हर्षद खंदारे यांची आईची कविता.
कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे आई ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे आई असे जवळ - तसे दूर भाबडे अंतराळ माझे आई कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई असेल! आहे! असणार? कुणी शब्द गाळले माझे आई अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे आई अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे आई कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा