Loading ...

चिकन बिर्याणी (पाककृती)

चिकन बिर्याणी (पाककृती) - [Chicken Biryani Recipe] साधी सोपी कोकणी पद्धतीची ही प्रसिध्द चिकन बिर्याणी चवीला खमंग लागते.

चिकन बिर्याणी (पाककृती)

साधी सोपी घरच्या घरी सहज करता येण्याजोगी खमंग आणि रूचकर चिकन बिर्याणी


चिकन बिर्याणी (पाककृती)

(Chicken Biryani Recipe) साधी सोपी घरच्या घरी सहज करता येण्याजोगी खमंग आणि रूचकर कोकणी पद्धतीची प्रसिध्द चिकन बिर्याणी.



चिकन बिर्याणी करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • ६७५ ग्रा. चिकन तुकडे
  • १॥ कप बासमती तांदूळ
  • २ मोठे चमचे तेल
  • १ कापलेला कांदा
  • २ कांडी लसूण सोललेली
  • १ हिरवी मिरची कापलेली
  • १ तुकडा आले कापलेले
  • २ चमचे चिकन मसाला
  • १ चमचा मीठ चवीनुसार
  • १/२ चमचा गरम मसाला
  • ३ कापलेले टोमॅटो
  • १/२ चमचा हळद
  • २ तेजपत्ते
  • ४ छोटी वेलची
  • ४ लवंग
  • १ चमचा केसर

चिकन बिर्याणी करण्याची पाककृती


  • तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे.
  • एका कढईत तेल गरम करून कांदा भाजत नंतर लसुण, आले व हिरवी मिरची टाकुन दोन मिनीटे फ्राय करावे.
  • कढईत भाजलेल्या सारणात चिकन टाकुन साधारण ३ मिनीटे फ्राय करावे.
  • नंतर यात चिकन मसाला, चविनुसार मीठ आणि गरम मसाला टाकुन ५ मिनीट फ्राय करावे.
  • पुढे यातच टोमॅटो टाकुन ३ ते ४ मिनीटे व्यवस्थित भाजावे.
  • आता कढई उतरवुन एका बाजुला ठेवावी.
  • आता एका दुसर्‍या कढईत तांदूळ ३ कप, पाणी, हळद, तेजपान, वेलची, लवंग आणि केसर टाकुन पाणी आटेपर्यंत व्यवस्थित शिजवावे.
  • आता शिजलेल्या तांदळात चिकन टाकुन अलगद मिळवुन घ्यावे.
  • आता हे सर्व कमी गॅसवर ८ ते १० मिनीटे ठेवावे.
  • ८ ते १० मिनिटे शिजविल्यानंतर आपली चिकन बिर्याणी तयार आहे.
  • हि चिकन बिर्याणी ८ ते १० मिनीटानंतर खाल्ल्यास उत्तम चव येते.

स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची