Loading ...
/* Dont copy */

मुंबई प्रभाव (महाराष्ट्र)

मुंबई प्रभाव (महाराष्ट्र) - शहरे माणसांसारखी असतात. पहिल्या भेटीतच ती तुमच्यावर अनुकूल अगर प्रतिकूल छाप टाकतात [Mumbai Prabhav, Maharashtra].

मुंबई प्रभाव (महाराष्ट्र)

शहरे माणसांसारखी असतात. पहिल्या भेटीतच ती तुमच्यावर अनुकूल अगर प्रतिकूल छाप टाकतात


मुंबई प्रभाव (महाराष्ट्र)

(Mumbai Prabhav Maharashtra) शहरे माणसांसारखी असतात. पहिल्या भेटीतच ती तुमच्यावर अनुकूल अगर प्रतिकूल छाप टाकतात आणि ती छाप कायम रहाते. मुंबईच्या परिचय बहुसंख्य लोकांना बोरीबंदरपासून होतो. मुद्दामच विमानतळ नव्हे तर रेल्वे स्थानक निवडले आहे. कारण नोकरीच्या, घराच्या, सुरक्षितच्या, नव्या आयुष्याच्या शोधात शहराचे नवीन रहिवासी भारताच्या अंतरंगातून रेल्वेगाड्याच मुंबईला आणि असतात..


महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट, मुंबई)

मुंबईशी होणाऱ्या या प्रथम भेटीबद्दल मी अनेकदा विचार केला आहे. आपल्या मूळ गावाहून राज्य परिवहन मंडळाच्या बसने वाराणशिला येऊन तिथून काशी एक्सप्रेसने सर्व देश व पश्चिम घाट पार करून मुंबईला आलेल नवीन प्रवासी, थोडा बधिर झालेला, बराच गोंधळलेला असतो. ढकलाढकलीत, रेटारेटीत, कुडत्याच्या खिशातील एकूण सर्व भांडवलावर एक रक्षक हात ठेवून दुसऱ्या हाताने पत्र्याची ट्रंक व मोहरीच्या तेलाचा वास येणारे कपड्यांचे गाठोडे सावरीत व्हिक्टोरिया टर्मिनसमधून , तो गावी अनेकदा सिनेमात पाहिलेल्या या गोंधळ नगरीत अवतरतो. त्याला अचानक गाण्याचा कंठ फुटत नाही, एकाएकी वास्तवाचा आकस्मित टोला बसतो.

रस्त्यापलीकडे मुंबई महापालिकेची उत्तुंग इमारत, चौकाऱ्या पलीकडील जुनं कॅपिटॉल सिनेमागृह, दूर अंतरात विरत जाणारा दुतर्फी दादाभाई नवरोजी मार्ग ही सारी दृश्ये गेल्या अर्धशतकात मुंबईला येऊन स्थानिक झालेल्या अनेक लोकांना प्रथम आगमनाच्या दिवसापासून आठवतील.

संभाव्य रहिवाशाला शहराचा परिचय करून देण्याचा हा कदाचित सर्वोत्तम मार्ग नसेल पण तो एकमेव मार्ग आहे. नंतरच्या महिन्यांत, वर्षात तो शहर अधिक ओळखायला लागेल, त्यात रहायला, त्याबरोबर वाढायला, त्याची निंदा नालस्ती करायला शिकेल. सुटीमध्ये, कधीतरी गावी गेल्यावर त्याला शहराचा विरह जाणवेल.

[next]

बाहेर गेल्यावर मला मुंबईचा नेहमीच विरह झाला आहे. चांगल्या गोष्टींचा व इतक्या चांगल्या नसलेल्या गोष्टींचाही. भल्या पहाटे रस्त्याच्या कोपऱ्यावरल्या टपऱ्यांमध्ये आरे दुधाच्या बाटल्यांचे किणकिणते आवाज, भायखळा व माहिमला बेकऱ्यात भाजल्या जाणाऱ्या ताज्या पावांचा खरपूस वास, दाराखाली, नेहमीप्रमाणे उशीरा, सरकवली जाणरी वृत्तपत्रे, निष्काळजीपणे रस्ते झाडणारे महापालिकेचे झाडूवाले, भिका बेहराम बावडीवरून पाण्याची पिंपे फोर्टमधील जुन्या कचेऱ्यात वाहून नेणाऱ्या पाणक्यांच्या पायांची सौम्य थपथप, आनंदी आवाजांच्या गोंधळात मधूनच थांबणाऱ्या व सुरू होणाऱ्या शाळांच्या बसगाड्या. शहर जागे होत असल्याचे आवाज.

सकाळ ही मुंबईच सर्वोत्तम वेळ आहे. उपनगरी गाड्या, शहराच्या परीघभर विखुरलेले आपले प्रवासी मेंढपाळच्या कुत्र्याप्रमाणे गोळा करतात आणि चर्चगेट स्थानकावर बाहेर ओततात. अलीकडे शहरातल्या घाईगर्दीत सापडल्यामुळे मला मुंबईत मिळणारी तांबडे फुटतानाची साधी सुखे उपभोगायला वेळ मिळाला नाही; पण मला त्यांची जाणीव आहे. कमरेला घराच्या किल्ल्यांचे मोठे जुडगे वाजवीत मरीन ड्राईव्हला चालताना गुजराती गृहिणी. समुद्राशी बातचीत करताना निस्सीम इझीकेल. धावण्याचा व्यायाम करणारे, धापा टाकीत असलेले. रशियन आणि इतर पूर्व युरोपीय देशातले अधिकारी आणि तंत्रज्ञ यांची लांबलचक मरीनावर रमतगमत फिरणारी बायका, मुले. डोळे अर्धवट मिटून कानाला लावलेल्या ट्रॉन्झिस्टरमधून आकाशवाणीचि भजने ऐकणारा, आयुष्यातलं काम संपवून निवृत्त झालेला म्हातारा, इतरत्र शहराच्या दुसऱ्या भागात सकाळचा व्यायाम करणारे इतर लोक. मलबार हिलवर प्रकृतीकरता नियमित चालणारा वकील. आपापल्या आयांबरोबर बागेत आलेली मुले (मलबार हिलवरच्या बागेसन्निध मोठे होण्यातले सुख). आणखी धावणारे दर सकाळी वरळीच्या बांधावर बसून चर्चा करणारा एक गट, जगाचे प्रश्न सोडवण्याची खटपट करणाऱ्या निवृत्त लोकांची वायफळ चर्चा.

मुंबईत नवा दिवस उगवला आहे. मागील वर्षातल्या हजारो लाखो दिवसांप्रमाणेच. गेले अर्धशतक, एखाद्या आतिथ्यशील घराप्रमाणे आणखी-आणखी लोकांचे स्वागत करून मुंबई वाढताना, भरत जाताना मी पहातो आहे. आपली टंकलेखन यंत्रे व कांजीवरम साड्या यासकट आलेले दाक्षिणात्य मी पाहिले. महायुद्ध व त्यानंतरच्या फाळणीनंतर सिंधी आले. पायजमे घालणाऱ्य बायका - काय हे विचित्र लोक-असे माझे त्यांच्याबद्दल मत झाले. पंजाबी नेमके केव्हा आले ते मला माहित नाही. ते काहीसे गुपचूप आत शिरले असावेत. एक दिवस, अचानक, तंदूरी चिकन आणि समोसे (मुंबईला पूर्वी माहित असलेले समोसे नव्हते) विकणारी कितीतरी वातानुकूलित उपहारगृहे दिसू लागली.

[next]

मुंबईचा भाग बनून राहिलेले इतरही अनेक आहेत. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या परिषदेतल्याप्रमाणे पांढऱ्य गाद्यांवर, काळाबादेवीतल्या पेढ्यांमध्ये आडवारलेले गुजराती. मोठी धोरणी जमात, त्यांच्याकडे कुणाहीपेक्षा अधिक पैसा आहे. आणि इतर कुणहीपेक्षा त्याचे त एकमी प्रदर्शन करतात. आणि पारशी- डॉक्टर, वकील, इंजिनियर - आणि दक्षिन मुंबईच्या उठून दिसणाऱ्या प्रत्येक कोपऱ्यावर असलेले ते संगमरवरी पुतळे.

मुंबई हे अर्थात महाराष्ट्रीय शहर आहे. महाराष्ट्राची राजधानी होण्याआधीपासूनच , ते महाराष्ट्रीय शहर आहे. रस्त्याची, बस व टॅक्सी वाहकांची भाषा एका प्रकारची मुंबई हिंदी असली तरी नागरिकांचे अफाट समुदाय पूर्वीपासून नेहमीच मराठी भाषिक आहेत. शहरात वाढलेले मुंबई महानगरपालिकेचे सभासद आणि जिल्ह्यातून आलेले( त्याला ब्रिटिश लोक ‘मोफ्यूसिल’ म्हणजे ‘ग्रामीण’ म्हणत पण आपण तसे म्हणत नाही ) बहुसंख्य राज्य विधानसभेचे सभासद यांचे बोलणे ऐकले की भाषेतला फरक स्पष्ट होतो.

आणि मूळ नागरिक असे ज्यांना कधीतरी संबोधले जाते त्या मासेमारांची, कोळ्यांची सुद्धा ही मुंबई नगरी आहे, ही जमात बहुधा विसरली जाते - मासे घ्यायचे असले किंवा प्रजासत्ताक दिनाकरता सजवलेला गाडीवरील लोकनृत्याची तयारी करायची असली तर त्या वेळा सोडून.

जगातील इतर अनेक मोठ्या शहरांप्रमाणेच निरनिराळ्य जमातींकरता मुंबईत निरनिराळे भाग आहेत. कोळी स्वाभाविकच आपल्या मच्छिमारी होड्या-पडावांसमवेत किनाऱ्याजवळ स्थायिक झाले आहेत. वसईचा समुद्र किनारा (जी मुंबई आहे अशी चुकीची समजूत होऊन पोर्तुगीजानी तिथे किल्ला बांधला) मढ बेट, वरसोव्याचा किनारा, माहिमची खाडी, आणि जे खरोखरीच मच्छिमारी बंदर आहे ते ससून डॉक, आणि मुंबईची बेटे मच्छिमारी खेडी होती त्या दिवसांपासून तो आता मुंबई भारतातले सर्वात संपन्न शहर होईपर्यंत. घरबांधणी करून मुंबईची वाढ करणाऱ्यांच्या दबावालान जुमानता हे कोळी आपापल्या जमिनींवर राहिले आहेत. त्यांची नारळाची झाडं, वाळूवर दुरुस्त होत असलेली मच्छिमारी जाळी, कालच्या धुण्याप्रमाणे उन्हात वाळत घातलेल्या माशांच्या रांगा, खारट-तुरट वास या सकट या वसाहती म्हणजे जुन्या मुंबईच्या शेवटल्या खुणा आहेत.

[next]

कोळी नेहमी मुंबईतच होते पण बाहेरून पहिल्यांदा पारशी आले. धोबीतलावला त्यानी आपली अग्निमंदिरे बांधली व सर्व मानवी वसाहतीची अभिजात रीत पाळून त्या मंदिरांभोवती ते रहायला लागले. प्रथम प्रार्थनेची जागा, मग सभोवार भक्तांची घरे, मग दुकानं, कचेऱ्या व शाळा. पहिले पारशी आले तेव्हापासून हा आराखडा फारसा बदलेला नाही. उदवाड्याबाहेर, पारशांची दोन मखमली टोप्या आणि सपाता मिळतात आणि समांरभी पांढरी डगली शिवण्यात इथले शिंपी तरबेज असतात. शिवाय इथे एक प्रसिद्ध पारशी शाळा आहे. पारसी डेअरी फॉर्म आहे आणि शहरातली दोन सर्वात जुनी इराणी उपहागृहे आहेत.

धोबीतलावला, गोवा टाईम्स छापखान, मडोनाची चित्रे आणि वासाचे गोव्याचे चिरूट नी खारवलेली सॉसेजीस विकणारी दुकान या बरोबर मोठ्या संख्येने गोवेकर जमात आहे. डुक्कर गल्ली असं यथायोग्य नाव दिलेल्या गल्लीच्या तोंडाशी. लाल चर्च या नावाने ओळखले जाणारे, रविवार सकाळच्या प्रार्थनसभा आसपासच्या रस्त्यवर ओसंडणारे, चर्च आहे. गोवेकरांची वस्ती, चिराबझार, दाबूल आणि त्याहिपलीकडे असून प्रत्येक विभागाला आपापले छोटे चर्च व स्वतःचा स्वतंत्र फुटबॉल संघ असण्याइतके व्यक्तित्व आहे.

पहिले महाराष्ट्रीय गिरगांवात रहायला आले. त्यानी वाड्या उभ्या केल्या आणि त्यात लाकडी व्हरांटे असलेली बह्रे बांधली तिथून ते कामाल फोर्टमध्ये चालत जात. चार किंवा पाच पिढ्यांत त्यांची जीवनपद्धत फारशी बदलली नाही. ते त्याच घरात रहातत. पूजेकरता सकाळी तीच फुले विकत घेतात, त्याच वाण्यांकडे जातात आणि फोर्टमध्ये कामाला चालत जातात; फक्त बाहेरचे शहर कुठे संपते आणि फोर्ट कुठे सुरू होते हे सांगणे कठीण झाले आहे. इतर महाराष्ट्रीय शिवाजी पार्कला स्थायिक झाले आणि त्यानंतरच्या गटांना आपापल्या वाड्या बांधायला जागा व उरल्याने ते सरकारी घर वसाहतीत गेले. दुर्दैवाने प्रत्येकालाच हे शहर अवाढव्य झाल आहे.

पूर्वी ससून डॉकपासून म्युझियमला जाणाऱ्या शून्य नंबरच्या ट्रॅमने घाईला सुरवात व्हायची. आम्ही नेहमी ट्रॅमने प्रवास करीत असू, त्या नेहमी मिळत, सोयिस्कर आणि स्वस्त. ताडदेवआणि गवालिया टॅन्कला बदली करुन ट्रॅमने किंग सर्कलपर्यंत एक आण्यात जाता येत असे.

[next]

म्युझियमाला आम्ही ट्रॅम बदलू शकत असू. तो जणू काय एक मोठा ट्रॅम बाजार होता. तिथून जवळजवळ संपूर्ण रिकाम्या फ्लोराफाऊंटनहून पुढे जातान मुंबईत किती ही गर्दी झाली आहे अशी आमची तक्रार असे. हॉरन्बी रोडच्या (आताच्या दादाभाई नवरोजी मार्गाच्या ) पदपथावर विक्रेते नव्हते. कारण परदेशी वस्तू आर्मी आणि नेव्ही स्टोअर्समध्ये मिळत. व्हाईटचे आणि लेडलॉ (आताचे खादी एम्पोरियम) इथे पायमोजे घातलेल्या अ‍ॅंग्लो-इंडियन विक्रेत्या मुली सोला टोप्या आणि उन्हाळी लिननसूट विकीत असत. खरेदी झाल्यानंतर तिथल्या उपहारगृहात तुम्ही चहा आणि काकडी घातलेलं सॅन्डविचेस घेऊ शकत होता.

रीगल हे देशातील पहिले वातानुकूलित सिनेगृह, बहुतेक या आकाराची देशातली ही पहिली वातानुकूलित इमारत असावी. मोटारी उभ्या करायला भुयारी तळ केलेले ते पहिले सिनेगृह होते आणि तसा स्पष्ट उल्लेख असलेली जाहिरात ते करीत असे. हिंदी चित्रपटात चालू चित्रपटाच्या गाण्यांची पुस्तिका विकत मिळत असे. अंधाऱ्या प्रेक्षागृहात लोक ती घेऊन जात आणि विजेऱ्या पेटवून पडद्यावर गाणी गायली जात असताना गाण्याचे शब्द वाचीत असत. राज कपूर हा तरूण नट होता. तरूण आणि ऐटदार!

एके काळी बेश्ट बसेसना मरीन ड्राईव्हवर परवानगी द्यावी काय यावर मोठा वादविवाद झाला आणि शेवटी जेव्हा सार्वजनिक वाहनांची खाजगी मोटरमालकांवर सरशी झाली तेव्हा मरीन ड्राईव्हवर ‘सी’ रूटच्या बसेस फिरू लागल्य, तेव्हा त्यातून लोक आनंदभ्रमण करायला जात. सुरैय ही सिनेमानटी मरीन ड्राईव्हवर एका इमारतीत रहात असे आणि तिच्या घराखालचा तो बस थांबा ‘सुरैया स्टॉप’ म्हणून ओळखला जाऊ लागला. व्हिक्टोरिया जिकडेतिकडे अस्त. घोडागाडीवाल्यांची चलती होती आणि जेव्हा आम्हाला लग्नाला अगर सामानासकट रेल्वे स्टेशनला जायचे असेल तेव्हा आम्ही शून्य नंबरची ट्रॅम सोडून व्हिक्टोरिया पकडीत असू.

लोक (अनेकदा पांढरे कोट आणि काळ्य टोप्या घातलेले त्यांचे नोकर) आपले कुत्रे कफ परेड व नरिमन पॉईण्टवर फिरायला आणीत. रहेजा आणि मेकर यांची स्वप्नं अजून अरबी समुद्रात होती. समुद्रातून ब्रेबॉर्न स्टेडियम नुकतंच उगवत होतं आणि श्री डिमेलो व श्री तल्याखान तिथल्या दगडविटावर उभे राहून थोड्याच वर्षात भारतीय क्रिकेटचा केन्द्र बिन्दू होणार असणाऱ्या मैदानाची पाहणी करीत होते.

[next]

साम्राज्याचे अवशेष, असे काही इंग्रज ब्रिटीश बॅन्कात तरूण व्यवस्थापक म्हणून अजून आसपास उरले होते. शाळकरी लहान मुला प्रमाणे ते पांढरे शर्ट्‌स व पांढऱ्या पॅन्टस्‌ घालीत, निळ्या टाईज असत. तरूण इंग्रज अधिकाऱ्यांच्या पेहरावाची तरुण भारतीय अधिकारी नक्कल करीत. पी. अ‍ॅण्ड ओ, कंपनीच्या बोटी दर गुरवारी सकाळी (की बुधवारी सकाळी?) बॅलार्ड पियरच्या धक्क्यावर पुढल्या पल्ल्याचे फिकट त्वचेचे प्रवासी उतरवून टाकीत. शहरात एक जलद फेरी टाकून आपण पूर्वेकडील गूढ देशाना भेटा दिल्याच्या समाधानात हे प्रवासी परतत. आणि मुंबई हा भारताचा दरवाजा असल्याने हे काही अगदीच चूक नव्हते.

ट्रॅम संपत त्या किंग सर्कलला मुंबईची सीमा होती. त्या पलीकडे मिठागरे होती.

त्यानंतर शहर खूप वाढले आणि समुद्रापलीकडे, पारसिक डोंगरापलीकडे आणि त्याही पलीकडे पसरले. गेल्या पन्नास वर्षात माझ्याभोवती शहर एखाद्या मुले, नातवंडे, पतवंडे असलेल्या कुटुंबाप्रमाणे पसरले. आणि शहर आखणी करणारे, परिसरवादी, काहीही म्हणोत, माझ्य मते ही वाढ चांगली आहे.

दररोज इतक्या जादा लोकान जिथे रहावेसे, काम करावेसे वाटते, आपले कुटुंब वाढवावेसे वाटते, त्या शहरात काहीतरी तसेच असणार. कुणालाच तिथे रहावे असे वाटेनासे झाले आणि ते आक्रसू लागले म्हणजे मुंबईचे प्रश्न सुरू झाले. या क्षणी तरी ते एक चैतन्यपूर्ण, सतत वाढणारे, उतूं जाणारे शहर आहे. आणि ते असेच असणे मला आवडते.

- बेहराम कॉन्ट्रॅक्टर


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,2,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1347,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,3,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1087,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,5,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,25,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,220,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,69,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,33,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,8,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1130,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,27,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,286,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: मुंबई प्रभाव (महाराष्ट्र)
मुंबई प्रभाव (महाराष्ट्र)
मुंबई प्रभाव (महाराष्ट्र) - शहरे माणसांसारखी असतात. पहिल्या भेटीतच ती तुमच्यावर अनुकूल अगर प्रतिकूल छाप टाकतात [Mumbai Prabhav, Maharashtra].
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUhzxttFzFrA2vezF4kCz3Lwc7flB7zC4BymUypNjKzsTIeG9ag8F4cWAG2JdNZH4qvNG4Q9L2KVeW4Jyl62uqq0ePEpbP3Q7I5Npo9wZzwzmu6J18mPuK0kJix5hofB_dl2Z7FqPZOKuQ/s1600-rw/mahatma-jyotiba-phule-mandai-crawford-market-mumbai.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUhzxttFzFrA2vezF4kCz3Lwc7flB7zC4BymUypNjKzsTIeG9ag8F4cWAG2JdNZH4qvNG4Q9L2KVeW4Jyl62uqq0ePEpbP3Q7I5Npo9wZzwzmu6J18mPuK0kJix5hofB_dl2Z7FqPZOKuQ/s72-c-rw/mahatma-jyotiba-phule-mandai-crawford-market-mumbai.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/mumbai-prabhav-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/mumbai-prabhav-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची