
साधी सोपी घरच्या घरी सहज करता येण्याजोगी खमंग आणि रूचकर कोकणी पद्धतीची प्रसिध्द चिकन बिर्याणी.
चिकन बिर्याणी करण्यासाठी लागणारा जिन्नस
- ६७५ ग्रा. चिकन तुकडे
- १॥ कप बासमती तांदूळ
- २ मोठे चमचे तेल
- १ कापलेला कांदा
- २ कांडी लसूण सोललेली
- १ हिरवी मिरची कापलेली
- १ तुकडा आले कापलेले
- २ चमचे चिकन मसाला
- १ चमचा मीठ चवीनुसार
- १/२ चमचा गरम मसाला
- ३ कापलेले टोमॅटो
- १/२ चमचा हळद
- २ तेजपत्ते
- ४ छोटी वेलची
- ४ लवंग
- १ चमचा केसर
चिकन बिर्याणी करण्याची पाककृती
- तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे.
- एका कढईत तेल गरम करून कांदा भाजत नंतर लसुण, आले व हिरवी मिरची टाकुन दोन मिनीटे फ्राय करावे.
- कढईत भाजलेल्या सारणात चिकन टाकुन साधारण ३ मिनीटे फ्राय करावे.
- नंतर यात चिकन मसाला, चविनुसार मीठ आणि गरम मसाला टाकुन ५ मिनीट फ्राय करावे.
- पुढे यातच टोमॅटो टाकुन ३ ते ४ मिनीटे व्यवस्थित भाजावे.
- आता कढई उतरवुन एका बाजुला ठेवावी.
- आता एका दुसर्या कढईत तांदूळ ३ कप, पाणी, हळद, तेजपान, वेलची, लवंग आणि केसर टाकुन पाणी आटेपर्यंत व्यवस्थित शिजवावे.
- आता शिजलेल्या तांदळात चिकन टाकुन अलगद मिळवुन घ्यावे.
- आता हे सर्व कमी गॅसवर ८ ते १० मिनीटे ठेवावे.
- ८ ते १० मिनिटे शिजविल्यानंतर आपली चिकन बिर्याणी तयार आहे.
- हि चिकन बिर्याणी ८ ते १० मिनीटानंतर खाल्ल्यास उत्तम चव येते.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा