वी गव्हर्नरचा दरबार भरत असे. तसेच कौन्सिलच्या बैठकीही होत असत. काही वेळी मॅट्रिक व विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यसाठी टाऊन हॉलचा उपयोग करण्यात आला होता. १मे १८६२ रोजी टाऊन हॉलमध्ये नामदार गव्हर्नर सर बार्टल्‌ फ्रिअर ह्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या चार पदवीधराना पदव्या अर्पण करण्याचा समारंभ झाला होता. ह्या हॉलशी संबंधित अशी आणखी एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना म्हणजे राणीच्या जाहिरनाम्याची घोषणा. १ नोव्हेम्बर १८५८ रोजी मोठ्या थाटामाटात साजऱ्या झालेल्या समारंभाच्या वेळी गव्हर्नर लॉर्ड एल्फिस्टन ह्यांनी टाऊन हॉलच्या अगदी वरच्या पायऱ्यावरून हे प्रकट वाचन केले होते.

लॉर्ड एल्फिस्टनच्या कारकीर्दीत १८६१ मध्ये विहार जल प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे १८२४ च्या तीन जल दुष्काळानंतर प्रथमच मुंबईकरांना भरपूर स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ लागले. तसेच समुद्र हटवून भूसंपादन करण्याच्या एल्फिन्स्टन रेक्लेमेशन योजनेमुळे मुंबई बेटाचा विस्तार होण्यास मदत झाली.

[next] अशा काही भव्य इमारती सोडल्या तर फोर्ट विभागाची अवस्था माल गच्च भरून बाहेर ओसंडू पाहणाऱ्या एका मोठ्या टोपलीसारखी झालेली होती. एप्रिल १८६२ मध्ये सर बार्टल्‌ फ्रिअर गव्हर्नर झाले तेव्हा त्याना मुंबईची घरे व स।ंडपाणी व्यवस्था आरोग्य विघातक व निकृष्ट अशी आढळली. वाढत्या लोकवस्तीसाठी अधिक घरे बांधण्यासाठी जमीन आवश्यक होती. तसेच हवेशीर घरे व मोकळे रस्ते ह्यांच्य सुलभ रचनेसाठी अधिक खुली जागाही हवी होती. लॉर्ड एल्फिन्स्टन आणि सर जॉर्ज क्लार्क ह्या पूर्वीच्या गव्हर्नरांनी ह्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या समित्या नेमल्या होत्या. ह्या सर्व समित्यांनी एकमुखाने सुचवलेली मुख्य शिफारस किल्ल्याची उंच तटबंदी पाडून टाकण्याची होती. बार्टल्‌ फ्रिअर ह्या सूचनेशी सहमत झाले आणि ही अमावश्यक तटबंदी, जुने बुरूज व आरोग्य विघातक खंदक पाडून नष्ट करण्याचे आदेश त्यानी ताबडतोब दिएल.

सर बार्टल्‌ फक्त एवढ्यावरच संतुष्ट नव्हते. विध्वंसापेक्षा निर्मितीत त्याना अधिक रस होता. एक नवीन आकर्षक व रचनाबद्ध शहर उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते. लॉर्ड एल्फिन्स्टननी खाली ठेवलेली लगाम त्यानी उचलली आणि सुधारणेच रथ इतक्या वेगात पिटाळला की हिंदुस्थान सरकारचे त्यामुळे धाबे दणाणले व चीडही आली. पण सार्वजनिक हिताच्या त्यांच्या योजना इतक्या बिनतोड व अपरिहार्य होत्या की अखेर सरकारला त्या सर्व मुकाटपणे मान्य कराव्या लागल्या व त्यामुळे शहराचे रूप संपूर्ण पालटून गेले. ह्या प्रमुख सुधारणा समुद्र हटवून भूभाग संपादने, दळणवळण सुलभ करणे आणि आकर्षक सरकारी इमारती उभारणे ह्या बाबतीत विशेषत्वाने होत्या. नैऋत्येकडील अपोलो बंदर ते कुलाबा. पूर्व व ईशान्येकडील कस्टम्स हाऊस ते शिवडी आणि पश्चिमेकडील कुलाबा ते मलबार हिल हे सागरी विभाग हटवून त्यानी बेटाचा विस्तार चहूबाजूनी केला. ह्यामुळे पुष्कळ जमीन तर उपल्ब्ध झालीच पण शिवाय शहराच्य आरोग्यातही सुधारणा होऊन जनतेचे जीवन सुलभ आणि सुखदायक झाले. दळणवळण सुधारण्यासाठी बार्टल फ्रिअरनी ३५ रस्ते बांधले व सुधारले. त्यांचे पदपथ विस्तृत करून टोकाशी हारीने वृक्ष लावण्यात आले. तसेच योग्य ठिकाणी बागा व उपवने तयार करण्याचे व शोभिवंत कुंपणे घालण्याचे आदेशही त्यानी दिले. ह्यापैकी उल्लेखनीय बागा म्हणजे व्हिक्टोरिआ गार्डन्स, युनिव्हर्सिटी गार्डन्स, एल्फिन्स्टन सर्कल गार्डन व नॉर्थब्रूक गार्डन ह्या होत. किल्ल्याची तटबंदी पाडल्यानंतर एस्प्लनेडवर एक नवीन नगर उभारण्याची व तिथे आकर्षक व प्रमाणबद्ध सरकारी इमारती बांधण्याची त्यांची योजना होती. ह्या कामासाठी त्यानी अनेक आंतरराष्ट्रीय विख्यात वास्तुशिल्पकाराना पाचारण केले होते. त्यांच्य कारकीर्दीत ह्या सर्व इमारती जरी पूर्ण होऊ शकल्या नसल्या तरी प्रत्येक इमारतीच्या रचनेचा नकाशा, बांधकामासाठी लागणारे दगड व संगमरवर, तसेच कमानीचे स्वरूप व आकार, घुमट, मनोरे आणि कोरीव नक्षीकाम इत्यादिकांचे बार्टल्‌ फ्रिअरनी तपशीलवार विवेचन करून मगच त्यानी मान्यता दिली होती. यथाकाल फोर्ट विभागाच्या पश्चिमेकडे ह्या भव्य इमारती साकार झाल्या. अशा तऱ्हेची समतोल आकर्षक रचना पूर्व बाजूस करणे शक्य नव्हते. कारण तो भाग अगोदरच व्यापला गेला होता. उत्तरेकडचा बझार गेट विभाग दाटीवाटीने वसलेला होता. नवीन बांधकामाला तिथे मुळीच वाव नव्हता. पण अमोदी बे कडील भराव घालून संपादन केलेला भूभाग मोकळा होता. तिथे व्यापार गृहाना व सागरी आयात निर्यात करणाऱ्या बोटकंपन्याना जागा देण्यात आल्या. पण एवढ्या सुधारणा व परिवर्तन करूनही फोर्ट विभाग हे पूर्वीप्रमाणेच व्यापाराचे मध्यवर्ती केंद्रस्थानच राहिले. बेटाचा विस्तार होताच इंग्रज अधिकारी वर्ग, मुलकी अधिकारी आणि व्यापार-व्यवसाय कंपन्यांचे अधिकारी व मालक ह्यानी उत्तरेकडच्या आरोग्य विघातक देशी वस्तीपासून दूर अशा ठिआणी कुलाब्याला खुल्या वातावरणात आपली निवासस्थाने हलवली.

[next] किल्ल्याच्या तटबंदीपासून ८०० यार्डांपर्यंत संरक्षणरेषा असल्यामुळे बाहेरच्या स्थानिक लोकांची वस्ती व आतील गोऱ्या लोकांची वस्ती ह्यात दुरावा निर्माण झाला होता. स्थानिक वसाहतीला दाट वृक्षराजी होती व तिच्या मध्ये अधूनमधून शेती करणाऱ्यांच्या झोपड्या व शाकारलेली गह्रे होती. तिथल्या विशिष्ट वृक्षसमुदायावरून निरनिराळ्या वस्त्याना नावे पडली होती. गिरगावातल्या बोरभाटाला बोरींच्या झाडांमुळे, वडाळ व वडाळीला (वरळी) वटवृक्षांमुळे, चिंचपोकळी व चिंचबंदरला चिंचेच्या झाडांमुळे, बाबुला टॅंक व बाबुलनाथ बाभुळ वृक्षांमुळे, ताडदेव व ताडवाडीला ताडाच्या झाडांमुळे, भेंडीबझारला भेंडीच्या झाडांमुळे, फणसवाडीला फणसांच्य झाडांमुळे, आंबेवाडीला आम्रवृक्षांमुळे, केळेवाडीला केळींच्या बागांमुळे अशी ही नावे पडलेली होती. हि वृक्षराजी बहुतेक नैसर्गिकच होती व त्यापासून तिथल्या लोकाना जेमतेमच उत्पन्न मिळत असे. बेटावरच्या आरोग्य विघातक वातावरणामुळे तिथल्या लोकांच शक्तिऱ्हास होत असे व त्यापैकी पुष्कळ जण तर बहुधा रोगग्रस्त व आजारी असत.

मुंबईची सात बेटे म्हणजे कुबट दलदलीने एकमेकापासून अलग झालेला एक पाणथळ भूभाग होता. समुद्राच्या सततच्या आक्रमणामुळे ही बेटे नेहमीच विभक्त राहून दळणवळण अशक्य होत असे, जागोजागी भराव घालून बेटे एकमेकाशी जोडून एकसंघ करून त्यांचा एकच प्रदेश करणे हा ह्या अडचणीवर मुख्य उपाय होता. अशा रीतीचा हाती घ्यावयाचा एक भव्य प्रकल्प म्हणजे महालक्ष्मी व वरळि ह्या बेटाना जोडण्यासाठी घालावयाचा भव्य बांध हा होता. ह्य प्रकल्पाचे महत्त्व गव्हर्नर हॉर्न्बीने जाणून ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरांच्या विरोधाला न जुमानता त्याने तो सिद्धीस नेला. ह्या संपादित भूभागाला ‘हॉर्न्बीने वेलार्ड’ हे नाव दिले गेले व ते उचितच झाले. पैपैचा हिशेब करणाऱ्य श्रेष्ठींना न जुमानणाऱ्या एका धैर्यशील व द्रष्ट्या अधिकाऱ्याचा तो एक संस्मरणीय वारसा आहे. ह्या बांधामुळे बेटाचे पूर्वपश्चिम तट जोडले जाऊन खाडीच्या भरतीओहोटीमुळे नेहमीच दलदलीत असणारा भायखळ्यापर्यंतचा केवढा तरी मोठा भूखंड वस्तीस उपलब्ध होऊन दळणवळणही सुलभ झाले.

अशा रीतीने समुद्राचे आक्रमण बंद झाल्यावर पूर्वीची खोलगट जमीन भराव घालून लागवडीसाठी किंवा घरे बांधण्यासाठी सारखी सपाट करण्याचे काम हाती घेण्यात आले. पूर्वी बांध घालून केलेल्या कच्च्या पायवाटांच्या जागी पक्के रस्ते करण्याच्या योजनेमुळे हे काम सुसाध्य झाले. सुरतेच्या दुष्काळामुळे १७९३ साली मुंबईकडे वळलेल्या गरीब लोकांच्या श्रमदानाने व सार्वजनिक वर्गणीने खर्चासाठी निधी जमवून तयार केलेला पहिला पक्क रस्ता बेलासिस रोड हा होता. त्यानंतर पुष्कळ वर्षांनी खुल्या जागी ग्रॅंट रोड बांधला गेला. हा १८३९ मध्ये रहदारीस खुला केला गेला. भायखळ्याच्या सखल भागावर १८६० च्या दशकात क्लार्क रोड व हेन्स रोड हे रस्ते बांधले गेले. १८८० च्या दशकात रिपन रोड तयार झाला. फोरास रोड हा रस्ता तिथल्या विशिष्ट शेतजमिनींच्या वहिवाटदारानी बांधल हे त्या रस्त्याच्या नावावरूनच प्रतीत होते. ह्या अंतर्गत रस्त्यांशिवाय आवश्यक त्या ठिकाणी सांडवेही (कॉजवे) बांधण्यात आले. गव्हर्नर डंकनने १८०५ साली शीवल कॉजवे बांधला. त्यामुळे मुंबई व तुर्भे बेटामधली अरुंद खाडी अडवली गेली व गाळ सुकल्यावर भूभाग जोडले गेले. ह्या सांडव्यला डंकन कॉजवे म्हणतात. माहिम व वांद्रे याना जोडणारा लेडी जमशेटजी कॉजवे १८४५ मध्ये बांधण्यात आला. कुलाब कॉजवे बांधण्यास १८३५ मध्ये सुरवात होऊन १८३८ साली तो पूर्ण झाला.

[next] सन १८०४ मध्ये जेव्हा संरक्षणरेषा आखली गेली व किल्ल्याच्या तटबंदीपासून अ८०० यार्ड जागा मोकळी करण्याचा आदेश निघाला तेव्हा त्या जागेतली घरे पाडण्यात आली व तिथलि वस्ती इतरत्र सरकारी जमिनींवर हलवण्यात आली. खारा तालाव, कुंभारवाडा, कामाठीपुरा, खेतवाडी आणि पूर्व भुलेश्वर हे वस्तीचे भाग त्यावेळी निर्माण झाले. मांडवीकडच्या मोकळ्य जागेवरही लवकरच लोक राहण्यास आले. हे लोक गरीब असल्यामुळे नियंत्राणाच्या अभ्हावी त्यानी इथे बांधलेली घरे आरोग्य विघातक व कोंदट होती. नेहमी समुद्रपर्यटन करणाऱ्या मुसलमानाना किल्ल्याजवळ जागा मिळाल्या आणि तेलगू व कामाठी हिंदु कुंभारवाडा व कामाठीपुऱ्यात सामावले गेले. बेटाच्या इतर भागातही कायदा, व्यवहार व वातारवरणाच्या निर्बंधांची पर्वा न करता घरे उभारली गेली. अशा रीतीने गिरगाव, ठाकुरद्वार, फणसवाडी, माझगाव, पोयवडी, परळ माहिम येथे वाड्या व आळ्य निर्माण झाल्या.

सन १८२९ मध्ये गव्हर्नरांचे निवासस्थान परळला हलविण्यात आले. त्यानंतर भायखळ्यापासून परळपर्यंत व चिंचपोकळी भागांकडे सधन लोकांनी दृष्टी वळली आणि तिथे त्यानी राहण्यासाठी भव्य प्रासाद व आकर्षक बंगले बांधले. गेल्या तीस वर्षात ह्यातल्या बहुतेक इमारती पडल्या वा पाडल्या गेल्या. त्यातल्या काही राहिलेल्यांपैकी आतां भायखळ्यांचे मसीन हॉस्पिटल असलेला सासून कुटुंबाचा ‘सां सूसी’ हा सुंदर महाल अजून दिमाखात उभे आएह. उद्योगधंद्यांची जसजशी वाढ होऊ लागली तसतसे मुंबई शहर भरू लागले व झाडे झुडपे कमी होत गेली. रस्ते आखण्यात आले आणि धूलीमय पायवाट सुधारून चिरेबंदी दगडाच्या गल्ल्याही तयार झाल्या व डांबरी रस्तेही निर्माण झाले.

१८७२ मध्ये मुंबई नगरपालिका कायदा पास झाला आणि जुलै १८७३ मध्ये पहिली निवडणूक होऊन ६४ सदस्यांच्या नगरपालिकेकडे नागरी व्यवस्थेची सूत्रे आली. त्यानंतर आरोग्यव्यवस्था आणि दळणवळण ह्याबाबतीत झपाट्याने सुधारणा झाल्या. १८६१ मध्ये मुंबई शहराला विहार तलावातून पाणीपुरवठा होण्यास सुरवात झाली होती त्यात नंतर तुळशी तलावाची भर पडली. मुंबईच्या पाणी पुरवठ्याचे मुख्य उगमस्थान असणारा तानसा तलाव १८९२ मध्ये उपलब्ध झाला. सांडपाण्याची व्यवस्था लवकरच शास्त्रीय पद्धतीने व्यवहारात आणली गेली. १८६२ मध्ये बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली आणि १८८६ मध्ये एस्प्लनेड, चर्चगेट व भेंडीबाजारच्या हमरस्त्यांवर गॅसचे दिवे लागले. तत्पूर्वी रस्त्यावर घासलेटचे कंदील जागोजागी लावलेले असत. १९०८ मध्ये रस्त्यांवरच्या दिव्यासाठी विजेचा वापर सुरू झाला. त्यानंतर जवळजवळ दोन दशकांनी घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी वीज उपलब्ध होऊ लागली.

[next] सुरवातीला मुंबई बेटातील दळणवळनासाठी पालख्य किंवा घोडे वापरले जात असत. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा ही बेटे जोडली गेली तेव्हा बैलगाड्या व रेकल्यानी वाहतूक होऊ लागली. १८६४ मध्ये मुंबईत टेलिग्राफची व्यवस्था चालू झाली. इंडियन रेडियो अ‍ॅण्ड कम्युनिकेशन कंपनीकडे हे काम सोपविले गेले होते. ह्या व्यवस्थेमुळे एडन-जिब्राल्टर मार्गे इंग्लंडशी व सीशेल्स द्वीपमार्गे आफ्रिकेशी मुंबईचा संबंध जोडला गेला. १८५३ साली मुंबई सरकारने अंतर्देशीय टेलिग्राफ संदेशवहन सुरू करून हिंदुस्थानच्या इतर भागांशी मुंबईचा संपर्क जोडला. फ्लोरा फाऊन्टनजवळ मध्यवर्ती तार ऑफिससाठी १८७४ साली इमारत बांधण्यात आली.

स्सन १८८१ मध्ये ओरिएंटल टेलिफोन कंपनी नावाच्या खाजगी संस्थेकडे मुंबईत टेलिफोनसेवा सिद्ध करण्याचे कम देण्यात आले. पण तिल आवश्यक ते बांडवल जमवित न आल्यामुळे बॉम्बे टेलिफोन कंपनीने हा प्रकल्प हाती घेतला. जून १८८८३ मध्ये ह्या कंपनीने मुंबई शहरात १४४ केंद्रे सुरू करून बहुतेक सरकारी कार्यालये एकमेकांस जोडली. १९०६ मध्ये कोटमधील होम स्ट्रीटवर आपल्या मध्यवर्ति यांर्तिक कार्यालयासाथी कंपनीने इमारत बांधली, ह्या काळपर्यंत भूमिगत टेलिफोन तारा टाकण्याचे कम सुरू झाले होते. १९२९ साली कंपनीने हस्तचलित टेलिफोन पद्धती बदलून स्वयंचलित पद्धती सुरू केली.

प्रारंभी टपालसेवा हा सरकरी उपक्रम नव्हता. १७८७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरानी एक पोस्टमास्टर नेमला व मद्रासच्या फोर्ट सेंट जॉर्जबरोबर संपर्क राखण्यसाठी नियमित टपालसेवेची योजना तयार करण्यास त्यास सांगितले. नंतर १७९४ साली सबंध इलाख्यासाठी जनरल पोस्ट ऑफिस मुंबईत स्थापन करण्यात आले. शहरात सर्वत्र पत्रे पोचवण्यसाठी सेवक नेमण्यात आले. युरोपातून आलेल्य पत्राबद्दल चार आणे बटवडा आकार गोळ करण्यास त्याना सांगितले होते. पण इलाख्यातल्या दुय्यम ठिकाणाहून आलेल्या पत्रांबद्दल मात्र टपाल हंशील आकारण्यात येत नसे. १८५४ पर्यंत पोस्टाचे तिकीट व्यवहारांत आले नव्हते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास मेरवानदरू नवरोजी (ज्याचे पोस्टवाला हे नाव लोकप्रिय होते)खाजगीरीत्या पत्राला एक पैसा ह्या दराने लोकांच्य पत्राची नेआण करीत असे. ज्यांन लिहिता येत नसे आशांच्या सोयीसाठी त्याने कारकून नेमले होते. सबंध इलाख्यात तो टपाल वाटत असे.

[next] ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत परदेशातून छपाईयंत्रे मागवून भीमजी पारखने १६७४ मध्ये मुंबईत पहिला छापखाना सुरू केला. १७९० च्या सुमारास बॉम्बे गॅझेट प्रेस व बॉम्बे कुरिअर प्रेस अस्तित्वात आले. पण स्थानिक प्रयत्नांनी स्थापन झालेला पहिला छापखाण मुंबई समाचार प्रेस हा १८१२ त निघाला. ह्या छापखाण्यात १८१४ मध्ये पहिले गुजराती पंचांग छापण्यात आले. १८२२ च्या जुलै महिन्यात पहिले गुजराती वृत्तपत्र-बॉम्बे समाचार-प्रकाशित झाले. भारतातील हे सर्वात जुने वृत्तपत्र असून आजत्याच्या १६३ व्ह्या वर्षातही तितकेच कार्यक्षम व लोकप्रिय आहे. १८३० च्या सुमारास सरकारने आपल्या अधिकृत प्रकाशनासाठी स्वतःचा छापखाना सुरू केला. १८६७ च्या सुमारास मुंबईत २५ मुद्रणालये होती. टाइम्स ऑफ इंडिया, बॉम्बे गॅझेट, भायखळा एज्युकेशन सोसायटी प्रेस , गणपत कृष्णाजीचा छापखाना, इम्पिरीअल व ओरिएंटल मुद्रणालये इंदुप्रकाश, जामे जमशेद, अकबर-ई-सौदागर आणि दर्पण ही त्यापैकी प्रमुख मुद्रणालये होती. १८७८ मध्ये ही संख्या ५३ झाली. त्यात गव्हर्न्‌मेण्ट सेन्ट्रल प्रेस आणी देशी भाषांच्या ४८ मुद्रणालयांचा अंतर्भाव होता. १८६९ च्या सुमारस जावजी दादाजींनी निर्णयसागर छापखाना स्थापन केला. त्यांच्या मुरणशैलीमुळे व संस्कृत मुद्रणासाठी आवश्यक असलेल्या ध्वनिचिन्ह मुद्रांमुळे त्याला आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली होती.

जहाजबांधणी व्यवसाय हा मुंबईतल्या पहिल्या व्यवसायांपैकी एक होता. इ.स. १७०० मध्ये ईस्ट इंडिय कंपनीने सुरतेस तापी नदीवर गोदी बांधली. पारशी लोकांवर व विशेषतः लवजी नसरवानजी वाडियावर तिची देखभाल सोपवलेली होती. पस्तीस वर्षे कंपनीच्या सेवेत असणाऱ्या लवजीला कंपनीने मुंबईत बोद्या बांधण्यासाठीअ बोलावले. त्याने १८५४ साली पहिली, १७६२ मध्ये दुसरी व १७६५ मध्ये तिसरी गोदी बांधली. नंतरच्या चाळिस वर्षात वाडिया पुत्रपौत्रांनी ह्या गोद्यांची देखभाल व आवश्यकतेनुसार विस्तार करण्याचे काम केले. ह्या कुटुंबापैकी जमशेटजी बमनजी वाडिया ह्याने इंग्रजी आरमारासाठी युद्धनौका व लढाऊ बोटी आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी व्यापाई नौकाही बांधल्या. मुंबई आरमारासाठी वाडिया कुटुंबाने १७३५ साली पहिली व १८८१ साली शेवटची नौका बांधली.

मुंबई खरी भाग्यवान की तिला उत्त्म प्रशासकांची परंपरा लाभली. पण ह्या शहराला जी महत्ता आणि मान्यता प्राप्त झाली तिचे सारे श्रेय फक्त राज्यकर्त्यांनाच देऊन चालणार नाही. या शहरावर ज्यांचे निस्सीम प्रेम होते असा स्थानिक लोकांनीही तिला आकर्षक व प्रगत बनविण्यासाठी तनमनधन वेचले होते हे विसरून चालणार नाही.

[next] मुंबईचे अग्रगण्य व्यापारी सर जमशेटझि जीजीभॉय ह्याना बिर्टिश सार्वभौम सत्तेने ‘नाइट’ हा गौरवाचा किताब दिला होता. असा किताब मिळविणारे ते पहिले भारतीय होते; एव्हढेच नव्हे तर ‘बॅरोनेट’ ही वंशपरंपरागत पदवी प्राप्त करणारेही ते पहिले होते. त्यानी लोककल्याणासाठी केलेले कार्य, त्यांची दानशूरता, निस्सीम राजनिष्ठा ह्यामुळेच त्यांचा हा सन्मान झाला होता. एक निराधार पोरका मुलगा म्हणून प्रथम मुंबईत आल्यावर त्यांनी रिकाम्या बाटल्या दारोदारी विकण्याचा धंदा सुरू केला होता. पण एक वर्षानंतर ते चीनला गेले आणि कष्ट करून आठ वर्षात त्यानी चतुर व मातब्बर व्यापारी अशी कीर्ती मिळवली. स्वतः दारिद्रयाची दुःखे भोगलेली असल्यामुळे भारतात परत आल्यावर गरीब व रुग्णांची दुःखे कमी करण्यासाठी त्यानी प्रथम प्रयन्त केले. मुंबईतले पहिले हॉस्पिटल-जे. जे. हॉस्पिटल स्थापन करण्यासाठी त्यानी उदार देणगी दिली. त्यानी जे.जे. स्कूल ऑफ आर्टची स्थापना केली. देशातील कलाशिक्षण संस्थात आज ही अग्रगण्य मानली जाते. ह्या शिवाय जी. आयू. पी. रेल्वेचे ते पहिले मध्यवर्ती प्रवेशद्वारी पुरोगामी त्यांचा अर्धपुतळा कोरलेला आहे. तसेच गुजरातेत गावोगावी गरिबांसाठी त्यानी अन्नछत्रे स्थापन केली व त्यासाठी देणग्या दिल्या. विहिरी खणल्या, तलाव विस्तृत केले पूलही बांधले. त्यांच्या देशसेवेचे एक उल्लेखनीय कार्य म्हणजे भारतात प्रथम सिद्ध झालेली ‘पुणे बंड अ‍ॅण्ड वॉटर वर्क्स’ ची योजना. तिचा सर्व खर्च त्यानीच केला होता.

सर जमशेटजीचे समकालीन व ब्रम्हदेश आणि चीनबरोबर भारतीय मालाच्य व्यापारात भरभराटीस आलेले व चाळीस आगबोटींचे मालक फ्रामजी कावसजी हेही त्याकाळचे एक नामवंत गृहस्थ होते. ते ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन ’ चे सदस्य होते. स्थानिक जनतेत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यानी खूप प्रयत्न केले. धोबीतलाव हा पूर्वी नावाप्रमाणे कपडे धुण्यसाठी वापरात असलेला धोब्यांचा मोठा तलाव होता. १८२२ च्या प्रखर-जल दुर्भिक्षावेळी फ्रामजीनी जवळपास दोन विहीरी खोदल्या व पाणी लागल्यावर पंचवीस हजार रुपये खर्च करून तेथे मोठे तळे बांधले.

मुंबईचे आणखी एक महापुरुष म्हणजे जगन्नाथ शंकरशेट. लोक त्यान प्रेमानए नाना म्हणत असत. अंगी दुर्लभ राजकीय चातुर्य असलेले हे मुस्तद्दी पुरूष विधायक मनोवृत्तीचे सच्चे समाजसुधारक होते. १८६३ मध्ये गव्हर्नर सर बार्टल फ्रिअरची बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलवर बिनसरकारी सदस्य म्हणून त्यांची नियुकित केली. असा गौर्व प्राप्त झालेले ते पहिलेच हिंदु गृहस्थ होते. तत्कालीन सर्व महत्त्वाच्या उपक्रमांशी आणि संस्थाशी त्यांचा संबंध आलेला होता. जमशेटजी जीजीभॉय व फ्रामजी कावसजी ह्यांच्या सहकार्याने त्यानी नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केला. सनातन मतवादी लोकांच्या विरोधाला न जुमानता स्कॉटिश धर्मोपदेशक डॉक्टर विल्सननी सुरू केलेल्या कन्याशाळेला त्यानी आपल्या वाड्यात जागा दिली. स्टुडण्ट्स लिटररी अ‍ॅन्डा सायंटिफिक सोसायटीच्या शैक्षणिक कार्याची सर्व जबाबदारी नानांनी अंगिकारली होती. ह्या संस्थेने मराठी व गुजराती मुलींसाठी सात शाळा स्थापन केल्या. त्यापैकी एक त्यांच्या वाड्याच्या पिछाडीला असलेल्या घरात भरत असे. ह्या शाळेल त्यानी विनामूल्य जाग दिली होती एव्हढेच नव्हे तर शाळेला येणाऱ्या तोट्याचीही ते भरपाई करीत असत. ह्या शाळेला त्यांचे नाव देण्यात आले होते व अजूनही ही शाळा त्याच वास्तूत चालू आहे. ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेस नाना कारणीभूत होते व मराठीतून वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचे श्रेय त्यानाच जाते. त्याचप्रमाणे कायद्याचे शिक्षण मराठीतून सुरू करण्याची योजनाही त्यांचीच होती. नानांचे देऊळ, नाना चौक आणि अत्यावश्यक असलेले सोनापूर ही ह्या महापुरुषांची खरी स्मारके होत.

[next] प्रदीर्घ काल बॅंकिंगचा व्यवहार करणाऱ्या घराण्याचे सर कावसजी जहांगीर रेडीमनी हे वंशज होते. त्यांच्या काटेकोर सचोटीच्या व्यवहारपद्धतीमुळे तसेच त्यांच्या व्यावसायिक यशामुळे ‘रेडीमनी’ हे सार्थ नाव त्याना प्राप्त झाले होते. १८५७ साली त्यानी ६६,००० रुपये खर्च करून सुरतेस एक भव्य हॉस्पिटल बांधले आणि १८६३ मध्ये ९७,००० रुपये खर्च करून भायखळ्याला नेत्रीरोगपरिचर्येचे हॉस्पिटलही स्थापन केले. पुण्याचे आकर्षक सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेज अणि मुंबईचे ‘युरोपिअन स्ट्रेन्जर्स होम’ ही केवळ त्यांच्याच औदार्यामुळे अस्तित्वात येऊ शकली मुंबई विद्यापीठच्या भव्य सभागृहाची इमारत आणि गॉथिक वास्तुशिल्पद्धतीची एल्फिन्स्टन कॉलेजची इमारत ह्या त्यांच्या मुळेच सिद्ध झाल्या. तसेच मुम्बईत अनेक ठिकाणी त्यानी पाणपोया बांधल्या. सेन्ट थॉमस कॅथीड्रलच्या प्रवेशद्वारापाशी असलेले आकर्षक कारंजे आणि क्रॉफर्ड मार्केटच्या अंतर्भागाताले शिल्पाकृतीयुक्त सुंदर कारंजे ह्या त्यांच्या भेटी त्यांची सौंदर्यदृष्टी व औदार्य व्यक्त करतात. १८६० साली त्याना इन्कम टॅक्स कमिशनर नेमण्यात आले व १८७२ साली त्यांच्या सहिष्णु औदार्याचा गौरव करण्यासाठी त्याना ‘नाईट’ ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांच्या दत्तकपुत्र व वारसांचाही १८९५ साली असाच ‘नाईट’ हा किताब देऊन गौरव करण्यात आला. १९०८ साली त्याना वंशपरंपरागत ‘बॅरोनेट’ ही सन्मानप्रद पदवी देण्यात आली. अशी पदवी मिळवणारे ते तृतीय भारतीय होते. त्यांचा कापसाच व्यापार मोठा होता. त्यानीही पुष्कळ दानधर्म केला. तसेच शैक्षणिक कार्यास देणग्या दिल्या. मुंबईत त्यानी भव्य सर कावसजी जहांगीर हॉल बांधला. तसेच लंडनच्या इम्पिरीयल इन्स्टिट्यूटचा ‘रेडिमनी कक्ष’ बांधण्याचा सर्व खर्च केला. १९३० साली मध्यवर्ती लेजिस्लेटिव्ह अ‍ॅसेम्ब्लीवर ते निवडूनआले व पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला ही ते उपस्थित राहिले.

आपल्या देशात पोलाद उद्योगाचा नवीन उपक्रम जमशेदजी टाटा ह्यानी प्रथमसुरू केला. १८८७ मध्ये त्यानी स्थापन केलेल्या ‘टाटा सन्स’ ची पुढे पुष्कळ प्रगती होऊन विविध उद्योगव्यवसाय हाती घेतलेल्या ‘हाऊस ऑफ टाटाज्‌’ मध्ये तिचे परिवर्तन झाले. आजही व्यावसायिक संस्था भारतात उच्च दर्जाची व सामर्थ्यवान गणली जाते. मुंबईच्या विकासाच्या कार्यात जमशेदजींनी पुष्कळ कळकळ दाखवली. आधुनिक घरबांधणीची योजना त्यांनीच प्रथम आचरणात आणली. साष्टी बेटातील हिवताप निर्माण करणारी दलदल बुजवून वांद्रे, माहीम व जुहूतारा येथे टुमदार बंगले बांधू देण्यास त्यानी नगरपालिकेचे मन वळविले. मुंबईत ताजमहाल हे पहिले विलासी हॉटेल बांधण्याचे, तसेच बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही पहिली भारतीय वैज्ञानिक संस्था स्थापना करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. ताजमहाल हॉटेलचे उद्‍घाटन १९०३ मध्ये झाले व आजही ते एक प्रतिष्ठेचे हॉटेल समजले जाते.

भारतीय उद्योगव्यवसायाच्या प्रगतीसाठी केलेल्या तीन हितकारक गोष्टींमुळे जमशेदजींची मूर्ती चितरंजन राहील. जमशेदपूर येथे लोखंड व पोलाद उद्योगाचा पाया त्यानी घातला लोणावळे येथील हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प हा त्यांच्या द्रष्टपणामुळेच सुफलित झाला. तसेच बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सस, टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल, आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेन्टल रिसर्च ह्या नंतर स्थापन झालेल्या तीन संस्थाही जमशेदजींच्या उज्वल कीर्तीत भर टाकणाऱ्या आहेत.

[next] सन १८३७ च्या सुमारास जेव्हा मशीद हल्लीच्या जागी हलविण्यात आली तेव्हा मोहम्मद अली रोगे ह्या भाविक कोकणी मुसलमान गृहस्थाने तिची पुनर्बांधणी केली. ह्याच जमातीतील आणखी एक उल्लेखनीय व्यक्ती म्हणजे महम्मद इब्राहीम मक्बा हे होते. त्यांचा अनेक शैक्षाणिक संस्थाशी संबंध होता, मराठीचे व्याकरण प्रथम लिहिण्याचे श्रेय बहुधा त्यांच्याकडेच जाते. ह्या शतकात नंतर इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या एका अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते. त्यांच्य कर्तुत्वाची जाणीव ठेऊन सरकारने १८९५ साली त्यान मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश नेमले होते.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर भारतीय बुद्धिमंतानी राजकारणात भाग घेण्यास सुरवात केली. त्यापैकी काही जणांनी दादाभाई नौरोजी ह्यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. ह्या संस्थेचे पहिले अध्यक्ष सर जमशेदजी जीजीभॉय आणि कार्यवाह नवरोजी फरदुनजी व डॉ. भाऊ दाजी हे होते. ह्या संस्थेचा वारसा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वी १८८५ मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनकडे आला. दादाभाई नौरोजी, सर फिरोजशहा मेहता व सर दिनशा वाच्छा ह्या तीन पारशी गृहस्थांचा राष्ट्रीय चळवळीशी निकट संबंध होता. इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या १९०६ साली भरलेल्या अधिवेशनाचे दादाभाई अध्यक्ष होते. त्या अधिवेशनात त्यानी स्वराज्याची प्रथम मागणी केली. मुंबईच्या म्युनिसिपल कौन्सिलवर ते निवडून आले होते आणि त्यानी तत्संबंधी केलेल्या लेखनामुळे अनेक सामाजिक व नागरी सुधारणांकडे जनतेचे लक्ष वेधले गेले. दादाभाईच्या प्रखर राष्ट्रभक्तीमुळे फिरोजशहा मेहता प्रभावित झाले होते. मुंबईच्या टाऊन कौन्सिलवर, तसेच मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनवर ते निवडले गेले होते. १९११ मध्ये लॉर्ड विलिंग्डननी त्यांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू नेमले. आपल्या कारकीर्दीत त्यानी सेनेटमध्ये कारभार विषयक अनेक सुधारणा सुचविल्या व विद्यापीठांनी स्वतः ज्ञानदान करावे अशी मागणीही केली. १९१३ साली फिरोज शहानी ‘बॉम्बे क्रॉनिकल’ वृत्तपत्र सुरू केले.

मुंबईच्या जडणघडणीसाठी आणखी अनेकांनी उल्लेखनीय हातभार लावला. बेने इस्त्रायल धार्मिक समाजाची इथे छोटीशीच वसाहत होती. त्यापैकी बगदादहून आलेले डेव्हिड सासून ह्यानी मुंबईत व्यापारात पुष्कळ पैसा मिळवला. आपल्या धर्मबांधवासाठी त्यानी एक उपासनामंदिर बांधले व जनतेत शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून विद्यालयेही स्थापना केली. बाल गुन्हेगारासाठी माटुंग्याला एक शाळाही काढली व तांत्रिक शिक्षणाचा प्रसारासाठी सासून मेकॅनिक्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली.

[next] गुजराती समाजापैकी प्रेमचंद रायचंद ह्यानी मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची इमारत व नजिकचा सुप्रसिद्ध राजाबाई टॉवर बांधण्यासाठी चार लक्ष रुपयावर रकमेची देणगी दिली होती. गोकुळदास तेजपाळ ह्यानी गरिबांसाठी एक हॉस्पिटल बांधले व संस्कृत विद्येच्या अभ्यासासाठी एक पाठशाळाही बांधली. सर मंगळदास नथूभाई ह्यानी विद्यापीठस पारितोषिके व शिष्यवृत्त्या देण्यासाठी भरघोस देणग्य दिल्या. त्या शिवाय घाऊक कापडाच्या व्यापारासाठी मूळजी जेठा ह्यानी सर्वात भव्य असे मार्केट बांधले. वरजीवनदास माधवदास ह्यानी आकर्षक माधवबाग बांधली आणि तिचा खर्च चालवण्यासाठी विश्वस्त निधीची व्यवस्था केली. करसनदास मुळजी ह्या समाज सुधारकाने वल्लभपंथीय गुरूंच्या स्वैराचाराविषयी गुजरातीतून अनेक लेख लिहिले आणि अशा धार्मिक रूढी अंधपणे पाळणाऱ्या लोकांवर टीका केली. तसेच त्यानी बालविवाहाच्या प्रथेची निर्भर्त्सन केली. विधवा विवाहास उत्तेजन दिले स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. दामोदरदास सुखड्याला हे आणखी एक पुरोगामी व्यापारी होते. त्यानी शैक्षणिक उपक्रमाला वा समाजसुधारणेच्या कार्याला भरपूर देणग्य दिल्या. तीन लक्ष रुपये खर्च करून त्यानी मुंबईत पहिले मोफत सार्वजनिक ग्रंथालय स्थापन केले व त्याच्य व्यवस्थापनासाठी उदार निधीही राखून ठेवला.

डॉ. गार्सिया द ओर्टानंतर आणखी दोन भिषस्वरांनी औषधी वनस्पतींच्य अभ्यासात विशेष लक्ष घालून त्यांच्य गुणकारितेबद्दल अनेक प्रयोअ आणि संशोधन केले त्यांची नावे डॉ. भाऊ दाजी लाड व डॉ. सखाराम अर्जुन राऊत अशी होती. डॉ. सखाराम अर्जुन यांनी सर्वसामान्य व दुर्मिळ औषधी, त्यांची परिचित व शास्त्रोक्त नावे, उपयोग व उपलब्ध असण्याची स्थाने ह्यांची माहिती देणारा ह्या प्रकारचा पहिल ग्रंथ लिहिला होता. डॉ. भाऊ दाजी हे व्यवसायाने डॉक्टर खरे. पण त्यांच अनेक समाजिक व शैक्षणिक उपक्रमांशी निकट संबंध होता. ते बॉम्बे असोसिएशनचे पहिले कार्यवाह होते. पदार्थसंग्रहालय हे शिक्षणप्रसाराचे महत्त्वाचे साधन आहे हे जाणून त्यानी व्हिक्टोरिया गार्डन्स्‌ व तेथील अल्बर्ट म्युझियम स्थापन करण्याचा हिरीरीने पुरस्कार केला. व्हिक्टोरिया गार्डन ही केवळ करमणुकीचे स्थान न होता जगातील विविध वनस्पती व वृक्षवेलीचा अभ्यास करणाऱ्यासाठी ती एक प्रयोगशाळा व्हावी ह्या हेतूने त्यानी ही योजन सिद्ध केली होती. तसेच कुष्ठरोगावर उपयुक्त अशा वनस्पतींचे संशोधन करून अनेक रूग्णांवर त्यानी यशस्वी उपचार केले होते. दुर्दैवाने ह्या संशोधन तपशील आज उपलब्ध नाही.

[next] इतर समकालीनामध्ये विश्वनाथ नारायण मंडलीक व काशिनाथ त्रिबक तेलंग ह्या दोन स्वतंत्र प्रज्ञेच्या विद्वानांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. मंडलीक हे बहुभाषाकोविद असून सिंधी, संस्कृत, पर्शिअन व इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ‘नेटिव्ह ओपिनियन’ ह्या अ‍ॅंग्लो-मराठी साप्ताहिकाचे ते संस्थापक-संपादक होते. पद्धतशीर काम करण्याबाबत त्यांचा एवढा कटाक्ष होता की त्यामुळे मंडलीक हा वक्तशीरपणाला पर्यायी शब्द म्हणून रूढ झाला होता. तेलंग हे गाढे संस्कृत पंडित होते आणि शिवाय उत्तम कायदेतज्ञही होते. मॅक्स मुल्लर ह्या जर्मन पौर्वात्य विद्यातज्ञाने त्यांच्यावर भगवत्‌गीतेचे इंग्रजी भाषांतर त्याच्या सुबोधतेमुळे परदेशातही विद्वन्मान्य ठरले आहे. मुंबई महापालिक कायद्याचा आराखडा तयार करतान फिरोजशहा मेहताना तेलंगाच्या कायद्याच्या ज्ञानाचा पुष्कळच उपयोग झाला होता. १८८५ साली इंडियन नॅशनल कॉंग्रेस स्थापन झाली तेव्हापासून त्या संस्थेशी तेलंगाचा संबंध आलेला होता. पण नंतर १८८९ मध्ये हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून त्यांची नेमणूक झाल्यावर त्यानी राजकीय चळवळीशी असलेले आपले सर्व संबंध तोडून टाकले. १७८३ मध्ये त्यान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमण्यात आले. पण हे अधिकारपद त्याना फार काळ उपभोगता आले नाही.

मुंबई ही वयाने आणि आकाराने वाढली असली तरी तिने आपले व्यक्तिमत्व व विशिष्ट संस्कृती गमावलेली नाही. मुंबई हे विसंगतीचे विचित्र मिश्रण आहे. जे काही नवे आणि चांगले आहे ते तिने आत्मसात्‌ केले आहे पण त्याबरोबरच जे जुने आणि चिरकालिक आहे तिने सोडले नाही. सहार विमानतळावर राडार आहे. ट्रॉम्बेमध्ये अप्सरा आहे. वरळीला टेलिव्हिजनाचा मनोरा आहे आणि गोदींमध्ये पॅकेजिंगची अभिनव यंत्रणाही आहे आणि असे असूनसुद्धा कुलाब्याच्य दीपगृहात घासलेटची दिवळी पेटवण्यात येते. रस्त्यांवर व्हिक्टोरिया फिरत असतात. टोपलीत मासे भरून कोळीण तुमच्या घरी येते आणि उत्तररात्री कुलफीवाला घसा खरडीत गल्लोगल्ली फिरत असतो. ब्रिटिश सार्वभौम राजा जेव्हा भारतभेटीला आला त्यावेळी भव्य गेटवे ऑफ इंडिया उभारून मुंबई नगरीने त्याचे उत्कट स्वागत केले होते. त्याच मुंबईनगरीने कालांतराने ‘चले जाव’ चे रणशिंग फुंकून त्याच सत्तेला परत जाण्यास भाग पाडले. मुंबई ही अगम्य आहे पण तरीही ती स्थिर आणि दुराग्रही आहे. भावी काळात मुंबईचे स्वरूप कदाचित्‌ बदलेल पण तरीसुद्धा जगातील संस्मरणीय नगरात तिचे स्थान अबाधितच राहील.

- पुरुषोत्त्म जोशी आणि शां. शं. रेगे


संपादक मंडळ | Editors
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.
नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1066,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,1,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,827,आईच्या कविता,21,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,4,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,17,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,23,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,46,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,60,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,8,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,424,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,70,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,51,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,10,निवडक,2,निसर्ग कविता,23,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,88,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,8,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,707,मराठी गझल,19,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,14,मराठी टिव्ही,41,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,14,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,36,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,181,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,87,मातीतले कोहिनूर,16,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,21,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,55,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,131,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,20,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सीमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: मुंबई दृष्टिकोन - महाराष्ट्र
मुंबई दृष्टिकोन - महाराष्ट्र
मुंबई दृष्टिकोन, महाराष्ट्र - [Mumbai, Drushtikon, Maharashtra] बॉम्बे हे नाव मुंबई ह्या मूळ नावाच्या पोर्तुगीजानी केलेल्या बॉम्बैम्‌ अशा भ्रष्ट रूपावरून आले आहे.
https://1.bp.blogspot.com/-XX3WSCMruIs/XRmCkc01_dI/AAAAAAAADiM/a-5GCwWgOVkX2n0yi-IDN3d6gufwPA_bACLcBGAs/s1600/ranicha-putala-aani-kendriya-taar-gruha.jpg
https://1.bp.blogspot.com/-XX3WSCMruIs/XRmCkc01_dI/AAAAAAAADiM/a-5GCwWgOVkX2n0yi-IDN3d6gufwPA_bACLcBGAs/s72-c/ranicha-putala-aani-kendriya-taar-gruha.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/mumbai-drushtikon-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/mumbai-drushtikon-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची