जय देव वक्रतुंडा - गणपतीची आरती

जय देव वक्रतुंडा, गणपतीची आरती - [Jai Dev Vakratunda, Ganpatichi Aarti] जय देव जय देव जय वक्रतुंडा, सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा.

जय देव जय देव जय वक्रतुंडा, सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा

जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा ॥ ध्रु० ॥

प्रसन्नभाळा विमला करि घेउनि कमळा ।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीळा ॥
रुणझुण रुणझुण करिती घागरिया घोळा ।
सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा ॥ जय देव० ॥ १ ॥

सारीगमपधनी सप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥
तातक तातक थैय्या करिसी आनंदा ।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय देव० ॥ २ ॥

अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलड्डूधर शोभितशुभरदना ॥
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजि अलिपरि करि भ्रमणा ॥
जय देव जय देव जय वक्र० ॥ ३ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.