सोपे आणि झटपट कैरीचे लोणचे - पाककृती

सोपे आणि झटपट कैरीचे लोणचे, पाककृती - [Sope Aani Jhatpat Kairiche Lonche, Recipe] उन्हाळ्यासाठी खास ताज्या कैऱ्यांचे चटपटीत लोणचे.

चार ते पाच दिवस टिकणारे आणि झटपट होणारे कैरीचे सोपे लोणचे

सोप्या आणि झटपट होणाऱ्या कैरीच्या लोणच्यासाठी लागणारा जिन्नस

 • २ कैऱ्या
 • चवीनुसार मीठ
 • २ चमचे तिखट
 • २ चमचे तेल
 • १ चमचा मोहरी
 • चिमूटभर हिंग

सोप्या आणि झटपट होणाऱ्या कैरीच्या लोणच्याची पाककृती

 • कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्या
 • कैऱ्यांचे साल काढून घावे
 • सोललेल्या कैऱ्यांचे लहान लहान तुकडे करून घ्यावे (कोय बाजूला काढून घावी)
 • कैऱ्यांचे तुकडे एक भांड्यात काढून घावे
 • कैऱ्यांच्या तुकड्यांवर तिखट, मीठ पसरवा आणि व्यवस्थित एकजीव करून घावे
 • गॅसवर एका पळी मध्ये तेल गरम करून घ्या
 • तेल मध्ये चिमूटभर हिंग आणि मोहरी टाका
 • मोहरी तडतडली की गॅस बंद करा
 • आता ही फोडणी भांड्यातील कैऱ्यांच्या मिश्रणावर टाका
 • पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घ्या
तयार आहे आपले सहज सोपे कैरीचे सोपे आणि झटपट होणारे चटपटीत लोणचे

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.