राजा दिनकर केळकर संग्रहालय - पुणे

राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे - [Raja Dinkar Kelkar Museum, Pune].

राजा दिनकर केळकर संग्रहालय - पुणे

​​‘दिनकर गंगाधर केळकर’ यांनी उभारलेले ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ (Raja Dinkar Kelkar Museum - Pune) म्हणजे एकाच व्यक्तीने संग्रहित केलेल्या वस्तुंचा जगातील सर्वात मोठ्या संग्रहांपैकी एक संग्रह होय.

पुणे येथील राजा दिनकर केळकर संग्रहालयात सुंदररित्या कढाई केलेल्या कपड्यांपासून ते अत्यंत प्राचीन शिल्पे, विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या आणि तांब्याच्या वस्तुंचा सामावेश तर आहेच शिवाय पेशव्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या तलवारीपर्यंतच्या असंख्य कलाकृती या संग्रहालयाचे आकर्षण आहे आणि जेव्हा आपण राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विविध विभागांचा सैरसपाटा मारतो, तेव्हा संग्रहालयातील असंख्य पुरातन वस्तुंमधून इतिहास खरोखरच जिवंत होत असल्याचा भास होऊ लागतो. • [col]
  • राजा दिनकर केळकर संग्रहालय - पुणे
   वेळ: सकाळ १० ते सायंकाळ ६
   पत्ता: १३७७-७८, नातु बाग, बाजीराव रोड जवळ, शुक्रवार पेठ, पुणे: ४११००२
   अधिकृत संकेतस्थळ: rajakelkarmuseum.org
   ईतर नोंदी: संग्रहालय संपूर्ण वर्षभर बघण्यासाठी खुले असते.
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.