तू सुखकर्ता - गणपतीची आरती

तू सुखकर्ता, गणपतीची आरती - [Tu Sukhakarta, Ganpatichi Aarti] तू सुखकर्ता तू दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया.

तू सुखकर्ता तू दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया

तू सुखकर्ता तू दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ ध्रु० ॥

मंगलमूर्ति तू गणनायक ।
वक्रतुंड तू सिद्धिविनायक ॥
तुझिया द्वारी आज पातलो ।
नेई स्थितिप्रति राया ॥ संकटी० ॥१॥

तू सकलांचा भाग्यविधाता ।
तू विद्येचा स्वामी दाता ॥
ज्ञानदीप उजळून आमुचा ।
निमवी नैराश्याला ॥ संकटी० ॥२॥

तू माता, तु पिता जग या ।
ज्ञाता तू सर्वस्व जगी या ॥
पामर मी स्वर उणे भासती ।
तुझी आरती गाया ॥ संकटी० ॥३॥

मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरया ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.