Loading ...
/* Dont copy */

पुणे जिल्हा (महाराष्ट्र)

पुणे जिल्हा (महाराष्ट्र) - शिवाजी, पेशवे, थोर समाज सुधारकांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि शिक्षणाचे माहेरघर असलेला पुणे जिल्हा [Pune District].

पुणे जिल्हा (महाराष्ट्र) | Pune District (Maharashtra)

शिवाजी, पेशवे, थोर समाज सुधारकांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि शिक्षणाचे माहेरघर असलेला पुणे जिल्हा


पुणे जिल्हा (महाराष्ट्र)

हे पुणे! शिवरायांनी याच पुण्यात बालपणी संस्करांचे व पराक्रमी धडे गिरविले. पेशवाईमध्ये याच पुण्याचे राजधानीचे स्थान भूषविले. पेशव्यांचे कर्तृत्वही फुलविले याच पुण्याने. असे हे पुणे! लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी. थोर समाजसुधारक जोतिबा फुल्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवातही येथूनच झाली. या कार्याला प्रेरणाही या पुण्यातच मिळाली आणि विरोधही येथेच झाला.

मुख्य ठिकाण: पुणे
एकुण तालुके: चौदा
क्षेत्रफळ: १५,६४३ चौ.कि.मी.
लोकसंख्या: ९९,२४,२२४

समाजपरिवर्तन, सुधारणेच्या कार्यात सर्वस्व झोकून देणाऱ्या अनेक समाजसुधारकांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. याच पुण्यातील सनातन्यांनी आगरकारांच्या हयातीतच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा करंटेपणाही दाखविला. असे हे पुणे! लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर असे दोन भिन्न विचार-प्रवाह येथेच निर्माण होतात; कधी हातात हात घालून आपली वाटचाल करतात तर कधी कायमच्याच दोन समांतर रेषा बनतात.

गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), महात्मा जोतिबा फुले यांसारखे समाजसुधारक ही पुण्याच्या मातीने राष्ट्राला दिलेली देणगीच ठरली. रा. गो. भांडारकर, सुधाकर आगरकर, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या नवरत्नांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले - याच पुण्यात फुलले! असे हे पुणे!

Maharashtra's Cultural Capital to Educational hub Detailed Information, Photos and Videos of Pune District.


पुणे जिल्ह्याचा इतिहास


पुणे शहराच्या नावावरून जिल्ह्यासही पुणे जिल्हा असे नाव पडले. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या टॉलेमी याच्या लिखाणात पुण्याचा ‘पुन्नाटा’ असा उल्लेख आढळतो. राष्ट्रकूट राजवटीत या गावाचा ‘पुनवडी’ नावाने उल्लेख केला जाई. पुण्य या शब्दावरून पुणे हे नाव पडले असावे, अशीही एक उपपती मांडली जाते. मुळा व मुठा या नद्यांच्या संगमावर वसलेले पुण्यस्थळ म्हणून हे नाव पडले असावे. मोगल राजवटीत या गावाचा ‘कसबे पुणे’ असा उल्लेख आढळतो.


शनिवार वाडा


शनिवार वाड्याच्या आतील जिर्ण अवशेष
शनिवार वाड्याच्या आतील जिर्ण अवशेष
शनिवार वाड्यातील बाजीराव पेशव्यांचा पुतळा
शनिवार वाड्यातील बाजीराव पेशव्यांचा पुतळा
शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा आणि बुरूज
शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा आणि बुरूज

आंध्र, चालुक्य व राष्ट्रकुटांच्या प्राचीन राजवटी पुण्याने पाहिल्या. मध्ययुगातील यादवांचा अमलही पुण्याने पाहिला. बहामनी, निजामशाही व आदिलशाही राजवटीही येथेच त्यांच्या मनात रुजले. मराठा राजवटीत पुणे हे एक महत्त्वाचे राजकीय केंद्र होते. पुढील काळात पेशव्यांनी आपली राजधानी येथे वसविली. १८१८ साली मराठेशाहीचा अस्त झाला व पुण्याच्या शनिवारवाड्यावरील भगव्या शेंड्याची जागा ‘युनियन जॅक’ने घेतली.

शनिवार वाडा (व्हिडिओ)स्वांतत्र्य आंदोलनातही पुणे अग्रभागी राहिले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांची कर्मभूमीही पुणे हीच होती. पुण्याच्या गणेशखिंडीतच २२ जून १८९७ रोजी चापेकर बंधूनी रँड या जुलमी प्लेग कमिशनरचा वध केला. अनेक क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्य सेनानींनी पुण्यास आपली कर्मभूमी मानले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पुण्याच्या शनिवारवाड्यावरीलयुनियन जॅक’ची जागा भारताच्या ‘तिरंगी झेंड्याने’ घेतली.

पुणे जिल्ह्याचे भौगोलिक स्थान


पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पुर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा. पश्चिमेस रायगड जिल्हा, तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे. पुणे जिल्हा निसर्ग संपन्न आहे त्याला नैसर्गिक सीमाही लाभली आहे. जिल्ह्याची कुकडी, घोड व भीमा या नद्यांनी तर दक्षिण सीमा नीरा नदीने निश्चित केली आहे. जिल्ह्याची पश्चिम सीमा सह्य पर्वतरांगांनी आखून दिली आहे.

पुणे जिल्ह्याचा नकाशा
पुणे जिल्ह्याचा नकाशा

जिल्ह्याचा आकार सर्वसाधारणः त्रिकोणी आहे. जिल्ह्याला पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त विस्तार सुमारे १७१ कि.मी. असून दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त विस्तार सुमारे १५५ कि.मी. आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुके

पुणे जिल्ह्यात एकूण १४ तालुके आहेत
 1. हवेली
 2. पुणेशहर
 3. मावळ
 4. मुळशी
 5. शिरूर
 6. बारामती
 7. दौंड
 8. इंदापूर
 9. भोर
 10. वेल्हा
 11. पुरंदर
 12. खेड
 13. जुन्नर
 14. आंबेगाव

पुणे जिल्ह्याची प्राकृतिक रचना


पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. हा डोंगराळ भाग सुमारे ५ ते १० कि. मी. रुंदीचा असून त्यास ‘घाटमाथा’ असे म्हणतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागातीलच पण काहीशा वायव्येकडे असलेल्या नाणेघाटातून ठाणे जिल्ह्यात उतरता येते, तर बोरघात उतरून रायगड जिल्ह्यात प्रवेश करता येतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागातीलच परंतु काहीशा नैऋत्येकडे असलेल्या वरंधा घाटातूनही रायगड जिल्ह्यात उतरता येते. घाटमाथ्याच्या पूर्वेस असलेल्या ३० ते ४० कि.मी. रुंदीच्या पट्ट्यास ‘मावळ’ म्हणून ओळखले जाते. मावळ हा डोंगराळ भाग असून त्यामध्ये अधून-मधून सखल प्रदेश आढळतो.जिल्ह्याचा पूर्वेकडील व आग्नेयेकडील भाग पठारी असून त्यास ‘देश’ म्हणून ओळखले जाते.


भाटघर येथील धरण १९२९ मध्ये बांधण्यात आले असून पूर्वी ते तत्कालीन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉईड यांच्या नावाने ‘लॉईड धरण’ म्हणून ओळखले जात असे.

सह्याद्रीच्या रांगा


पुणे जिल्हा सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेला आहे या डोंगर रांगा उत्तर-दक्षिण पसरलेल्या असून या पर्वतरांगामध्ये उत्तरेस असलेले हरिश्चंद्रगड (१४२४ मीटर) हे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर होय. तसुबाई, भीमाशंकर, शिंगी ही जिल्ह्यातीळ पश्चिम सीमेवरील सह्य पर्वतरांगांमध्ये वसलेली काही उंच शिखरे होत. जीवधन, धाक, अहुपे, नागफणी (ड्यूक्स नोज) ही या रांगांमधील आणखी काही महत्त्वाची शिखरे होत. जिल्ह्याच्या उत्तर भागात हरिश्चंद्रगड डोंगराच्या रांगा पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेल्या आहेत. शिंगी, तासुबाई, मांडवी, ताम्हिणी व अंबाला या डोंगररांगाही सह्य पर्वततातून निघून पश्चिम-पूर्व अशा गेलेल्या आहेत. शिंगी डोंगररांगांनी भीमा व भामा या नद्यांच्या जलविभाजकाचे कार्य पार पाडले आहे. पवना व मुळा या नद्यांच्या दरम्यान मांडवी डोंगररांगा पसरलेल्या आहेत, तर मुळा व मुठा या नद्यांच्या दरम्यान ताम्हिणी डोंगररांगा पसरलेल्या आहेत. अंबाला डोंगररांगेने मुळा व नीरा या नद्यांच्या जलदुभाजकाचे कार्य केले आहे.

पश्चिमकडील डोंगराळ भाग या भागाला लागून असलेला पूर्वेकडील टेकड्यांचा उंच-सखल प्रदेश व त्याच्याही पूर्वेकडील पठारी प्रदेश अशी पुणे जिल्ह्याची सर्वसाधारण प्राकृतिक रचना सांगता येईल. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा व भोर या तालुक्यांचा काही भाग येतो. बहुतांशी याच तालुक्यांचा पूर्व भाग; तद्वतच शिरूर; हवेली व पुरंदर या तालुक्यांचा काही भाग टेकड्यांच्या उंच सखल प्रदेशात मोडतो. दौंड, बारामती, इंदापूर आदी तालुक्याचा समावेस पूर्वेकडील पठारी प्रदेशात होतो.

पुणे जिल्ह्याची माती / मृदा


पुणे जिल्हाभर तांबडी, तपकिरी व काळी अशा तीन प्रकारची माती आढळते. पश्चिमेकडून, जसजसे पूर्वेकडे जावे तसतशी मातीची सुपीकता वाढलेली आढळून येते. जुन्नर, आंबेगाव, खेड व पुरंदर या भागातील डोंगराळ प्रदेशात तांबडी माती आढळते. खेड, हवेली, शिरूर, दौंड व पुरंदर या तालुक्यांच्या काही भागातील माती तपकिरी आहे. इंदापूर व बारामती या तालुक्यात काळी कसदार माती आढळते.

पुणे जिल्ह्याचे हवामान


पुणे जिल्हा हा हवामानाच्या बाबतीत वर्षातील बराचसा काळ कोरडा व आल्हाददायक असतो असे म्हणता येईल. उन्हाळ्यात तुलनात्मकदृष्ट्या हवामान उष्ण असते. मे महिन्यात तापमान ४१ डिग्री सें. ची मर्यादा ओलांडते. काही वेळा मे महिन्यात तापमान त्याहीपेक्षा अधिक वाढलेले आढळून येते. हिवाळ्यात तापमान ६ डिग्री सें. पर्यंतही खाली येते. इंदापूर, दौंड, बारामती या पूर्वेकडील तालुक्यातील हवामान तुलनात्मदृष्ट्या अधिक उष्ण असते. पश्चिमेकडील डोंगराळ भागात तापमान तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडाला नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक म्हणजे ३०० ते ४०० सें. मी. पर्यंत असते. घाटमाथ्याकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. जिल्ह्याचा पूर्व भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतो.

येथील पावसाचे वार्षिक प्रमाण सर्वसाधारणतः ७०ते १२० सें. मी. पर्यंत असते. सुखटणकर, समितीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर व हवेली या तालुक्यांचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रात केला गेला असून १९७४-७५ पासून या तालुक्यांमध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे. आता डॉ. सी. एच. हनुमंतराव समितीच्या शिरफारशींच्या आधारे भोर, मुळशी व मावळ या तालुक्यांचाही नव्याने अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश करण्यात आला असून येथेही १९९४-९५ पासून अवर्षणप्रवण क्षेत्रविकस कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील नद्या


पुणे जिल्हा हा त्याच्या प्रमुख भीमा नदीसाठी प्रसिद्ध आहे. ती पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यात सह्य पर्वतरांगामध्ये ‘भीमाशंकर’ येथे उगम पावते. ती प्रथम काही अंतर जिल्ह्याच्या मध्यातून व नंतर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते. जिल्ह्यातील तिचा प्रवास आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यामधून व दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमावर्ती भागातून होतो. दौंड आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमावरून वाहताना तिने काही काळ पुणे व अहमदनगर आणि पुणे - सोलापूर या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमावरून वाहत जाऊन ती पुढे नीरा नदीचा प्रवाह आपल्या पोटात घालूनच सोलापूर जिल्ह्यात प्रवेशते. इंद्रायणी, घोड, मुळ, मुठा व नीरा या भीमेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत.

इंद्रायणी ही भीमेची उपनदी जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. ही नदी लोणावळ्याच्या नैऋत्येस सह्य रांगांमध्ये कुरवंडे घाटाजवळ उगम पावते. हवेली तालुक्यातील तुळापूर येथे ही भीमेस मिळते. नीरा नदी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिम-पूर्व अशी वाहते. आपल्या या प्रवासात तिने पुणे व सातारा आणि पुणे व सोलापूर या जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. कऱ्हा ही नीरेची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती बारामती तालुक्याच्या सीमावर्ती भागात नीरेस मिळते. बारामती गाव कऱ्हा नदीकाठी वसले आहे. घोड ही भीमेची आग्नेयवाहिनी उपनदी. आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावाजवळ हिचा उगम होतो. दौंडच्या वायव्येस पाच किलोमीटर अंतरावर सांगवीनजिक ती भीमेस मिळते. आंबेगाव, गोडेगाव, वडगाव व शिरूर ही तिच्याकाठची प्रमुख गावे होत. कुकडी नदी जुन्नर तालुक्यात नाणेकडीजवळ चावद येथे उगम पावते. तिचा सुरुवातीचा प्रवास जुन्नर तालुक्यातून होतो. पुढे ती शिरूर व नगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्याच्या सीमेवरुन वाहते. या सीमावर्ती भागातच ती घोड नदीस मिळते. मीना ही घोडनदीची आणखी एक उपनदी होय.


देशातील सर्वांत पहिले उपग्रह दळणवळण केंद्र (विक्रम) जुन्नर तालुक्यात आर्वी येथे १९७१ पासून कार्यरत आहे.

पुणे जिल्ह्यातील धरणे


वेळवंडी या नीरेच्या उपनदीवर भाटघर येथे धरण बांधण्यात आले आहे. या धरणास पूर्वी ‘लॉईड धरण’ म्हणून ओळखले जाई. आता तेथील जलाशयास ‘येसाजी लीक जलाशय’ असे संबोधले जाते. खडकवासला प्रकल्पांतर्गत पुण्याजवळ तीन धरणे बांधण्यात आली आहेत. अंबी या मुठेच्या उपनदीवर वरसगाव येथे दुसरे धरण आहे. या धरणाच जलाशयास ‘वीर बाजी पासलकर’ यांचे नाव देण्यात आले आहे. अंबी, मोशी व मुठा या नद्यांवर खडकवासला येथे तिसरे धरण बांधण्यात आले आहे. याशिवाय पुण्याजवळच मुळशी येथे मुळा नदीवर आणखी एक धरण बांधण्यात आलेले आहे. भीमा प्रकल्पातंर्गत पवना नदीवर मावळ तालुक्यात फागणे येथे पवना धरण आहे. कुकडी प्रकल्पातंर्गत घोड नदीवर शिरूर तालुक्यात चिंचणी येथे तसेच आंबेगाव तालुक्यात डिंभे येथे तसेच कुकडी नदीवर जुन्नर तालुक्यात येडगाव व माणिकडोह येथे धरणे बांधण्यात आली आहेत.

वरील प्रकल्पांशिवाय खेड तालुक्यातील चासकमान प्रकल्प, जुन्नर तालुक्यात पुष्पावती प्रकल्प, पुरंदर तालुक्यात नाझरे प्रकल्प हे मध्यम प्रकल्प जिल्ह्यात आहेत. बारामती तालुक्यात शिरसुफळ, इंदापूर तालुक्यात शेटफळ व दौंड तालुक्यात वरवंड, कासुर्डी आणि माटोबा हे महत्त्वाचे तलाव आहेत.

पुणे जिल्ह्यातील पिके


बाजरी व तांदूळ ही पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची खरीप पिके होत. तर गहू आणि हरभरा ही महत्त्वाची रबी पिके होत. ज्वारीचे पीक जिल्ह्यात दोन्ही हंगामात घेतले जाते.

भोर, खेड, हवेली, इंदापूर हे तालुके खरीप ज्वारीच्या दृष्टीने तर इंदापूर, दौंड, शिरूर, बारामती व पुरंदर हे तालुके रबी ज्वारीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. बाजरीचे पीक प्रामुख्याने शिरूर, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर व खेड या तालुक्यांमध्ये घेतले जाते. मावळ, मुळशी, भोर, जुन्नर, खेड व वेल्हा हे तालुके तांदळाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहेत.


भारतातील पहिली मुलींची सैनिकी शाळा जुलै १९९७ पासूनपुणे येथे सुरू झाली आहे.

‘आंबेमोहोर’ हा सुवासिक तांदूळ भोर तालुक्यात विशेषत्वाने घेतला जातो. मुळशी तालुक्यात ‘कमोद’ जातीच्या तांदळासाठी, तर जुन्नर तालुका ‘जिरेसाळ’ जातीच्या तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. बारामती, इंदापूर व शिरूर हे तालुके गव्हाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. जुन्नर, खेड व इंदापूर या तालुक्यात हरभरा मोठ्या प्रमाणावर घेतला जातो.

ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक असून बारामती, इंदापूर व हवेली हे तालुके उसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पुरंदर, दौंड व शिरूर या तालुक्यांतही उसाचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले जाते.

पुणे हे महत्त्वाचे शहर जिल्ह्यात असल्याने शहराच्या गरजा ओळखून जवळपासच्या भागात पालेभाज्या व फळभाज्या यांच्या उत्पादनास महत्त्व दिले जाते. खेड, हवेली, आंबेगाव या तालुक्यांमध्ये भाजीपाला अधिक पिकविला जातो. आंबेगाव तालुक्यात टोमॅटोचे उत्पन्न चांगले निघते. खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात बटाट्याचे पीक घेतले जाते. जुन्नर, खेड, पुरंदर आदी तालुक्यांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

फळांचा उत्पादनाच्या दृष्टीनेही जिल्हा महत्त्वाचा गणला जातो. बारामती तालुक्यात व हवेली तालुक्याच्या काही भागात द्राक्षबागा आहेत. दौंड व शिरुर तालुक्यात संत्री, मोसंबीच्या तर पुरंदर तालुक्यात अंजीर व सीताफळाच्या बागा आहेत.


पुणे जिल्ह्याच्या काही भागात विशेषत्वाने जुन्नर, हवेली व दौंड या तालुक्यांमध्ये थोड्याफार प्रमाणावर फुलांची शेतीही केली जाते.

पुणे जिल्ह्यातील जंगलं / वने


पुणे जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळजवळ १२ टक्के क्षेत्रावर जंगलं आहेत. कोणत्याही प्रदेशात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने ३३ टक्के भू-क्षेत्र जंगलाखाली असणे अपेक्षित असते; हे लक्षात घेता जिल्ह्यातील जंगलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक वन-क्षेत्र पश्चिमेकडील डोंगराळ भागात आहे. मुळशी, मावळ, आंबेगाव, भोर व वेल्हा या तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी जंगलं आहेत. हवेली व पुरंदर तालुक्यांच्या काही भागातही विरळ जंगलं आहेत. आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे अभयारण्य विकसित करण्यात आले असून या अभयारण्याचा काही भाग ठाणे जिल्ह्यातही पसरलेला आहे. पुण्याजवळच्या सिंहगड परिसरातही जंगलाचा जाणिवपूर्वक विकास करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील जंगलांमध्ये लांडगा, कोल्हा, तरस, ससा, रानमांजर, मुंगूस, सायाळ यांसारखे विविध प्राणी आढळतात. पुणे जिल्ह्यात सुमारे ३०० प्रकारचे पक्षी आढळून येतात.

रानकोंबडा, तितर, मोर, पोपट, बुलबुल, कबुतर आदी पक्षी येथील वनात विशेषत्वाने आढळतात. भीमाशंकर येथील वनात ‘शेखरू’ ही उडणारी खार आढळते.


पुणे येथे १९८२ पासून शासनमान्य शेअर बाजार कार्यरत आहे (Pune Stock Exchange).

पुणे जिल्ह्यातील किल्ले


पुण्यापासून जवळ हवेली तालुक्यात ‘सिंहगड’ हा किल्ला आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव ‘कोंडाणा’ असे होते. हा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. गड जिंकला पण सिंहपराक्रमी तानाजी गेला म्हणून याचे नाव ‘सिंहगड’ असे ठेवले गेले. जेथे शिवरायांचा जन्म झाला, तो शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यात आहे. येथे शिवाई देवीचे प्राचीन मंदिर असल्याने किल्ल्यास ‘शिवनेरी’ हे नाव पडले. जो गड जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले, तो ‘तोरणगड’ / ‘तोरणा किल्ला’ पुण्यापासून -जवळच वेल्हा तालुक्यात आहे. वेल्ह्यापासून जवळच ‘राजगड’ हा डोंगरी किल्ला आहे. शिवरायांची बरीचशी कारकीर्द या किल्ल्यावरूनच पार पडली.

‘पुरंदरगड’ पुण्यापासून जवळ असलेला आणखी एक दुर्ग. हा गड पुरंदर तालुक्यात सासवडजवळ आहे. पुरंदरगडाला लागून ‘वज्रगड’ हा दुर्ग आहे. ‘लोहगड’ हा जिल्ह्यातील एक प्राचीन किल्ला असून तो मळवली रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस सुमारे सात किलोमीटर अंतरावर इंद्रायणीच्या खोऱ्यात वसला आहे. बोरघाटाच्या मुखाशी असलेला हा किल्ला लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा गणला गेला होता. या किल्ल्याच्या जवळच विसापूर हा दुसरा किल्ला आहे. याशिवाय अनेक लहान-मोठे गडकोट पुणे जिल्ह्यात असून चाकणचा भुईकोट किल्ला व पुण्यातील पेशवेकालीन शनिवारवाडा इतिहासप्रसिद्ध आहेत.


पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे


पुणे शहर


पुणे शहर हे पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. मुळा-मुठेच्या संगमावर वसलेले, एकेकाळी पेशव्यांची राजधानी असणारे हे पुणे शहर आज महाराष्ट्रातील महत्त्वाचे शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक केंद्र मानले जाते.

‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांसारख्या शैक्षणिक संस्था तसेच अनेक सामान्य शिक्षण महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये, विधी महाविद्यालये, अभियांत्रिक महाविद्यालये व वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

राजा दिनकर केळकर संग्रहालय - पुणे (व्हिडिओ)पुणे हे पुणे विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. येथील राजा दिनकर केळकर संग्रहालय व महात्मा फुले वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहेत.


पुण्याजवळ येरवडा येथे असलेल्या आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधीना कैदेत ठेवले होते. येथेच कस्तुरबांचा मृत्यू झाला.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, चित्रपट आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र, आकाशवाणी केंद्र, भारत इतिहास संशोधन मंडळ, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, राष्ट्रीय स्फोटके प्रयोगशाळा, मध्यवर्ती जल व शक्ती संशोधन केंद्र, उष्ण कटिबंधीय मान्सून प्रयोगशाळा (वेधशाळा), भारतीय अन्वेषण मंडळ, इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी इत्यादी संस्था पुणे व परिसरात आहेत. पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिद्यांची समाधी आहे. हे ठिकाण ‘शिंद्यांची छत्री’ म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून जवळच बालेवाडी येथे क्रीडासंकुल उभारण्यात आले आहे. पुण्याजवळच पानशेत व वरसगाव येथील जलाशयाच्या परिसराचा क्रीडाकेंद्र व पर्यटनस्थळ म्हणून विकास होत आहे. पुण्याजवळ निगडी येथे ‘अप्पूघर’ हे करमणुकीचे केंद्र आहे.

पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून पिंपरी, चिंचवड, भोसरी, हडपसर, पर्वती व गुलटेकडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. जवळच थेरगाव येथे कागद गिरणी आहे. पुणे हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन व बाजारपेठ असून पुण्याजवळ लोहगाव येथे विमानतळ आहे. पुणे-मुंबई अंतर रेल्वेने १९२ कि.मी. असून सडकेने १७० कि.मी. आहे.

जुन्नर


जुन्नर तालुक्याचे मुख्य ठिकाण. राजगुरुनगरपासून ६० कि. मी. अंतरावर, सह्याद्रीच्या कुशीत हे ठिकाण वसले आहे. येथूनच भीमा नदीचा उगम होतो. येथील महादेवाचे देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. येथील देवालय नाना फडणवीसांनी बांधले आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही भीमाशंकर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.

आळंदी

पुण्यापासून जवळच असलेले हे तीर्थक्षेत्र खेड तालुक्यात मोडाते. इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला ज्ञानरायांच्या समाधीचे दर्शन घेण्यास लाखो भाविक येथे गर्दी करतात.

देहू


पुण्यापासून जवळच हवेली तालुक्यात वसलेले तीर्थक्षेत्र. हे स्थान संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते. फाल्गुन वद्य द्वितीयेला (तुकाराम बीज) येथे मोठी यात्रा भरते. येथून पाच कि.मी. अंतरावर भंडारा डोंगर आहे. तेथे एकांतात तुकाराम महाराज चिंतन करीत असत, असे म्हटले जाते.

अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने


अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. ही स्थाने अशी

 • चिंतामणी (थेऊर, तालुका हवेली)
 • श्रीगणपती (रांजणगाव, तालुका शिरूर)
 • मोरेश्वर (मोरगाव, तालुका बारामती)
 • श्रीविघ्नेश्वर (ओझर, तालुका जुन्नर
 • गिरिजात्मक (लेण्याद्री, तालुका जुन्नर)

राजगुरुनगर


खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण. हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध.

चाकण


खेड तालुक्यात. कांद्याची मोठी बाजारपेठ. येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध. येथे औद्योगिक वसाहत असून या परिसरात अनेक मोठे उद्योग उभे राहिले आहेत.

लोणावळे


पुण्यापासून ६० कि.मी. अंतरावर पुणे-मुंबई हमरस्त्यावर असलेले हे थंड हवेचे ठिकाण मावळ तालुक्यात मोडते. येथे आर. एन. एस. नौदल प्रशिक्षण केंद्र आहे. लोणावळ्यापासून जवळच वळवण येथे धरण आहे.

लोणावळ्याच्या पूर्वेस ८ कि.मी. अंतरावर कार्ले, भाजे व बेंडसा येथे प्राचीन लेणी आहेत. कार्ले येथील लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील आहेत.

सासवड


पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथे सोपानदेवाची समाधी आहे. जवळच असलेले ‘कोठीत’ हे गाव आचार्य अत्रे यांचे जन्मस्थान आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे.

उरूळी-कांचन


हवेली तालुक्यात. येथील निसर्गोपचार केंद्र प्रसिद्ध आहे. १९८२ च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी व थोर गांधीवादी कार्यकर्ते मणिभाई देसाई यांनी स्थापन केलेली भारतीय अ‍ॅग्रो फाऊंडेशन ही संस्था येथे आहे. जवळच ‘भुलेश्वर’ हे श्रीशंकराचे देवस्थान व सहलीचे ठिकाण आहे.

जेजुरी


पुरंदर तालुक्यात. येथील गडावर महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे देवस्थान आहे. सोमवती अमावास्येस येथे मोठी यात्रा भरते.

बनेश्वर


पुण्यापासून ३० कि.मी. अंतरावर नसरापूरजवळ हे स्थान वसले आहे. येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य परिसरामुळे सहलीसाठी लोक येथे येतात.

खेड-शिवापूर


हवेली तालुक्यात. येथील कमर‍अली दरवेशाचा दर्गा अनेक हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान आहे.

वढू


हे गाव शिरुर तालुक्यात भीमा-कोरेगावपासून ३ कि.मी. अंतरावर आहे. येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

भाटघर


हे भोर तालुक्यात असून नीरेची उपनदी वेळवंडीवर बांधलेले ‘लॉईड धरण’ येथे आहे. या धरणाच्या जलाशयास आता ‘येसाजी कंक जलाशय’ असे नाव देण्यात आले आहे. पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर असलेले हे स्थळ आता पर्यटनकेंद्र म्हणून विकसित होत आहे.

पुणे जिल्ह्यात मांजरी येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते.

आर्वी


हे ठिकाण जुन्नर तालुक्यात असून येथे ‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.

वालचंदनगर


हे ठिकाण इंदापूर तालुक्यात असून येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना, प्लॅस्टिकचा कारखाना, वनस्पती तुपाचा कारखाना व वालचंदनगर उद्योगसमूहाचा अभियांत्रिकी उत्पादनांचा कारखाना आहे.

पिंपरी-चिंचवड


पूर्वी पुणे शहराची उपनगरे समजली जाणाऱ्या या ठिकाणी आता स्वतंत्र महानगरपालिका आहे. पिंपरी आणि चिंचवड येथे औद्योगिक वसाहत असून या वसाहतींमध्ये व परिसरात अनेक, उद्योगधंदे स्थापन झाले आहेत. चिंचवड येथे श्रीमोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे.

बारामती


बारामती तालुक्याचे मुख्य ठिकाण. कऱ्हा नदीकाठी वसले आहे. तालुक्यात माळेगाव व सोमेश्वरनगर येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने कार्यरत. येथे बारामती ग्रेप इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प कार्यरत असून येथील औद्योगिक वसाहतीत अनेक लहान-मोठे कारखाने उभे राहिले आहेत.

भोर


भोर तालुक्याचे मुख्य ठिकाण. भोर परिसरात अलीकडील काळात लहान मोठ्या अनेक उद्योगधंद्याचे केंद्रीकरण झाले असून येथील रंगाचा व रेक्झीनचा (भोर इंडस्ट्रीज) कारखाना प्रसिद्ध आहे.

याशिवाय पौड (मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण, जवळच मुळशी येथे धरण.); शिरूर (शिरूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. घोडनदीकाठी वसले आहे.); इंदापूर (इंदापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना.); तळेगाव (मावळ तालुक्यात. काच कारखाना प्रसिद्ध.); वडगाव (मावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण.) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे आहेत.

पुणे जिल्ह्यातील उद्योगधंदे


औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा. जिल्ह्यात पिंपरी, चिंचवड, भोसरी, गुलटेकडी, पर्वती, हडपसर, बारामती, भोर, लोणावळे (तालुका मावळ), जेजुरी (तालुक पुरंदर), कुरकुंभ (तालुका दौंड), पिरंगुट (तालुका मुळशी), चाकण (तालुका खेड), कोरेगाव, शिक्रापूर, रांजणगाव, कारेगाव (सर्व तालुका शिरुर) या ठिकाणी वसाहती व औद्योगिक केंद्रे प्रस्थापित झाली आहेत.

पुणे जिल्ह्यात पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा प्रमुख औद्योगिक पट्टा आहे. टेल्को, फिलिप्स, बजाज, किर्लोस्कर, सेंच्युरी एन्का, गरवारे नायलॉन, क्रॉप्टन ग्रीव्ह्ज यांसारख्या उद्योगसमुहांचे अनेक आधुनिक उद्योग या औद्योगिक पट्ट्यात एकवटले आहेत. पिंपरी येथे हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोन्टिक्सचा कारखाना आहे. खडकी व देहूरोड येथे केंद्र सरकारचा दारूगोळ्याचा कारखाना आहे. तळेगाव दाभाडे येथे काच कारखाना व ईगल फ्लास्क कंपनीचा थर्मासचा कारखाना आहे. मुंढवा येथे भारत फोर्ज व कल्याणी स्टील या कंपन्यांचे अवजड यंत्रसामुग्रीचे कारखाने आहेत. चिंचवड येथे बजाज कंपनीचे स्कूटर व रिक्षा यांचे कारखाने आहेत.

पिंपरी


पिंपरी येथे टेल्को कंपनीचा मोटारीचा कारखाना आहे. भोर येथील रेक्झीनचा व रंगाचा कारखाना प्रसिद्ध असून इतरही अनेक कारखाने तेथे विकसित झाले आहेत. इंदापूर तालुक्यात वालचंदनगर येथे यंत्रनिर्मितीचे कारखाने आहेत. शिरूर तालुक्यात रांजणगाव येथे अपोलो टायर या कंपनीचा टायरचा कारखाना असून व्हर्लपूल या कंपनीचा रेफ्रिजरेटर निर्मिती प्रकल्पही आहे. याच तालुक्यात कोरेगाव-सणसवाडी येथे शार्प कंपनीचा दुरचित्रवाणीसंच निर्मितीचा प्रकल्प, इस्पात कंपनीचा फोर्जिंगचा कारखाना व अन्य लहानमोठे अनेक कारखाने आहेत. पिंपरी येथे तसेच हवेली तालुक्यात लोणी-काळभोर येथे फिलिप्स कंपनीचे रेडिओ-दूरचित्रवाणी संच निर्मितीचे कारखाने आहेत.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात मधुरकरनगर येथे भीमा सहकारी साखर कारखाना, इंदापुर तालुक्यात भवानीनगर येथे श्रीछपत्रती सहकारी साखर कारखाना; बारामती तालुक्यात शिवनगर (माळेगाव) येथे माळेगाव सहकारी कारखाना, बारामती तालुक्यातच सोमेश्वरनगर येथे श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखाना; हवेली तालुक्यात चिंतामणीनगर (थेऊर) येथे यशवंत सहकारी साखर कारखाना; जुन्नर तालुक्यात शिरोली येथे श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना, भोर तालुक्यात अनंतनगर (निगडे) येथे राजगड सहकारी साखर कारखाना; शिरूर तालुक्यात न्हावरे येथे घोडगंगा सहकारी कारखाना; इंदापूर तालुक्यात महात्मा फुले नगर (बिजवडी) येथे इंदापूर सहकारी साखर कारखाना; मुळशी तालुक्यात हिंजवडी येथे श्रीसंत तुकाराम सहकारी साखर कारखान हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने कार्यरत आहेत.

याशिवाय जुन्नर येथे हातकागद, बनविण्याचा व्यवसाय प्रचलित आहे. मेंढीच्या केसांपासून घोंगड्या बनविण्याचा उद्योगही जुन्नर तालुक्यात चालतो. विड्या वळणे, दोरखंड तयार करणे यासारखे उद्योग विखुरलेल्या स्वरूपात जिल्ह्याच्या विविध भागात अस्तित्वात आहेत.


वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था’ ही सहकारी क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था पुणे येथे आहे.

पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था


मुंबई - पुणे - बंगळूर - चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जिल्ह्यातून जातो. खंडाळा, लोणावळे, कामशेत, वडगाव, तळेगाव, निगडी, चिंचवड, पिंपरी, पुणे, शिवापूर ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. पुणे-सोलापूर-हैदराबाद विजयवाडा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊही जिल्ह्यातून जातो. या महामार्गावर पुणे, लोणी, भिगवण, इंदापूर ही जिल्ह्यातील ठिकाणे आहेत. पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नासही जिल्ह्यातून गेला आहे. पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. याशिवाय पुणे-अहमदनगर, पुणे-पंढरपूर, पुणे-बारामती (हडपसर, जेजुरीमार्गे), पुणे-महाड हेही प्रमुख रस्ते जिल्ह्यातून गेले आहेत. जुन्नरहून कल्याणकडे जाताना नाणे घाट लागतो. पुण्याहून साताऱ्यास जाताना आपणास कात्रज घाट ओलांडावा लागतो. पुण्याहून सासवडला जाताना दिवे घाट पार करावा लागतो. भोरवरून महाडला जाताना वरंधा घाट उतरावा लागतो.

मुंबई-पुणे-कोल्हापूर हा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. लोणावळे, तळेगाव, पुणे, उरळी-कांचन, दौंड ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके होत. पुणे-मिरज हा जिल्ह्यातून जाणारा आणखी एक लोहमार्ग होय. सासवड रोड, जेजुरी, वाल्हे, नीरा ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके होत. याशिवाय पुणे-बारामती हा रुंदमापी लोहमार्गही जिल्ह्यातून गेला आहे. पुणे व दौंड ही जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन्स होत. पुण्याजवळ लोहगाव येथे विमानतळ आहे.

३१४ कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग पुणे जिल्ह्यातून गेला आहे, तर पुणे जिल्ह्यातील लोहमार्गाची एकूण लांबी ३११ कि.मी. हून अधिक आहे.


इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून जुन्नर जवळच्या नाणेघाटातून घाटमाथा व तळकोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते.

पुणे जिल्हा (महाराष्ट्र) या संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1381,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,6,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1115,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,9,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,3,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,3,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,70,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,12,निवडक,8,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,38,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,6,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1156,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,29,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,287,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,144,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,306,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,8,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,21,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: पुणे जिल्हा (महाराष्ट्र)
पुणे जिल्हा (महाराष्ट्र)
पुणे जिल्हा (महाराष्ट्र) - शिवाजी, पेशवे, थोर समाज सुधारकांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि शिक्षणाचे माहेरघर असलेला पुणे जिल्हा [Pune District].
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNkfWL8xyEcun5PmwkbkgUQRHavjP1hVCmdFoVV6wkm1PCXKQiLY4DN5P14yptqshLiqxUh3ebigdkAeylhFMUA9p1LBjediWoC8lFtjGVsxvdZa1AymvYPRq-xsnYZER_hPPSyyZuGFcsaNZgs6sAMtC-lWC68dqZXECuD8hBFSm269xCTxOvkhkE9g/s1600-rw/pune-district.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNkfWL8xyEcun5PmwkbkgUQRHavjP1hVCmdFoVV6wkm1PCXKQiLY4DN5P14yptqshLiqxUh3ebigdkAeylhFMUA9p1LBjediWoC8lFtjGVsxvdZa1AymvYPRq-xsnYZER_hPPSyyZuGFcsaNZgs6sAMtC-lWC68dqZXECuD8hBFSm269xCTxOvkhkE9g/s72-c-rw/pune-district.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2011/01/pune-district.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2011/01/pune-district.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची