मटका कुल्फी - पाककृती

मटका कुल्फी, पाककला - [Matka Kulfi, Recipe] छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या थंडगार मलईदार मटका कुल्फीची पाककृती.
मटका कुल्फी - पाककला - Matka Kulfi - Recipe

थंडगार सोप्पी मलईदार मटका कुल्फीची पाककृती

‘मटका कुल्फी’साठी लागणारा जिन्नस

 • १/२ लिटर फुल क्रिम दुध (म्हशीचे)
 • १ मोठी वाटी कंडेन्स्ड मिल्क (अर्धा टिन)
 • १/२ वाटी साखर
 • १ चमचा वेलची पुड
 • १/२ छोटी वाटी सुकामेव्याचे तुकडे
 • २ मोठे चमचे कॉर्न फ्लॉवर (ऐच्छीक)

‘मटका कुल्फी’ची पाककृती

 • एका जाड बुढाच्या पातील्यात दुध ओतावे.
 • दुधाचे भांडे गॅसवर ठेऊन मोठ्या आचेवर दुधाला एक उकळी काढून घ्यावी.
 • दुधाला एक उकळी आल्यानंतर गॅसची आच कमी करावी.
 • लहान आचेवर ठेवलेले दुधाचे मिश्रण १० मिनिटे व्यवस्थीत ढवळावे.
 • १० मिनिटानंतर दुधाच्या मिश्रणात कंडेन्स्ड मिल्क आणि आवडीनूसार साखर घालावी (मुळातच गोड असलेल्या कंडेन्स्ड मिल्क मुळे साखरेचे प्रमाण कमी जास्त केले जाऊ शकते).
 • ५ मिनिटांसाठी हे सर्व मिश्रण मध्यम आचेवर ढवळावे.
 • २ ते ३ चमचे दुधाचे मिश्रन आणि कॉर्न फ्लॉवर एका वाटीत घेऊन कॉर्न फ्लॉवर चे मिश्रण तयार करून घावे.
 • कॉर्न फ्लॉवर चे मिश्रण कुल्फिच्या मिश्रणात ओतावे आणि ढवळुन घ्यावे.
 • मिश्रणात वेलची पुड आणि सुकामेव्याचे तुकडे घालुन मध्यम आचेवर हे मिश्रण साधारन घट्ट होईपर्यंत सतत ढवळावे.
 • १० मिनितांनंतर मटका कुल्फीचे मिश्रण तयार आहे.
 • गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेऊन द्यावे.
 • आता थंड झालेले हे मटका कुल्फीचे मिश्रण लहानश्या मटक्यान मध्ये किंवा कुल्फीच्या मोल्ड मध्ये भरावे.
 • हा कुल्फीचा मोल्ड आता साधारण ८ तास डिप फ्रिझ/फ्रिझर मध्ये ठेवावे (चांगल्या परिणामासाठी रात्रभर ठेवल्यास उत्तम).
तयार आहे आपली थंडगार सोप्पी मलईदार मटका कुल्फी.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.