व्हॅनिला आईस्क्रीम - पाककृती

व्हॅनिला आईस्क्रिम, पाककला - [Vanilla Ice Cream, Recipe] गरमीमध्ये थंडावा आणण्यासाठी आणि मुलांचा आवडता थंडगार पदार्थ ‘व्हॅनिला आईस्क्रिम’ आता घरच्या घरी बनवू शकता.
व्हॅनिला आईस्क्रिम- पाककला | Vanilla Ice Cream - Recipe

खास लहान मुलांसाठी उन्हाळ्यात थंडगार ‘व्हॅनिला आईस्क्रीम’

‘व्हॅनिला आईस्क्रीम’साठी लागणारा जिन्नस

 • अर्धा टिन कंडेन्स्ड मिल्क
 • १ कप दुध
 • २ कप ताजे क्रीम
 • २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर
 • ६ मोठे चमचे साखर
 • २ छोटे चमचे व्हॅनिला एसेंस

‘व्हॅनिला आईस्क्रीम’ची पाककृती

 • थोड्या दूधात कार्नफ्लावर मिसळा, त्यामध्ये गुठळ्या शिल्लक राहता कामा नयेत.
 • गॅसवर एका भांड्यात शिल्लक दूध, कंडेन्स्ड मिल्क व साखर मिसळून घट्ट मिश्रण बनवा.
 • त्यात कॉर्नफ्लावर टाका. सारखे हलवत रहा.
 • घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
 • थंड झाल्यावर त्यामध्ये क्रीम व एसेंस मिसळून मिक्सर मध्ये फेटून घ्या.
 • तयार मिश्रण एका प्लास्टिक डब्यात ओता व घट्ट झाकण लावून १० तास फ्रीझरमध्ये जमवायला ठेवा.
 • चांगल्या परिणामासाठी रात्रभरही फ्रीझरमध्ये ठेवू शकता.
 • तयार आईस्क्रीम, आईस्क्रीम स्कुपने काढून बाऊलमध्ये सर्व्ह करा.
व्हॅनिला आईस्क्रीममध्ये व्हॅनिला एसेंस ऐवजी तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेंस किंवा आंबा, स्ट्रॉबेरीचा पल्प, चॉकलेट सिरप वगैरे घालून त्याची चव वाढवू शकता.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.