ओला कचरा व्यवस्थापन पर्यायांचे प्रदर्शन

ओला कचरा व्यवस्थापन पर्यायांचे प्रदर्शन, कार्यक्रम - [Wet Waste Management Options Exhibition, Event] प्रदर्शन छत्रपती संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे दि. ३ मे ते ५ मे २०१९ दरम्यान स. १० ते सायं. ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे..

प्रदर्शन ३ मे ते ५ मे २०१९ स. १० ते सायं. ८ वाजेपर्यंत खुले आहे

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या विविध उपाययोजनांच्या अंतर्गत ओला कचरा अधिक प्रमाणात घर, सोसायटी, शाळा, हॉटेल तसेच संस्थांच्या हद्दीतच कसा जिरविला जाईल, याचे नियोजन करण्याचे ठरविले आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ च्या अनुषंगाने बल्क वेस्ट जनरेटर म्हणजेच १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, शाळा, हॉटेल्स व संस्थांना ओला कचरा स्वतःच्या हद्दीत जिरविणे बंधनकारक आहे. या संदर्भातील अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. सर्व बल्क वेस्ट जनरेटरना आपल्या सोयीनुसार ओला कचरा जिरविण्यासाठी योग्य पर्यायांची माहिती करून देण्यासाठी प्रदर्शन भरविण्यात येत आहे.

हे प्रदर्शन छत्रपती संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे दि. ३ मे ते ५ मे २०१९ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. पुणे शहरातील नागरिक, सोसायटी, खासगी संस्था, हॉटेल व्यावसायिकांनी सदर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.